कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टीने भाताचे २५ हजार हेक्टरवर नुकसान

गेल्या काही दिवसांत सुरू असलेल्या अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे दोन दिवसांपासून सुरू केले आहेत. ते तातडीने पूर्ण केले जातील. - ज्ञानदेव वाकुरे,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टीने भाताचे २५ हजार हेक्टरवर नुकसान
कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टीने भाताचे २५ हजार हेक्टरवर नुकसान

कोल्हापूर  : जिल्ह्यात अतिवृष्टीने खरीप भाताचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या पंधरा दिवसांतील अतिवृष्टीने तब्बल २५ हजार हेक्‍टर क्षेत्रावरील भाताचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. भाताखालोखाल सोयाबीनही पावसाच्या तडाख्यात सापडले आहेत. अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे तातडीने सुरू केल्याची माहिती कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली. 

जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी गेले पंधरा दिवस अक्षरश: परीक्षा पाहणारे ठरले आहेत. महापुरातून सावरत असलेल्या शेतकऱ्याला वादळी पावसाचा मोठा तडाखा बसला. ज्या वेळी ऑगस्टमध्ये महापूर आला. त्या वेळी अतिवृष्टी होऊनही भात पक्वतेच्या अवस्थेकडे जात होते. यामुळे पूर्ण नुकसान झाले नाही. पण सध्या धूळवाफ व आगाप पेरण्या केलेला भात पक्व झालेला आहे. तो कापणीस येत आहे. नेमका त्याच वेळी जोरदार पाऊस सरू आहे.

मशागतीसाठी केलेल्या खळ्याचे तळे होत असल्याने कापणी केलेला भात पूर्णपणे खराब होत आहे. दिवसभर कडक ऊन पडून सायंकाळी जोरदार पावसाचा दणका बसत असल्याने शेतकऱ्यांनाही भाताची काढण करावी की नाही या संभ्रमात टाकले आहे. याचा जबरदस्त फटका भाताच्या मळणीस बसला आहे. 

दिवसेंदिवस भाताची कापणीस विलंब होत असल्याने भात शेतातच खराब होत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. जिल्ह्यात एक लाख १० हजार हेक्‍टर क्षेत्रावर भाताचे पीक आहे. कृषी विभागाच्या अंदाजानुसार साधारणत: २५००० हेक्‍टवरील भाताला मोठे    नुकसान पोचले आहे. सोयाबीनचे लागवड क्षेत्र ५० हजार हेक्‍टर आहे. यापैकी पूर्व भागात सुमारे दहा हजार हेक्‍टरवरील सोयबीनलाही या पावसाचा दणका बसल्याचा अंदाज आहे. दरम्यान, महापूर व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची आढावा जिल्ह्यातील काँग्रेसच्या पाचही आमदारांनी बुधवारी (ता. ३०) घेऊन मदतीची मागणी केली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com