agriculture news in marathi kolhapur agriculture collage use online learning tool for students | Page 2 ||| Agrowon

कोल्हापूर कृषी महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांना ‘ऑनलाईन शिक्षण’

टीम अॅग्रोवन
सोमवार, 6 एप्रिल 2020

कोल्हापूर : येथील कोल्हापूर कृषी महाविद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी सोशल मिडियाच्या माध्यमातून ऑनलाइन क्लासेस घेण्यात येत आहेत. याला विद्यार्थ्यांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.

कोल्हापूर : येथील कोल्हापूर कृषी महाविद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी सोशल मिडियाच्या माध्यमातून ऑनलाइन क्लासेस घेण्यात येत आहेत. याला विद्यार्थ्यांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.

कोरोनामुळे सर्व शैक्षणिक बाबी ठप्प असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कामकाजही बंद आहे. विद्यार्थी आपापल्या गावी परतले असले, तरी सध्या वर्ग बंद असल्याने त्यांचे क्‍लासेसचे कामकाज ठप्प झाले आहे. यातून पर्याय म्हणून ‘ॲप’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे ऑनलाइन क्लासेस घेण्यात येत आहेत.

एकाच वेळी ऐंशी विद्यार्थी ऑनलाइन वर्गाचा लाभ याचा लाभ घेऊ शकत आहेत. दुसरे, चौथे आणि सहाव्या सत्राचे वर्ग अशा पद्धतीने घेण्यात येत आहेत. जिथे शिक्षक असतील तेथून ‘व्हॉटसअप किंवा झूम’ या समाज माध्यतातून ‘कॉन्फरस मिटींग’ घेऊन सेमिनार, वेबीनार द्वारे ऑनलाइन लेक्‍चर घेतले जाते. ज्यांच्याकडे स्मार्ट फोन नाहीत त्यांना त्यांच्या वर्गातील मुले फोन द्वारे सांगतात.

विविध विभागाच्या पोस्ट ग्रॅज्युएशनचे काम अशा पद्धतीने सुरू आहे. सेमिनार देणे आणि घेणे ऑनलाइन सुरू आहेत. सोशल मिडियाच्या माध्यमातून जेवढा संपर्क साधता येईल तितका साधून शैक्षणिक कामकाज सुरू ठेवण्यात येत असल्याचे कृषी महाविद्यालय प्रशासनाने सांगितले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली या सुविधा द्वारे वर्ग सुरू आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व शिक्षण संस्था बंद आहेत. शासनाने मुलांचे हॉस्टेलही विलीनीकरणासाठी ताब्यात घेतले आहे. शासनाला यासाठीही सहकार्य करण्यात येत असल्याचे महाविद्यालयाच्या वतीने सांगण्यात आले. 


इतर अॅग्रो विशेष
दुग्धव्यवसायातून शेतीला दिला सक्षम...आत्महत्याग्रस्त अशी ओळख असलेल्या यवतमाळ...
मॉन्सून मालदिवात दाखल; १ जूनलाच केरळात...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) सोमवारपर्यंत...
भारतीय किसान संघामार्फत शेतकऱ्यांनी...कोल्हापूर: भारतीय किसान संघाने लॉकडाउनच्या काळात...
लॉकाडाउनमध्येही शेतकऱ्यांकडून शेतमालाची...पुणे (प्रतिनिधी)ः कोरोना टाळेबंदी मध्ये शेतमालाची...
खानदेशात साठा वाढल्याने कापूस, सरकी...जळगाव : कापसाची शासकीय खरेदी खानदेशात मागील ६ मे...
राज्यातील २८० बाजार समित्या अडचणीत;...लातूर ः राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा...
उष्णतेच्या लाटेमुळे अकोल्यात केळीचे घड...अकोला  ः जिल्ह्यात या आठवड्यात वाढलेल्या...
विदर्भात टोळधाडीची दहशत कायम;...नागपूर ः अमरावती जिल्ह्यातील पुसला गावातून...
राजस्थानातील चुरूत ५० अंशांवर तापमान;...पुणे  : सूर्य अक्षरश: आग ओकत असल्याने...
मॉन्सून ४८ तासांमध्ये दक्षिण अरबी...पुणे  : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
एसटीव्दारे शेतीमाल वाहतूक सुरु...पुणे  ः ‘कोरोना’मुळे महाराष्ट्र राज्य परिवहन...
तंत्रज्ञान आत्मसात करीत प्रयोगशील शेतीत...अकोला जिल्ह्यातील आस्टुल येथील संतोष घुगे यांनी...
मॉन्सूनची अंदमानात चाल;...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) बुधवारी...
कापूस उत्पादनात २४ लाख गाठींनी घट शक्यजळगाव ः देशात कापसाच्या उत्पादनात सुमारे २४ लाख...
टोळधाडीकडून भाजीपाल्याचे सर्वाधिक...नागपूर : राजस्थान, मध्यप्रदेशनंतर टोळधाडीचा...
उन्हाच्या झळांनी काहीली वाढली पुणे : सुर्य चांगलाच तळपत असल्याने...
केळी ‘रायपनिंग चेंबर’ व्यवसाय झाला पूरक...सातारा जिल्ह्यातील अनवडी (ता. वाई) येथील प्रवीण...