Agriculture news in marathi In Kisan Sanman Yojana Honor of Nagar District | Page 2 ||| Agrowon

किसान सन्मान योजनेत नगर जिल्ह्याचा सन्मान 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 27 फेब्रुवारी 2021

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत भौतिक तपासणी, या संवर्गातील उत्कृष्ट कामगिरीसाठी देशपातळीवरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार नगर जिल्ह्याला प्राप्त झाला.  

नगर : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत भौतिक तपासणी, या संवर्गातील उत्कृष्ट कामगिरीसाठी देशपातळीवरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार नगर जिल्ह्याला प्राप्त झाला. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी (बुधवारी) नवी दिल्ली येथे हा पुरस्कार स्वीकारला. 

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त देशभरातील काही जिल्ह्यांचा सन्मान करण्यात आला. त्यात नगरचा समावेश होता. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या एकूण लाभार्थींपैकी पाच टक्के लाभार्थींची भौतिक तपासणी विहित मुदतीत केल्यामुळे हा पुरस्कार देण्यात आला. 

नगरमधील योजनेवर दृष्टीक्षेप 
योजनेत पोर्टलवर नोंदणी झालेल्या लाभार्थींची संख्या ६ लाख ९८ हजार ९१४ आहे. या लाभार्थींच्या बॅंकखात्यांत आतापर्यंत ७१९ कोटी ५८ लाख ७० हजार एवढा निधी पोर्टलद्वारे जमा करण्यात आला आहे. भौतिक तपासणीसाठी २८ हजार ८०२ लाभार्थींची यादी पोर्टलद्वारे प्राप्त झाली होती. त्यात जिल्ह्याने शंभर टक्के काम पूर्ण केले. या २८ हजार ८०२ पैकी २६ हजार ६१२ लाभार्थी पात्र असून, २१९० शेतकरी अपात्र ठरले आहेत. योजनेतील २ लाख ५७ हजार लाभार्थींचे आधार प्रमाणीकरण करण्यात आले आहे. त्यांच्या बॅंकखात्यांवरील १ लाख १ हजार १२५ डाटा दुरुस्त करण्यात आला आहे. २२४९ तक्रारी आल्या होत्या, त्यांचे १०० टक्के निराकरण करण्यात आले. अपात्र लाभार्थींकडून ९ कोटी १९ लाख ५६ हजार रकमेची वसुली करण्यात आली आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे नोडल अधिकारी म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, राष्ट्रीय सूचना केंद्राचे जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी गजानन नकासकर, तहसीलदार एफ. आर. शेख, शरद घोरपडे व सुनीता जऱ्हाड, नायब तहसीलदार वरदा सोमण, अव्वल कारकून संदेश दिवटे व आय.टी. असिस्टंट रोहित शिंदे यांनी जिल्हास्तरावर कामकाज पाहिले. 


इतर ताज्या घडामोडी
पाच दिवसांत तब्बल ५० टन काजू बी खरेदी सिंधुदुर्गनगरी ः फळपीक बागायतदार संघाने गेल्या...
वाढत्या तापमानातील द्राक्ष बागेतील...प्रत्येक भागात सध्याच्या परिस्थितीचा विचार करता...
नगर : पीकविमा योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग...नगर : नैसर्गिक संकटाने तसेच अन्य कारणाने...
`दहिगाव उपसा सिंचन योजना सौरऊर्जेवर...सोलापूर ः करमाळा तालुक्यातील दहिगाव उपसा सिंचन...
पुणे बाजार समिती चक्राकार पद्धतीने सुरू...पुणे : कोरोना विषाणू बाधित रुग्णाच्या झपाट्याने...
देशी सीताफळाच्या बियाण्याची चोरीसोलापूर ः देशी सीताफळाच्या बियाण्याची चोरी...
पाण्याच्या उपलब्धतेमुळे उन्हाळी...पुणे : गेल्या वर्षी झालेल्या चांगल्या पावसामुळे...
हिंगोली ः सोयाबीनची अडीच लाख हेक्टरवर...हिंगोली ः जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात ३ लाख ५८...
अमरावतीत खरिपाचे ७ लाख हेक्टर क्षेत्र...अमरावती : कृषी विभागाच्या खरीप हंगाम २०२१...
नाशिक बाजार समितीच्या ‘त्या’ याचिका...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती...
बियाणे, खते, कीटकनाशक नियंत्रणासाठी...नाशिक : खरीप हंगामात बियाणे पेरणीचा कालावधी...
औरंगाबाद जिल्हाभरात फळे, भाजीपाला थेट...औरंगाबाद : शहरासह जिल्हाभरात राबविल्या जात...
लातूर जिल्ह्यात त्रेचाळीस हजार क्विंटल...लातूर: जिल्ह्यात कार्यान्वित १६ केंद्रांवरून २७५९...
अवैध दारू विक्रेत्यांना शासकीय योजनांचा...चंद्रपूर : अवैध दारू विक्रीमुळे सामाजिक स्वास्थ्य...
ऑक्सिजन प्रकल्प उभारणीचा अधिकार...मुंबई : कोरोना रुग्णांची वाढती संख्या व ऑक्सिजनची...
फळाचे ‘प्रमोशन’, मूल्यवर्धन होण्याची...चिकू बागायतदार संघाच्या वतीने राज्यातील चिकू...
अकोला जिल्हा परिषदेत खांदेपालटाची चर्चा अकोला : जिल्हा परिषदेत सत्तारूढ असलेल्या वंचित...
प्रक्रिया उद्योगाला चालना देणारनारळ लागवडीचे क्षेत्र वाढविताना शेतकऱ्यांच्या...
सामूहिक प्रयत्नातून काजू उत्पादकांची...जागतिक बाजारपेठेत वैशिष्ट्यपूर्ण चव असलेल्या...
क्षेत्र वाढ, प्रक्रियेसाठी सरकारी...देशात पेरू लागवडीचे सुमारे तीन लाख हेक्टर आणि...