कोल्हापूर जिल्ह्यास ३०० एकर तुती लागवडीचे उद्दिष्ट

कोल्हापूर जिल्ह्यास ३०० एकर तुती लागवडीचे उद्दिष्ट
कोल्हापूर जिल्ह्यास ३०० एकर तुती लागवडीचे उद्दिष्ट

कोल्हापूर : महारेशीम अभियानांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यास पुढील वर्षासाठी शासनाने नवीन तुती लागवडीसाठी ३०० एकर लागवडीचे उद्दिष्ट दिले असून यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी येत्या १५ दिवसांत ऑनलाइन नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी केले.

जिल्हा रेशीम कार्यालयाच्या वतीने १४ ते २९ डिसेंबर या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या महारेशीम अभियानाचा शुभारंभ जिल्हाधिकारी सुभेदार यांच्या हस्ते रेशीम रथास झेंडा दाखवून करण्यात आला, त्या वेळी ते बोलत होते.

निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा नियोजन अधिकारी सरीता यादव, रोहयोचे नायब तहसीलदार डी. एस. आसवले, रेशीम विकास अधिकारी पी. जे. पाटील, वरिष्ठ तांत्रिक सहायक बी. एम. खंडागळे आदी उपस्थित होते.

जिल्ह्यात मनरेगाअंतर्गत रेशीम शेतीवर शासनाने अधिक लक्ष केंद्रीत केले असून यावर्षी जिल्ह्यात रेशीम शेतीसाठी २६० एकराची नोंदणी झाली असून, आत्तापर्यंत ११० एकरांवर १०१ शेतकऱ्यांनी रेशीम लागवड केली आहे. मनरेगातंर्गत रेशीम लागवडीसाठी विशेष योजना राबविली जात असून आपल्या शेतात काम करून रोजगाराची संधी या योजनेतंर्गत शेतकऱ्यांना दिली जात आहे. या योजनेतंर्गत ३ वर्षांत ६८२ दिवसांचा रोजगार शेतावर काम करताना मिळत आहे. यासाठी प्रतिदिन ३०० रुपये दिले जातात. 

या योजनेचा लाभ जिल्ह्यात शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन रेशीम विकास अधिकारी श्री. पाटील यांनी केले. महारेशीम अभियानांतर्गत रेशीम शेतीसाठी शेतकऱ्यांच्या नोंदणीच्या कार्यक्रमासाठी समूहनिहाय आणि ग्रामपंचायतनिहाय कृती आराखडा तयार केला असून त्या ग्रामपंचायतंर्गत ग्रामसेवक, कृषी सहायक, तलाठी यांचेही साह्य घेण्यात येणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com