कोल्हापूर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आवाडे यांची पक्षाला सोडचिठ्ठी

कोल्हापूर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आवाडे यांची पक्षाला सोडचिठ्ठी
कोल्हापूर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आवाडे यांची पक्षाला सोडचिठ्ठी

कोल्हापूर ः काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व हुपरीच्या जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रकाश आवाडे यांनी बुधवारी (ता. ४) काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाचा व प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देऊन खळबळ उडवून दिली.

काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी राजीनामा दिल्याने जिल्ह्यातील काँग्रेसला मोठे खिंडार पडले आहे. गेल्या काही दिवसांपासून आवडे हे काँग्रेसमध्ये नाराज होते. याबाबत त्यांनी वरिष्ठांची चर्चाही केली होती. पण त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने अखेर श्री. आवाडे यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय जाहीर केला.

सायंकाळी उशिरा याबाबत इचलकरंजीत कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्येच ते अपक्ष म्हणून निवडणूक लढणार की शिवसेनेत प्रवेश करणार याची निश्चिती होणार असल्याचे सांगण्यात आले 

चार दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार धनंजय महाडिक यांनी सोलापूर येथे भाजपमध्ये प्रवेश केला. ही चर्चा ताजी असतानाच आवाडे यांनी राजीनामा दिल्याने काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला मोठा धक्का बसल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com