नगर ः कोरोना व्हायरस संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात चिकन, अंड्याला मागणी वाढली आहे.
ताज्या घडामोडी
जवसाचे आरोग्यदायी महत्त्व जाणावे ः डॉ. दिलीप मानकर
जवसाचे आरोग्यदायी महत्त्व पाहता स्वतः सेवन सुद्धा करावे, असे आवाहन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे शिक्षण विस्तार संचालक डॉ. दिलीप मानकर यांनी केले.
अकोला ः शेतकऱ्यांनी जवसाचे उत्पन्न घेताना तेलाचा चांगला भाव पाहता तेल काढून विक्री सुद्धा करावी जेणेकरून त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल व जवसाचे आरोग्यदायी महत्त्व पाहता स्वतः सेवन सुद्धा करावे, असे आवाहन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे शिक्षण विस्तार संचालक डॉ. दिलीप मानकर यांनी केले.
राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत, अखिल भारतीय समन्वित जवस व मोहरी संशोधन प्रकल्पामार्फत नागपूर कृषी महाविद्यालयातर्फे रिसोड तालुक्यातील नेतन्सा येथे जवस शेती दिन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी डॉ. मानकर अध्यक्षपदावरून बोलत होते. शेतकऱ्यांनी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे नवनवीन तंत्रज्ञानाचा व शिफारशींचा अधिकाधिक वापर करून आपला आर्थिक नफा वाढवावा, असेही ते म्हणाले.
जैविक महासंघाचे अध्यक्ष प्रकाश पोहरे यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले. तंत्र अधिकारी दिलीप कंकाळ यांनी जवस पिकाचे क्षेत्रफळ वाढवण्यात महत्त्वाचा सहभाग ठेवू व पुढील वर्षीच्या रब्बी हंगामात वाशीम जिल्ह्यात शेतकऱ्यांना जास्तीत जास्त प्रात्यक्षिक देण्याचे नियोजन करू. जवस उत्पादन घेणाऱ्या गटांना ६० टक्के अनुदानावर लाकडी तेलघाणी कृषी विभागामार्फत देऊ, असे आश्वासन दिले.