Agriculture news in Marathi In Kolhapur, the arrival of fruits has decreased | Page 2 ||| Agrowon

कोल्हापुरात फळांची आवक घटलेलीच

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 22 मे 2020

कोल्हापूर : बाजार समितीचे व्यवहार पूर्ववत सुरू असले तरी फळांची आवक मात्र धीमीच आहे. आंबा वगळता अन्य फळांची आवक एकदम मंदावली आहे. कोराना रुग्णांचे प्रमाण जिल्ह्यात वाढल्यामुळे प्रशासनाने बाहेरुन येणाऱ्या वाहतुकीवर निर्बंध घातले आहे. भाजीपाला वाहतूक ही स्थानिक भागातून होते. फळांची आवक मात्र लांबून होत असल्याने लांबच्या जिल्ह्यातली व्यापारी जिल्ह्यात फळे पाठविण्यास फारसे उत्सुक नसल्याने याचा परिणाम आंबा वगळता इतर सर्व फळांवर झाला आहे.

कोल्हापूर : बाजार समितीचे व्यवहार पूर्ववत सुरू असले तरी फळांची आवक मात्र धीमीच आहे. आंबा वगळता अन्य फळांची आवक एकदम मंदावली आहे. कोराना रुग्णांचे प्रमाण जिल्ह्यात वाढल्यामुळे प्रशासनाने बाहेरुन येणाऱ्या वाहतुकीवर निर्बंध घातले आहे. भाजीपाला वाहतूक ही स्थानिक भागातून होते. फळांची आवक मात्र लांबून होत असल्याने लांबच्या जिल्ह्यातली व्यापारी जिल्ह्यात फळे पाठविण्यास फारसे उत्सुक नसल्याने याचा परिणाम आंबा वगळता इतर सर्व फळांवर झाला आहे.

बाहेरील जिल्ह्यातून फळांच्या वाहतुकीला येणाऱ्या अडचणी व मजुरांच्या अनुपलब्धतेमुळे फळांची आवक घटली आहे. गेल्या काही दिवसांपासून नियमित आवकेपेक्षा केवळ २५ टक्के फळांचीच आवक बाजार समितीत होत आहे. डाळिंब, द्राक्षे आदिंची आवक कमी झाली आहे. या फळांची आवक नाममात्रच होत असल्याने शहराबरोबर परिसरातही डाळिंब, द्राक्षे मिळणे अशक्‍य बनले आहे. गुरुवारी (ता. १) डाळिंबाची केवळ ७ कॅरेटची आवक झाली.

चिकूची दहा पोती आवक होती. चिकूस शेकडा २०० ते ४०० रुपये दर होता. संत्र्याची केवळ दोन बॉक्‍सची आवक होती. मोसंबीची ३५ चुमडी आवक होती. इतर फळांच्या तुलनेत आंब्याची आवक काहीशी वाढली आहे. कर्नाटकाबरोबर आता परराज्यातूनही आंब्याची आवक होत आहे. गुरुवारी तोतापूरी आंब्याची एक टन आवक झाली. तोतापूरी आंब्यास टनास १५००० ते १८००० रुपये दर मिळाला. हापूसच्या चार डझनाच्या पेटीस ५०० ते १३०० रुपये दर होता. मद्रास हापूसची आठशे पेट्या आवक झाली. या आंब्यास पेटीस ५०० ते ८०० रुपये दर होता.


इतर बाजारभाव बातम्या
औरंगाबादेत द्राक्षांना क्विंटलला ६०००...औरंगाबाद : येथील बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. ९...
परभणीत शेवग्याला क्विंटलला ५००० ते ८०००...परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला...
आंबिया संत्र्याला मिळाला २२ हजार...नागपूर : बाजारात संत्र्याचे दर गडगडले असतानाच...
राज्यात कांदा २०० ते ३५०० रुपयेसोलापुरात प्रतिक्विंटला २०० ते ३५०० रुपये...
नाशिकमध्ये दोडक्याची आवक सर्वसाधारण;...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
खानदेशात मक्याची आवक कमीजळगावः खानदेशात प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
जळगावात आले प्रतिक्विंटल ३००० ते ५०००...जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (...
नागपुरात संत्रा, मोसंबीचे दर ‘जैसे थे’नागपूर : मागणीअभावी  संत्रा दरात घसरण झाली...
नगरला वाल, घेवड्याच्या दरात सुधारणानगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
पुण्यात हिरव्या मिरचीच्या दरात वाढ पुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
केळीदरात किंचित सुधारणाजळगाव ः खानदेशात दर्जेदार केळीचा तुटवडा असतानाच...
नाशिक जिल्ह्यात कांदा दरात सुधारणानाशिक : कांदा निर्यातबंदीचा निर्णय मागे...
नाशिकमध्ये वांगी सरासरी ३००० रुपयेनाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
दौंड बाजारात गहू १९५१ रुपये क्विंटलदौंड, जि. पुणे : दौंड तालुक्यात गव्हाची आवक ३०२...
कोल्हापुरात कांद्याची आवक वाढली कोल्हापूर : येथील बाजार समितीत कांद्याची...
जळगावात गवार २००० ते ४००० रुपयेजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (...
नगरमध्ये वांगी, कारल्याच्या दरात सुधारणानगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
नागपुरात संत्रा, मोसंबी दरात सुधारणानागपूर : संत्रा दरात काही अंशी सुधारणा झाली आहे....
पुण्यात भेंडी, काकडी, शेवगा दरांत...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
साताऱ्यात आल्याच्या दरात मोठी घसरणसातारा : कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी सुरू...