कोल्हापूर जिल्ह्यात तणाव

कोल्हापूर जिल्ह्यात तणाव
कोल्हापूर जिल्ह्यात तणाव

कोल्हापूर : आरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेल्या सकल मराठा समाजाने केलेल्या आंदोलनामुळे कोल्हापूर जिल्ह्यात तणावाची परिस्थिती राहिली. शहरात ‘एक मराठा लाख मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी’ या जयघोषात सकल मराठा समाजातर्फे काढण्यात आलेल्या दुचाकी फेरीने शहरातील दुकाने पटापट बंद झाली. दसरा चौकातून दुपारी बारा वाजता या फेरीस सुरवात झाली.

कोंडा ओळ, उमा टाॅकीज, टेंबे रोड, देवल क्लब, मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड पापाची तिकटी या मार्गे ही फेरी काढण्यात आली. दरम्यान, दसरा चौकात दिवसभर ठिय्या आंदोलन केले. श्रीमंत शाहू महाराज छत्रपती महाराज, आमदार सतेज पाटील, राजेश क्षीरसागर आदींसह मराठा समाजाच्या लोकप्रतिनिधींनी या आंदोलनात भाग घेतला. सरकारने तातडीने निर्णय घेतला नाही, तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा यावेळी समाजाच्या नेत्यांनी दिला.

जिल्ह्यात अनेक ठिकाणी बसवर दगडफेक तसेच टायरी जाळून रस्ते बंद करून निषेध करण्यात आला. दत्तवाड (ता. शिरोळ) जयसिंगपूर व इचलकरंजी येथे बसवर दगडफेक करण्यात आली आहे. शिरोळ कागल, बिद्री येथे रास्ता रोको करण्यात आला. बहुतांशी शाळांना सुटी देण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com