शेतकरीविरोधी कायद्यावर ‘किसानपूत्र’चे ऑनलाइन शिबिर 

किसानपूत्र आंदोलनाच्यावतीने शेतकरीविरोधी कायदे या विषयावर ९ ते १५ ऑगस्ट या कालावधीत ऑनलाइन शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
शेतकरीविरोधी कायद्यावर ‘किसानपूत्र’चे ऑनलाइन शिबिर 
शेतकरीविरोधी कायद्यावर ‘किसानपूत्र’चे ऑनलाइन शिबिर 

औरंगाबाद: किसानपूत्र आंदोलनाच्यावतीने शेतकरीविरोधी कायदे या विषयावर ९ ते १५ ऑगस्ट या कालावधीत ऑनलाइन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. त्यात २०० हून अधिक शिबिरार्थींनी नावे नोंदवली आहेत, अशी माहिती किसानपूत्र आंदोलनाचे अमर हबीब यांनी दिली.  हे शिबिर गुगल मीट वर दररोज सायं ५ ते ६.३० या वेळात होईल. 'चपराक'चे संपादक घनश्याम पाटील हे शिबिराचे उद्घाटन करणार असून अमर हबीब हे समारोपाचे व्याख्यान देणार आहेत. या शिबिरात डॉ. विकास सुकाळे (नांदेड) हे सीलिंग कायदा, ॲड. भूषण पाटील (औरंगाबाद) आवश्यक वस्तू कायदा, नंदकुमार उगले (नाशिक) जमीन अधिग्रहण कायदा समजावून सांगतील. परिशिष्ट ९ व अन्य शेतकरीविरोधी घटनादुरुस्त्या बद्दल ॲड. महेश गजेंद्रगडकर (पुणे) हे विवेचन करणार आहेत. तसेच संदीप रोडे (अमरावती) हे शेतकरीविरोधी कायदे रद्द करण्याची रणनीती अर्थात किसानपूत्र आंदोलन या वर बोलतील. 

समारोप सत्रात सर्जकांचे स्वातंत्र्य या विषयावर अमर हबीब मार्गदर्शन करणार आहेत. मयूर बागुल (अंमळनेर-पुणे) हे शिबिराचे संयोजक असून तांत्रिक सहयोग अस्लम सय्यद (आंबाजोगाई-पुणे) करणार आहेत. महाराष्ट्रातील जवळपास सर्व जिल्ह्यातून शिबिरार्थींनी भाग घेतला आहे. लॉकडाउनच्या काळात किसानपूत्र आंदोलनाने एक महिन्याची व्याख्यानमाला चालवली. तसेच एक अनोखी व्हिडिओ स्पर्धाही घेतली. त्या पाठोपाठ ह्या शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचे किसान पुत्र आंदोलच्यावतीने सांगण्यात आले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com