दुधी अळिंबी लागवडीसाठी जागेची निवड, वाढीसाठी लागणारे माध्यम आणि वातावरण तसेच काडाचे निर्ज
ताज्या घडामोडी
कोल्हापुरात फळांची आवक घटलेलीच
कोल्हापूर : बाजार समितीचे व्यवहार पूर्ववत सुरू असले तरी फळांची आवक मात्र धीमीच आहे. आंबा वगळता अन्य फळांची आवक एकदम मंदावली आहे. कोराना रुग्णांचे प्रमाण जिल्ह्यात वाढल्यामुळे प्रशासनाने बाहेरुन येणाऱ्या वाहतुकीवर निर्बंध घातले आहे. भाजीपाला वाहतूक ही स्थानिक भागातून होते. फळांची आवक मात्र लांबून होत असल्याने लांबच्या जिल्ह्यातली व्यापारी जिल्ह्यात फळे पाठविण्यास फारसे उत्सुक नसल्याने याचा परिणाम आंबा वगळता इतर सर्व फळांवर झाला आहे.

बाहेरील जिल्ह्यातून फळांच्या वाहतुकीला येणाऱ्या अडचणी व मजुरांच्या अनुपलब्धतेमुळे फळांची आवक घटली आहे. गेल्या काही दिवसांपासून नियमित आवकेपेक्षा केवळ २५ टक्के फळांचीच आवक बाजार समितीत होत आहे. डाळिंब, द्राक्षे आदिंची आवक कमी झाली आहे. या फळांची आवक नाममात्रच होत असल्याने शहराबरोबर परिसरातही डाळिंब, द्राक्षे मिळणे अशक्य बनले आहे. गुरुवारी (ता. १) डाळिंबाची केवळ ७ कॅरेटची आवक झाली.
चिकूची दहा पोती आवक होती. चिकूस शेकडा २०० ते ४०० रुपये दर होता. संत्र्याची केवळ दोन बॉक्सची आवक होती. मोसंबीची ३५ चुमडी आवक होती. इतर फळांच्या तुलनेत आंब्याची आवक काहीशी वाढली आहे. कर्नाटकाबरोबर आता परराज्यातूनही आंब्याची आवक होत आहे. गुरुवारी तोतापूरी आंब्याची एक टन आवक झाली. तोतापूरी आंब्यास टनास १५००० ते १८००० रुपये दर मिळाला. हापूसच्या चार डझनाच्या पेटीस ५०० ते १३०० रुपये दर होता. मद्रास हापूसची आठशे पेट्या आवक झाली. या आंब्यास पेटीस ५०० ते ८०० रुपये दर होता.
- 1 of 1023
- ››