कोल्हापूर जिल्ह्यातील ५२ बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर जिल्ह्यातील ५२ बंधारे पाण्याखाली
कोल्हापूर जिल्ह्यातील ५२ बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात पावसाचा जोर रविवारी (ता. १९) सकाळपर्यंत कायम होता. रविवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत आणखी बारा बंधारे पाण्याखाली गेले. पाण्याखाली गेलेल्या एकूण बंधाऱ्यांची संख्या ५२ इतकी झाली आहे. जिल्ह्यात दिवसभरात २६८.३७ मि.मी. पाऊस झाल्याची नोंद झाली. धरणातून विसर्ग सुरू झाल्याने जिल्ह्यातील नद्यांत हळूहळू पूरस्थिती निर्माण होत आहे.

गगनबावडा तालुक्‍यात सर्वाधिक ६८.५० मि.मी. पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात सरासरी २२.३६ टक्के पाऊस झाल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिली. सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे धरणातील विसर्ग वाढविणे पाटबंधारे विभागाला अपरिहार्य ठरत असल्याने सर्वच धरणांतून अखंडित विसर्ग सुरू आहे. कुंभी नदीवरील कळे हा एक बंधारा पाण्याखाली आहे. वेदगंगा नदीवरील निळपण, वाघापूर, कुरणी, सुरुपली, बस्तवडे, चिखली, म्हसव व गारगोटी हे आठ बंधारे पाण्याखाली आहेत.

ताम्रपर्णी नदीवरील कुतनवाडी हा एक बंधारा पाण्याखाली गेला आहे. कासारी नदीवरील यवलूज, ठाणे-आळवे, पुनाळ-तिरपन हे तीन बंधारे पाण्याखाली गेले आहेत. घटप्रभा नदीवरील पिळणी, कानडी सावर्डे, बिजूर भोगोली हे तीन बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तर कडवी नदीवरील कोपार्डे, शिरगाव, सातव व पाटण हे चार बंधारे गेल्या चोवीस तासांत पाण्याखाली गेले आहेत. यामुळे या बंधाऱ्यांवरून होणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आल्याचे पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी सागितले.

काही गावांचे रस्तेही बंद झाले आहेत. पंचगंगा नदीच्या पातळीत सातत्याने वाढ होत आहे. अद्याप तालुका मार्ग सुरू आहेत. मात्र, पावसाचा जोर असाच सुरू राहिल्यास हे मार्गंही बंद होण्याची शक्‍यता पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केली. कोयना धरणातून ४४०२५ क्युसेकने विसर्ग चालू आहे. अलमट्टी धरणातून १२८७७० क्युसेकने विसर्ग चालू आहे. राधानगरीतून १६००, दूधगंगा धरणातून ८०००, वारणेतून १०६२७, कडवीतून ८६५, कासारीतून ९००, तुळशीतून १२६२ क्युसेकने विसर्ग चालू आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com