agriculture news in Marathi, kokan bhendi for Kharip season, Maharashtra | Agrowon

खरीप हंगामासाठी भेंडीची नवी जात
टीम अॅग्रोवन
शनिवार, 15 जून 2019

चिपळूण ः दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने खरीप हंगामात दर्जेदार उत्पादन देणाऱ्या भेंडी पिकाची ‘कोकण भेंडी’ (DPLOK-११) ही संकरित जात विकसित केली आहे. या वर्षीपासून वाकवली (ता. दापोली) येथील मध्यवर्ती संशोधन केंद्रामध्ये कोकण भेंडी जातीचे बियाणे शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे.

चिपळूण ः दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने खरीप हंगामात दर्जेदार उत्पादन देणाऱ्या भेंडी पिकाची ‘कोकण भेंडी’ (DPLOK-११) ही संकरित जात विकसित केली आहे. या वर्षीपासून वाकवली (ता. दापोली) येथील मध्यवर्ती संशोधन केंद्रामध्ये कोकण भेंडी जातीचे बियाणे शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे.

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने संशोधनाअंती शिफारस केलेली ‘कोकण भेंडी’ ही भेंडीची पहिलीच जात आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठात झालेल्या ‘ॲग्रेस्को’मध्ये कोकण भेंडी या जातीची शिफारस करण्यात आली. या बैठकीला विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत, कुलसचिव डॉ. प्रमोद सावंत, संशोधक संचालक डॉ. पराग हळदणकर, विस्तार संचालक डॉ. संजय भावे, शिक्षण संचालक डॉ. सतीष नारखेडे आदी उपस्थित होते. 

जातीच्या वैशिष्ट्याबाबत विद्यापीठाचे संशोधक संचालक डॉ. पराग हळदणकर म्हणाले, की या संकरित जातीची खरीप हंगामासाठी शिफारस करण्यात आली आहे. भेंडीचे रोप सरळ वाढते, उपशाखा फुटत नाहीत. मोझॅक रोगास प्रतिकारक जात आहे.

तसेच हे वाण अतिपावसातही तग धरणारे आहे. वाकवली येथील मध्यवर्ती संशोधन केंद्रावर आठ वर्षे या जातीचे संशोधन सुरू होते. याचबरोबरीने कोकणात ठिकठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतावर दोन वर्षे लागवड करून या जातीच्या उत्पादनविषयक चाचण्या घेण्यात आल्या. या जातीचे हेक्‍टरी १३५ क्विंटल उत्पादन मिळते.  
 ः डॉ. प्रकाश सानप, ७७९८६७२०६३

 

इतर अॅग्रो विशेष
दुष्काळामुळे द्यावा लागणार पाणी...पुणे ः सततच्या दुष्काळामुळे आता पाणी...
पीक पोषणात महत्त्वाची अन्नद्रव्ये पिकांच्या सुदृढ वाढीसाठी १८ अन्नद्रव्यांची...
मिल्क केक बनविण्याची प्रक्रियामिल्क केक हा दिसायला कलाकंदप्रमाणे असला तरी...
मराठवाड्यात ठिकठिकाणी हलक्या ते जोरदार...पुणे ः राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार...
सोयाबीनवरील कीडीची ओळख सोयाबीन हे राज्यातील महत्त्वाचे पीक असून, त्यावर...
नांदेड जिल्ह्यात अन्नधान्य पिकांच्या...नांदेड : जिल्ह्यात गुरुवारपर्यंत (ता. १८) ६ लाख...
एकाच गावातील ७५० एकरांत ७५०० कामगंध...जालना : गतवर्षी नियंत्रण मिळविलं म्हणून कपाशीवरील...
जलसंधारणाचा खामगाव पॅटर्न देशभरात जाणारअकोला ः राष्ट्रीय महामार्गाचे काम करताना त्यासाठी...
कृत्रीम शीतपेयांना शोधला कोकणी नैसर्गिक...कोकणातील निसर्गरम्य कोळथर (ता. दापोली, जि....
फुलांनी आणला आयुष्यात बहर, अॅग्रोवनची...पुणे जिल्ह्यात रुई येथील सुहास लावंड यांनी...
जलव्यवस्थापनातील हुशारीतून फुलतेय ...दुष्काळाशी लढताना औरंगाबाद जिल्ह्यातील गाढेजळगाव...
दुष्काळातही कडवंची गावच्या अर्थकारणाची...भूगर्भीय सर्वेक्षण आधारित पाणलोटाची कामे, मृद...
मातीची सुपीकता टिकविणे आव्हानात्मक: डॉ...कोल्हापूर : कोल्हापूर विभागात मातीची सुपीकता...
साखर कारखान्यांना कर्ज न देणाऱ्या...मुंबई: आगामी हंगामासाठी साखर कारखान्यांना...
कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्याचा करारअकोला ः  केंद्र शासनाची पंतप्रधान कौशल्य...
जीवनावश्‍यक वस्तू कायद्यावर प्रश्‍नचिन्हनवी दिल्ली: जीवनावश्‍यक वस्तू कायद्याची आवश्यकता...
जनतेचा पैसा जनतेच्याच भल्यासाठीतत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९ जुलै...
कृत्रिम पाऊस : गप्पा अन् गांभीर्यमागील पावसाळ्यातील कमी पावसामुळे राज्यात भीषण...
पेरणीने ओलांडली पन्नाशीः डाॅ. अनिल बोंडेमुंबई: राज्यात खरिपाची ८०.६१ लाख हेक्टर...
दोषी आढळल्यास विमा कंपन्यांवर गुन्हेः...कोल्हापूर: विमा कंपन्या शेतकऱ्यांना लाभ देण्यास...