Agriculture news in Marathi, Kisan Union agitation against Bt seeds | Agrowon

बीटी बियाण्यांच्या विरोधात किसान संघाचे आंदोलन  
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

पुणे ः कापसाचे एचटीबीटी, वांग्याचे बीटी, जीई राई या बियाण्यांची अवैध पद्धतीने विक्री केली जात आहे. ही विक्री थांबविण्यासाठी सरकारने तातडीने पाऊले उचलून कारवाई करावी, न केल्यास अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भारतीय किसान संघाचे राष्ट्रीय संघटनमंत्री दिनेश कुलकर्णी यांनी दिला.

भारतीय किसान संघाच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर गुरुवारी (ता. ८) धरणे आंदोलन केले. या वेळी संघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष भगवान फुलावरे, उपाध्यक्ष अशोक फडके, मधुकर टेमगिरे, संभाजी नरके, सूर्यकांत शिर्के, महेश सावंत, बबनराव केंजळे आदी उपस्थित होते.   

पुणे ः कापसाचे एचटीबीटी, वांग्याचे बीटी, जीई राई या बियाण्यांची अवैध पद्धतीने विक्री केली जात आहे. ही विक्री थांबविण्यासाठी सरकारने तातडीने पाऊले उचलून कारवाई करावी, न केल्यास अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भारतीय किसान संघाचे राष्ट्रीय संघटनमंत्री दिनेश कुलकर्णी यांनी दिला.

भारतीय किसान संघाच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर गुरुवारी (ता. ८) धरणे आंदोलन केले. या वेळी संघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष भगवान फुलावरे, उपाध्यक्ष अशोक फडके, मधुकर टेमगिरे, संभाजी नरके, सूर्यकांत शिर्के, महेश सावंत, बबनराव केंजळे आदी उपस्थित होते.   

श्री. कुलकर्णी म्हणाले, की कापूस, वांगे आणि राई या बियाण्यांची मॉन्सेटो महिको या कंपन्या अवैध विक्री करत आहे. हे बेकायदेशीर असून संबधित कंपन्या विविध संस्था, अधिकारी यांच्याशी हात मिळवणी करून प्रसार करत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमुळे संभ्रम तयार होत असून या कंपन्या त्याचा फायदा घेत आहे. बीटी बियाणांच्या कोणत्याही चाचण्या केलेल्या नाही. तरीही विक्री कंपन्या विक्री करत आहे. जी. एम. पिकांच्या नावावर जेव्हा बीटी कापसाची शेती देशभरात प्रचलित झाली. तेव्हापासून नफेखोर बियाणे कंपन्यांचा दबाव वाढत गेला आहे. अन्नदात्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यामध्ये भर पडत गेली आहे. जी.एम. पिकांमध्ये उत्पादक असे कोणतेही जीन अधिक प्रमाणात घातले गेलेले नाही. जे काही पिकत आहे, ते बियाण्यांची मूळ शक्ती आणि शेतकऱ्यांकडून काळजी घेण्यामुळेच पिकत आहे, असे असताना काही शास्त्रज्ञ, काही विक्री प्रचारतंत्र आणि काही आमिषांना बळी पडणारे प्रशासक, त्याचबरोबर राजकीय जबाबदारी असलेल्या व्यक्ती हे या बियाणांसंदर्भात चुकीची प्रसिद्धी करत आहे. मात्र, या तिन्ही प्रकारच्या बियाणांना अजून मान्यता मिळालेली नाही. हे बियाणे सादरकर्त्याजवळ सुरक्षित आहेत. हे बियाणे त्याच्याकडून शेतकऱ्यांपर्यंत कशी पोचली याची माहिती घ्यावी. यामुळे जनावरांवर व मनुष्याची हानी होत आहे. त्यामुळे सरकारने योग्य ती कारवाई करावी,’’ अशी मागणी त्यांनी केली. 
 

इतर ताज्या घडामोडी
संत्र्याला जागतिक बाजारपेठेत पोचवण्याचे...अमरावती : जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या...
बागलाण तालुक्यात शेतातून चंदनाची चोरीनाशिक  : बागलाण तालुक्यातील नवे निरपूर येथील...
तोलाई परिपत्रक होणार रद्द पुणे ः बाजार समित्यांमध्ये शेतमालाच्या...
‘शेतकरी सन्मान’साठी २० हजार कोटी दिले...नाशिक : शेतकऱ्यांना सन्मान मिळवून देत त्यांना मदत...
‘मी शेतकरी’ आंदोलनाला गांधी जयंतीपासून...नगर : शेतकऱ्यांच्या शेतीमालाला दीडपट हमीभाव तसेच...
शेतीपूरक व्यवसायांना राज्य शासनाची...सांगली ः अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास...
थकीत बिलासाठी मुंबईत दुग्धविकास आयुक्त...परभणी ः शासकीय दूध योजनेअंतर्गत परभणी येथील दुग्ध...
आर्थिक मंदीमुळे देशातील शेती क्षेत्राला...नांदेड ः सध्या प्रचंड मंदी आहे. गुंतवणूक केली जात...
सातारा जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...सातारा ः माण, खटाव, फलटण या दुष्काळी तालुक्यांना...
विषबाधेच्या चौकशीची फाइल अडली गृह...नागपूर: प्रशासन गतिमान असल्याचा दावा सरकारकडून...
मित्रबुरशींच्या संवर्धनातून लष्करी...सध्या राज्याच्या विविध भागात अनुकूल हवामानामुळे...
राज्यात लिंबांना प्रतिक्विंटल १५०० ते...सोलापुरात प्रतिक्विंटल सर्वाधिक १० हजार रुपये...
आचारसंहितेच्या धास्तीने जिल्हा परिषदेत...पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या...
नगर जिल्ह्यात टंचाईग्रस्तांना ३८३...नगर  : पावसाची रोहिणी, मृग, आर्द्रा,...
मराठवाड्यात हलक्या पावसाची हजेरीऔरंगाबाद, नांदेड : मराठवाड्यातील ३०९ मंडळांमध्ये...
महाजनादेश यात्रेत सावधगिरी म्हणून...नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
साताऱ्यात यंदा ऊस हंगाम तीन महिनेच सातारा : अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूर...
संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम पथकाची...कोल्हापूर : महापुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी...
सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या धोरणांने तरुण...बीड : सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या हिताचा...
कृषी संजीवनी प्रकल्पात पाच हेक्टरपर्यंत...मुंबई : जागतिक बँकेच्या अर्थसाह्याने राबविण्यात...