agriculture news in marathi, Kolhapur district in Flood shock Crop | Page 2 ||| Agrowon

कोल्हापूर जिल्ह्यातील पिकांना पुराचा फटका

टीम अॅग्रोवन
सोमवार, 30 जुलै 2018

कोल्हापूर : गेल्या पंधरवड्यात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील नदीकाठावरील सुमारे वीस हजार हेक्‍टर क्षेत्रावरील पिके पाण्याखाली गेली होती. पाणी चार ते पाच दिवस शिवारात राहिल्याने विशेष करून नदीकाठानजीक असणाऱ्या नुकताच लागवड झालेला ऊस, भात, सोयाबीनचे मोठे नुकसान झाल्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. अद्याप नेमके किती नुकसान झाल आहे,.

कोल्हापूर : गेल्या पंधरवड्यात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील नदीकाठावरील सुमारे वीस हजार हेक्‍टर क्षेत्रावरील पिके पाण्याखाली गेली होती. पाणी चार ते पाच दिवस शिवारात राहिल्याने विशेष करून नदीकाठानजीक असणाऱ्या नुकताच लागवड झालेला ऊस, भात, सोयाबीनचे मोठे नुकसान झाल्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. अद्याप नेमके किती नुकसान झाल आहे,.

याचा आकडा सामोरा आला नसला तरी किमान पाच हजार हेक्‍टरवरील विविध पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. विशेष करून लहान उसाचे सर्वाधिक नुकसान झाल्याने आता या शेतकऱ्यांना पुनर्लागवड करावे लागण्याची शक्‍यता आहे.
जिल्ह्यात सव्वा लाख हेक्‍टर क्षेत्रावर ऊस, एक लाख हेक्‍टर क्षेत्रावर भात, तर साठ हजार हेक्‍टर क्षेत्रावर सोयाबीनचे पीक आहे. जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात पुराचा मोठा फटका बसला आहे. एक ते दीड हजार हेक्‍टरवरील भातालाही याचा फटका बसल्याचा अंदाज आहे.

गगनबावडा, राधानगरी, करवीर, पन्हाळा तालुक्‍यातील अनेक गावांना पुराचा फटका बसला. पंचगंगा, वारणा, दूधगंगा, भोगावती, हिरण्यकेशी आदी नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडल्यानंतर तीन ते चार दिवस शिवारात थांबून राहिले. यामुळे कोवळ्या खरीप पिकांचे नुकसान जादा झाल्याची भीती आहे. धरणांतून पाणी सोडण्यात येत असल्याने पाणी ओसरण्याची गती धीमी राहिली. यामुळे अधिक नुकसान झाले.


इतर ताज्या घडामोडी
पावसाच्या आगमनानुसार पीक नियोजनकोरडवाहू शेतीमध्ये पावसाच्या पाण्याचा थेंब न थेंब...
गादीवाफ्यावर भुईमूग लागवड फायदेशीरजून महिन्याचा पहिल्या आठवडा ते शेवटचा आठवड्याच्या...
पुण्यातील पश्चिम तालुक्यांत हायअलर्ट...पुणे : अरबी समुद्रात आलेल्या निसर्ग...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात पाऊस नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ११८...
मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर सर्वांनी...औरंगाबाद : ‘‘मराठवाड्यासाठी वॉटर ग्रीड अत्यंत...
कोरोनाच्या संकटात कृषी, पणन खाते अपयशी...नाशिक : ‘‘कोरोनाच्या अडचणीच्या काळात शेतकऱ्यांचा...
परभणी जिल्ह्यात पीककर्जासाठी पेरणीच्या...परभणी : जिल्ह्यातील अनेक गावातील तलाठी पीककर्ज...
नगर जिल्ह्यात एकशे तीन टॅंकरने...नगर : उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढू लागल्याने...
टोकन प्रक्रियेत गैरप्रकार केल्यास...परभणी : ‘‘बाजार समित्यांमार्फत टोकन देण्याच्या...
हिंगोलीत १७ हजारावर शेतकऱ्यांच्या १८...हिंगोली : चालू खरेदी हंगामात जिल्ह्यात...
पुणे जिल्ह्यात पूर्वमोसमी पावसाच्या...पुणे ः जिल्ह्यात रविवारी (ता. ३१) सायंकाळी जोरदार...
मराठवाड्यातील ३६६ मंडळांत पूर्व मोसमी...औरंगाबाद  : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील...
सातारा जिल्ह्यात पावसाची हजेरीसातारा ः जिल्ह्यात रविवारी पूर्वमोसमी पावसाने...
‘पंदेकृवि’तर्फे उद्या खरीपपूर्व कृषी...अकोला ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या...
नगरमधील दहा तालुक्यांत जोरदार पाऊसनगर ः नगर जिल्ह्यात रविवारी (ता. ३१) दहा...
मराठवाड्यात बियाणे, खते खरेदीस वेग औरंगाबाद : मराठवाड्यातील सोयगाव, देगलूर, बिलोली,...
नाशिक जिल्ह्याच्या पूर्व भागात...नाशिक : जिल्ह्याच्या पूर्व भागात नांदगाव...
नाफेड केंद्रावर तूर विकण्याचा...अमरावती ः शेतकऱ्याच्या नावावर नोंदणी करुन हमीभाव...
हमीभावाने तूर-हरभरा खरेदीस मुदतवाढअमरावती ः लॉकडाउनमुळे हमीभावाने तूर व हरभरा...
सिंधुदुर्गात पावसाची दमदार हजेरीसिंधुदुर्ग ः सिंधुदुर्गात माॅन्सूनपूर्व पावसाने...