Agriculture News in Marathi For Kojagiri Milk prices increased | Page 4 ||| Agrowon

कोजागरीनिमित्त  दुधाचे दर वाढले 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 20 ऑक्टोबर 2021

कोजागरी पौर्णिमेसाठी गणेश पेठेतील घाऊक दूध बाजारात गेल्या दोन दिवसांपासून दुधाला मागणी वाढल्याने आवक देखील वाढली होती. यामुळे प्रति लिटरला ६५ ते ७० रुपये दर होता.

पुणे : कोजागिरी पौर्णिमेसाठी गणेश पेठेतील घाऊक दूध बाजारात गेल्या दोन दिवसांपासून दुधाला मागणी वाढल्याने आवक देखील वाढली होती. यामुळे प्रति लिटरला ६५ ते ७० रुपये दर होता. कोरोना संकट निवळल्यामुळे सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळाकडून पौर्णिमा मोठ्या प्रमाणावर साजरी होत असल्याने मागणी वाढल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. 

कोजागिरी पौर्णिमा मंगळवारी (ता. १९) जरी साजरी होत असली, तरी रविवार, सोमवारपासूनच मिठाई विक्रेते, किरकोळ विक्रेते तसेच केटरिंग व्यावसायिकांकडून दुधाला मागणी वाढली होती. शहरातील गेल्या वर्षी करोनाच्या संसर्गामुळे सार्वजनिक स्वरूपात कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्यात आली नव्हती. त्यामुळे गेल्या वर्षी दुधाला प्रति लिटर ४५ ते ५० रुपये लिटर असा दर होता.

या वर्षी कोरोनाचे संकट निवळल्यामुळे आणि शासनाने निर्बंध शिथिल केल्याने यंदा दुधाला मागणी वाढली आहे. घाऊक खरेदीसाठी सार्वजनिक मंडळांकडून दुधाला चांगली मागणी होती, अशी माहिती गणेश पेठ दूध बाजार खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष रामदास काळे आणि उपाध्यक्ष दामोदर हिंगमिरे यांनी दिली. 

दूध बाजारात पुणे शहरातील लष्कर, अरण्येश्‍वर, कात्रज परिसरातील गवळी वाड्यातून आवक झाली होती. तर नगर रस्त्यावरील केसनंद, वाघोली आणि मावळ, मुळशी, भोर, वेल्हा येथील शेतकऱ्यांनी दूध विक्रीस पाठविले. सोमवारी (ता. १८) दूध बाजारात तीन हजार लिटर दुधाची आवक झाली. दुपारपर्यंत दुधाची विक्री झाली. सार्वजनिक मंडळांकडून दूध खरेदीची नोंदणी झाली, तसेच मिठाई विक्रेत्यांकडून मोठ्या प्रमाणावर खरेदी झाली. तर मंगळवारी (ता. १९) देखील दुधाला चांगली मागणी होती.

नवरात्रोत्सवात दुधाच्या मागणीत वाढ झाली होती. नवरात्रोत्सव ते दिवाळीपर्यंत मिठाई विक्रेत्यांकडून दुधाची मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्यात येते. त्यामुळे वर्षाच्या अखेरीपर्यंत दुधाला मोठी मागणी आणि दर गले राहतील, असा अंदाज काळे यांनी व्यक्त केला. 

दुधाचे भाव 
१८ लिटर घागर-११६० रुपये 
एक लिटर- ६५ ते ७० रुपये


इतर बातम्या
  वखारच्या ऑनलाइन शेतीमाल तारण कर्जात...पुणे : राज्य वखार महामंडळाच्या ऑनलाइन (ब्लॉकचेन)...
हिंगोलीत सोयाबीन दरात सुधारणाहिंगोली ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात ज्वारी, गहू,...परभणी ः परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदाच्या (२०२१-...
डाळिंबाच्या सुकर वाटेसाठी गडकरी...जालना : संपूर्ण राज्यात महत्वाचे फळपीक असलेल्या...
अमरावती जिल्ह्याती ‘पीएम किसान’ची ५...अमरावती ः पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत लाभ...
कृष्णाकाठावर मजुरांअभावी ऊस रोपांची लागणभिलवडी, जि. सांगली ः कृष्णाकाठावर उसाच्या कांडी...
कोल्हापूर, सांगलीत ‘कृषिपंप...कोल्हापूर  : गेल्या तीन दिवसांत कोल्हापूर व...
वीज पुरवठा सुरळीत  करण्यासाठी इंदापुरात...पुणे ः जिल्ह्याच्या विविध तालुक्यातील थकबाकीदार...
खानदेशात पीककर्ज वितरणाला येईना गतीजळगाव ः  खानदेशात रब्बी हंगामासाठी पीक...
सोयाबीन दराची घोडदौड सुरूच राहणार पुणे ः तेलबिया आणि खाद्यतेलाच्या दारातील...
पुणे बाजार समितीचा वारणारांना चाप ः गरडपुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फळे,...
जळगाव जिल्ह्यात बोंडअळीचा उद्रेकजळगाव ः जिल्ह्यात यंदा शेतकऱ्यांना अतिवृष्टीने...
राज्यात पावसाला पोषक हवामान पुणे : राज्याच्या किमान तापमानात आणखी घट झाल्याने...
पावसाला पोषक हवामानामुळे किमान तापमानात...पुणे : पावसाने उघडीप दिल्यानंतर राज्याच्या किमान...
वीजप्रश्नी संतप्त शेतकरी  महावितरण...नाशिक : महावितरण कंपनीकडून सटाणा तालुक्यात थकीत...
कापूस खेडा खरेदी करणाऱ्या ...बुलडाणा ः खेडा खरेदीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना...
कडुलिंबाची झाडे वाळू लागली पुणे नगर ः नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील...
राज्यातील १२१ आदिवासी  आश्रमशाळा होणार...पुणे ः शिक्षण व्यवस्थेमधील बदलांना सामोरे जात...
लाल कांद्याला उन्हाळच्या  तुलनेत मिळतोय...नाशिक : दिवाळीनंतर जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार...
नगर पंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी...पुणे नगर ः राज्यातील मुदत संपलेल्या परंतु,...