agriculture news in marathi, kolhapur in Crop threatens | Agrowon

कोल्हापूर जिल्ह्यात अतिपावसाने पिके धोक्यात

टीम अॅग्रोवन
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे आजरा, राधानगरी परिसरातील बहुतांशी पिकांना धोका निर्माण झाला आहे. सोयाबीन व इतर कडधान्यांची पिके कुजण्याचा धोका निर्माण झाल्याने आता हे दोन्ही तालुके अतिवृृष्टीग्रस्त म्हणून जाहीर करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी या तालुक्‍यातून होत आहेत.

नुकसानग्रस्त भागाची कृषी   विभागाकडून पाहणी करण्यात आली आहे. आजरा तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात विशेष करून ९२००५ या उसाच्या    जातीवर करपा, व तांबेऱ्याचा प्रादुर्भाव झाला आहे. तर काजूवरही बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे आजरा, राधानगरी परिसरातील बहुतांशी पिकांना धोका निर्माण झाला आहे. सोयाबीन व इतर कडधान्यांची पिके कुजण्याचा धोका निर्माण झाल्याने आता हे दोन्ही तालुके अतिवृृष्टीग्रस्त म्हणून जाहीर करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी या तालुक्‍यातून होत आहेत.

नुकसानग्रस्त भागाची कृषी   विभागाकडून पाहणी करण्यात आली आहे. आजरा तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात विशेष करून ९२००५ या उसाच्या    जातीवर करपा, व तांबेऱ्याचा प्रादुर्भाव झाला आहे. तर काजूवरही बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

आजरा तालुक्‍यातील पश्‍चिम भागामध्ये अतिपावसामुळे पिकावर दुष्परिणाम झाले आहेत. याची पाहणी कृषी महाविद्यालय, कोल्हापूर व कृषी विभागाकडून करण्यात आली. यामध्ये भात, काजू, ऊस व अन्य पिकांची पाहणी करण्यात आली. या पाहणीमध्ये प्राधान्याने ऊस, काजू पिकाबाबत परिस्थिती समजावून घेण्यात आली.
आवंडी येथे ऊस पिकावर तांबेरा व करपा रोगाचा प्रादुर्भाव प्राधान्याने को-९२००५ या जातीवर आढळून येत असून, यावर उपाय म्हणून पावसाचे प्रमाण कमी झाल्यावर रोगग्रस्त पिकावर १९-१९-१९ या खतमात्रेची फवारणी करावी, असे सूचविले.

भातपिकावर करपा, कडा करपा, तांबेरा, खोड कीड, पाणे खाणारी अळी, रस शोषणारी अळी यांचा प्रादुर्भाव अाहे. भुईमूग पिकावर वातावरणाच्या बदलामुळे टिक्का या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. किडी-रोगांच्या नियंत्रणासाठी शिफारस केलेल्या कीडनाशकांचा वापर कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार करावा असे कोल्हापूर येथील कृषी महाविद्यालयातील कीटकशास्त्रज्ञ डॉ. पांडुरंग मोहिते यांनी म्हटले आहे.

या वेळी आजरा पैकी करपेवाडी, आवंडी, गवसे, उचंगी या भागातील पीक पाहणी करण्यात आली. कृषी अधिकारी सी. डी. सरदेसाई, कृषी सहाय्यक एस. टी. गुरव, एस. आर. भोसले, बी. आर. दळवी, जी. के. नाईक उपस्थित होते.

काजूवरही परिणाम
फांदीमर रोग, बुरशीचा प्रादुर्भाव काजू पिकावर फांदीमर हा रोग व बुरशी झाल्याचे निदर्शनास आले. त्यावर संबंधित शेतकऱ्यांना उपाययोजनाही सुचविण्यात आल्या.

आजरा तालुक्यातील पश्चिम भागात अतिपावसामुळे पिके धोक्यात येत आहेत. त्याची आम्ही पाहणी करून उपाययोजनांची पाहणी केली आहे.
- के. एम. मोमीन, तालुका कृषी अधिकारी आजरा

भातावर निळे भुंगेरे, उसावर मावा, करपा रोग जास्त प्रमाणात दिसून येत आहे. शेतकऱ्यांनी कृषी महाविद्यालयाशी संपर्क साधून उपाययोजनांची माहिती घ्यावी.
- डॉ. पांडुरंग मोहिते, कीटकशास्त्र विभागप्रमुख, कोल्हापूर कृषी महाविद्यालय


इतर अॅग्रो विशेष
थेट पपई विक्रीतून मिळविला तिप्पट दर !परभणी ः कोरोनाच्या स्थितीमध्ये लॉकडाऊन व...
शेतमालाचे ऑनलाइन तारण कर्ज होणार उपलब्ध...मुंबई : टाळेबंदी कालावधीत शेतकऱ्यांना राज्य वखार...
अतिवृष्टी आणि अतिक्रमणामुळेच पूरस्थिती...मुंबई : अतिवृष्टी आणि अतिक्रमणामुळेच...
शेतकऱ्यांची अडवणूक झाली, तर...नगर : ‘‘शेतकऱ्यांसाठी काम करणे याला आपण सर्वांनी...
मॉन्सून अरबी समुद्रात; सोमवारपर्यंत...पुणे  : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून)...
सहकाराच्या त्रिस्तरीय रचना मोडण्यास...पुणे : राज्यातील काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
उद्यापासून पूर्वमोसमी पावसाचा अंदाज;...पुणे : राज्यात अक्षरशः भाजून काढणाऱ्या उन्हापासून...
`गोकुळ' ची ४५ लाख लिटर दुधावर प्रक्रिया कोल्हापूर ः लॉकडाउनच्या काळात कोल्हापूर...
पीककर्जासाठी हेलपाटे, भ्रष्ट...संग्रामपूर, जि. बुलडाणा : वेळ सकाळी साधारण...
टोळधाडीमुळे अवघे ५० हेक्‍टरचे नुकसान :...नागपूर: टोळधाडीचा धोका अमरावती विभागात टळला असला...
राज्यात ४० हजार टन दूध पावडर पडूनपुणे : राज्यात ४० हजार टन दूध पावडर (भुकटी) पडून...
मागणीपेक्षाही एक लाख क्विंटल बियाणे...पुणे : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन असले...
दुग्धव्यवसायातून शेतीला दिला सक्षम...आत्महत्याग्रस्त अशी ओळख असलेल्या यवतमाळ...
मॉन्सून मालदिवात दाखल; १ जूनलाच केरळात...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) सोमवारपर्यंत...
भारतीय किसान संघामार्फत शेतकऱ्यांनी...कोल्हापूर: भारतीय किसान संघाने लॉकडाउनच्या काळात...
लॉकाडाउनमध्येही शेतकऱ्यांकडून शेतमालाची...पुणे (प्रतिनिधी)ः कोरोना टाळेबंदी मध्ये शेतमालाची...
खानदेशात साठा वाढल्याने कापूस, सरकी...जळगाव : कापसाची शासकीय खरेदी खानदेशात मागील ६ मे...
राज्यातील २८० बाजार समित्या अडचणीत;...लातूर ः राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा...
उष्णतेच्या लाटेमुळे अकोल्यात केळीचे घड...अकोला  ः जिल्ह्यात या आठवड्यात वाढलेल्या...