कोल्हापूर जिल्हा बँकेसाठी ३६८ उमेदवारांचे अर्ज

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी (ता. ३) ७५ उमेदवारांनी ९३ अर्ज दाखल केले.
For Kolhapur District Bank Applications of 368 candidates
For Kolhapur District Bank Applications of 368 candidates

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी (ता. ३) ७५ उमेदवारांनी ९३ अर्ज दाखल केले. एकूण २१ जागांसाठी २१४ उमेदवारांचे ३६८ अर्ज दाखल झाले आहेत. सोमवारी (ता. ६) अर्जांची छाननी होईल. मंगळवार (ता. २१) पर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे. 

दरम्यान, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व पालकमंत्री सतेज पाटील यांच्या विधान परिषदेवरील बिनविरोध निवडीनंतर कोल्हापूर जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीतही बिनविरोध विजयी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गगनबावडा संस्था गटातून पी. जी. शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज शेवटच्या मुदतीपर्यंत दाखल केला नव्हता. त्यामुळे दोन कार्यकर्त्यांचे डमी अर्ज मागे घेतल्यानंतर सतेज पाटील यांच्या बिनविरोध निवडीची औपचारिक घोषणा बाकी आहे. 

जिल्हा बॅंकेची निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे कागल तालुक्‍यातून ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, पन्हाळा तालुक्‍यातून आमदार विनय कोरे, करवीरमधून आमदार पी. एन. पाटील व हातकणंगलेमधून महादेवराव महाडीक यांचीही बिनविरोध निवड निश्‍चित मानली जात आहे. या गटात इतर इच्छुकांनी अर्ज भरला असला, तरीही ते मागे घेतले जाण्याची शक्‍यता आहे. यासाठी नेत्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. 

जिल्हा बॅंकेसाठी विविध गटांतून ३६८ अर्जांचा पाऊस पडला आहे. तालुकास्तरावरील १२ जागांवर दिग्गज नेत्यांनी दावा सांगून अर्ज दाखल केले आहेत. इतर गटांतील उमेदवारीसाठी इच्छुकांनी प्रचंड संख्येने अर्ज दाखल करून बिनविरोधसाठी नेत्यांची डोकेदुखी वाढवली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com