agriculture news in Marathi Kokan may affected by wind Maharashtra | Page 3 ||| Agrowon

वेगवान वाऱ्याचा कोकण किनारपट्टीला फटका शक्य 

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 14 मे 2021

गेल्या दोन दिवसांपासून अरबी समुद्राच्या नैऋत्य भागात अतितीव्र कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव वाढत आहे. या क्षेत्राचे चक्रिवादळामध्ये उद्या रूपांतर होण्याची शक्यता आहे.

पुणे : गेल्या दोन दिवसांपासून अरबी समुद्राच्या नैऋत्य भागात अतितीव्र कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव वाढत आहे. या क्षेत्राचे चक्रिवादळामध्ये उद्या रूपांतर होण्याची शक्यता आहे. यामुळे वारे वेगाने वाहणार असल्याने मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. 

लक्षद्वीप परिसर आणि अरबी समुद्राच्या नैऋत्य भागात गुरुवारी हे तीव्र कमी दाबाचे क्षेत्र होते. आज (ता.१४) या क्षेत्राची तीव्रता अधिक वाढून ते उत्तर- वायव्यकडे गुजरात आणि पाकिस्तानच्या किनारपट्टीच्या दिशेने ते सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे केरळ आणि लक्षद्वीप परिसरात १४ ते १७ मे या कालावधीत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उद्या (शनिवारी) तमिळनाडू आणि दक्षिण कर्नाटकमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा शक्यता आहे. त्यामुळे दक्षिणपूर्व आणि मालदिव कोमोरीन आणि लक्षद्वीप लगतच्या भागात, केरळ किनारपट्टी व पूर्व मध्य अरबी समुद्रासह आणि कर्नाटक गोवा व कोकण किनारपट्टीवर जाऊ 
नये, तसेच ते समुद्रात मच्छीमारांसाठी गेले आहेत, त्यांनीही परत येण्याचा इशारा दिला आहे. 

चक्रीवादळामुळे १५ आणि १७ मेच्या दरम्यान कोकण किनारपट्टी व मध्य महाराष्ट्रा दरम्यान अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. या चक्रीवादळामुळे वाऱ्याचा ताशी ४० ते ५० किलोमीटर वेग राहणार तो हळूहळू वाढत जाईल. साधारणपणे जास्तीतजास्त ताशी ७०-८० किलोमीटरपर्यंत वेगाने वारे वाहणार असल्याने बंगालच्या उपसागरात मॉन्सूनचे प्रवाह सक्रिय होण्यासाठी पोषक वातावरण बनण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम राज्यातील वातावरणावर होणार असून कोकण, मध्य महाराष्ट्रात काही अंशतः ढगाळ वातावरण तयार झाले असून उकाड्यात वाढ झाली आहे. गुरुवारी (ता. १३) सकाळी चोवीस तासांत विदर्भातील चंद्रपूर येथे सर्वाधिक ४३.२ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. 

दक्षिण महाराष्ट्रात मुसळधारेचा इशारा 
अरबी समुद्रात तयार होणाऱ्या चक्रीवादळाचा फटका मध्य महाराष्ट्र व कोकणला बसणार आहे. रविवारपासून (ता.१६) रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांत विजांच्या कडकडाट व मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापणी केलेले पिके शेडमध्ये, प्लॅस्टिकच्या कागदामध्ये झाकून ठेवावे. जनावरांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावे. याशिवाय फळधारणेवर असलेली पिके व भाजीपाला पिके यांना काठीचा आधार देऊन बांधण्याचा सल्ला देण्यात आला आहे. 

राज्यात या जिल्ह्यांमध्ये होणार पूर्वमोसमी पाऊस 
शुक्रवार ः
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नगर, पुणे, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, संपूर्ण मराठवाडा व विदर्भ 
शनिवार ः रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, सातारा,संपूर्ण मराठवाडा व विदर्भ 
रविवारः संपूर्ण महाराष्ट्र 
सोमवार ः संपूर्ण महाराष्ट्र 

गुरूवारी (ता.१३) सकाळपर्यंतच्या २४ तासांत विविध शहरातील कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) 

  • मुंबई (सांताक्रुझ) ३४.३ 
  • अलिबाग ३४.६ 
  • रत्नागिरी ३४.६ 
  • डहाणू ३४.५ 
  • पुणे ३६.६ 
  • जळगाव ४१.० 
  • कोल्हापूर ३५.१ 
  • महाबळेश्वर २९.६ 
  • मालेगाव ४२.४ 
  • नाशिक ३६.३ 
  • सांगली ३७.४ 
  • सातारा ३७.२ 
  • सोलापूर ३९.५ 
  • औरंगाबाद ३८.७ 
  • परभणी ४०.७ 
  • नांदेड ४१. 
  • अकोला ४२.२ 
  • अमरावती ४१.२ 
  • बुलडाणा ३९.६ 
  • चंद्रपूर ४३.२ 
  • गोंदिया ४१.२ 
  • नागपूर ४२.२ 
  • वाशिम ४१.६ 
  • वर्धा ४२.५ 

इतर अॅग्रो विशेष
नऊ जिल्हे अतिवृष्टिबाधित मुंबई ः कोकण आणि पश्‍चिम महाराष्‍ट्रातील ९ जिल्हे...
वाशीम जिल्ह्यात ६९९ कोटींचे पीककर्ज वाटपवाशीम : जिल्ह्यात या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना...
कोल्हापुरात पुराची भीती कायम कोल्हापूर : पावसाने शनिवारी (ता.२४) दुपारपर्यंत...
उपलोकायुक्त, सचिव, आयुक्तांनी सांगूनही...पुणे ः जलयुक्त शिवार अभियानावर खर्च दाखवलेल्या...
शेतीला मिळाली दुग्ध प्रक्रियेची जोडघोटावडे (ता. मुळशी, जि. पुणे) प्रियांका जालिंदर...
तुळशी धरणक्षेत्रात उच्चांकी ८९५...कोल्हापूर : जिल्ह्यातील तुळशी (ता.राधानगरी)...
टीका, आरोपांचा समाचार; दुसऱ्या दिवशीही...नवी दिल्ली : संयुक्त किसान मोर्चाने आयोजित शेतकरी...
कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची...पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या...
ढगफुटीने हाहाकारपुणे : पश्‍चिम महाराष्ट्रात मॉन्सूनच्या पावसाने...
सांगलीत नदीकाठच्या नागरिकांचे स्थलांतर सांगली ः चांदोली धरणक्षेत्रात अतिवृष्टी सुरू...
पीक विम्यासाठी ७२ तासांच्या आत नुकसान...पुणे ः राज्याच्या काही भागात अतिवृष्टी, पुराने...
कोल्हापुरात पावसाचे थैमान, पुराचा विळखा कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाचा हाहाकार शुक्रवारीही...
तेवीस वर्षीय युवकाची पोल्ट्रीत दमदार...शिवपूर (जि. अकोला) येथील शुभम महल्ले या तरुणाने...
शेतीसह डाळी, बेसन पीठ प्रक्रिया ठरली...करकंब (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथील सुधीर...
शेतकऱ्यांच्या प्रश्नी संसद दणाणली;...नवी दिल्ली ः संसदेत गुरुवारी (ता.२२) शेतकरी...
‘शेतकरी संसदे’त कृषी कायद्यांवर हल्लाबोलनवी दिल्ली  : जंतर-मंतर येथे संयुक्त किसान...
महाबळेश्वरात ४८० मिलिमीटर पाऊस !!!सातारा ः महाबळेश्वरात मुसळधार पाऊस सुरू आहे....
रत्नागिरीत पावसाचे थैमानरत्नागिरी ः जिल्ह्यात अनेक ठिकाणी ढगफुटीसारख्या...
‘मुळशी’च्या पाणलोट क्षेत्रात ३७०...पुणे ः जिल्ह्यात धरणाच्या पाणलोट क्षेत्रात...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पूरस्थिती गंभीरसिंधुदुर्गनगरी ः जिल्हयात मध्यरात्रीपासून...