Agriculture news in marathi In Kolhapur district, sugarcane cultivation is now in full swing only after June | Agrowon

कोल्हापूर जिल्ह्यात आता ऊस लागवडीला जूननंतरच वेग

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 28 एप्रिल 2020

कोल्हापूर : जिल्ह्यात सध्या ऊस लागवडीच्या कामांनी विश्रांती घेतली आहे. कारखाने बंद झाल्यानंतर जिल्ह्यात नव्या ऊस लागवडींनाही ब्रेक मिळतो. आता नव्या आडसाली लागवडी जूननंतरच सुरु होतील, अशी शक्‍यता आहे. 

कोल्हापूर : जिल्ह्यात सध्या ऊस लागवडीच्या कामांनी विश्रांती घेतली आहे. कारखाने बंद झाल्यानंतर जिल्ह्यात नव्या ऊस लागवडींनाही ब्रेक मिळतो. आता नव्या आडसाली लागवडी जूननंतरच सुरु होतील, अशी शक्‍यता आहे. 

महापुरानंतर ऊस तोडणीचा कार्यक्रम अपेक्षेप्रमाणे लवकर संपला नाही. जिल्ह्यातील पूर्व भागात एप्रिल मध्यापर्यंत ऊस तोडणी सुरु होती. यातच ‘कोरोना’च्या संकटामुळे शेतकामावरही मोठा परिणाम झाला. एप्रिलमध्ये ऊस तोडणी सुरु असलेल्या शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीस सामोरे जावे लागले. ज्या शेतकऱ्यांची ऊस तोडणी एप्रिलमध्ये झाली, ते आता आडसाली लागवडीला प्राधान्य देतील, अशी शक्‍यता आहे. अनेक ठिकाणी लागवडीचा वेळ वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी ऊस रोपांनाही प्राधान्य दिले. 

डिसेंबर ते फेब्रुवारीपर्यंत बहुतांशी ठिकाणी यंदा ऊस लागवडी झाल्या आहेत. या उसाला मशागतीची गरज आहे. या उसाच्या मशागतीसाठी शेतकरी गडबड करीत आहेत. लॉकडाउन सुरु झाल्यानंतर एप्रिलच्या पूर्वाधात युरियाची मोठी टंचाई निर्माण झाली होती. आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याचे चित्र आहे. 

मुबलक खत पुरवठ्याची शक्यता 

खताचे रेक दाखल होत असल्याने येत्या काही दिवसांत युरियासह अन्य खतांचा मुबलक पुरवठा होण्याची शक्‍यता आहे. ‘लॉकडाउन’मधून कृषी निविष्ठा विक्रेत्यांना सूट दिल्याने खते, औषधे मिळण्याचा शेतकऱ्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे सध्या जसे बैलजोड्या, ट्रॅक्‍टर, आदी मशागतीची साधने उपलब्ध होतील. तशी मशागत उरकण्याकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे. 
 


इतर ताज्या घडामोडी
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...
शेतमाल स्थानिक भागात विकला जाणार : भुजबळनाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी समाज...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचे थैमाननांदेड : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नाशिक विभागात कांदा लागवडीत ८ हजार...नाशिक : चालू वर्षी खरीप कांद्याच्या लागवडीपूर्वी...
रावेर तालुक्यात सीएमव्ही नुकसानीचे...जळगाव ः कुकुंबर मोसॅक विषाणूमुळे (सीएमव्ही)...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकाला...हिंगोली : जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून...
मराठवाड्यात अतिपाऊस खरीप पिकांच्या...औरंगाबाद : मराठवाड्यात गत काही दिवसांपासून...
धुळ्यात लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक...धुळे : धुळे जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत...
पावसाचा डाळींब पिकाला तडाखाआटपाडी, जि. सांगली ः अवर्षण प्रवण असलेल्या आटपाडी...
मायक्रो फायनान्सचे चक्रव्यूह...मुंबई : ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्त पुरवठा...
नगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा चार हजार...नगर ः यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून चांगला...
कोकण कृषी विद्यापीठात बांबू कार्यशाळेचे...दापोली, जि. रत्नागिरी : जगभरात दरवर्षी १८...
अकोला जिल्ह्यातील सहा खत विक्रेत्यांचे...अकोला ः या हंगामात खत विक्रीत मोठ्या प्रमाणात...
सदोष बियाणेमुळे भेंडी बीजोत्पादक अडचणीतबुलडाणा ः लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांनी या...
भातपीक कापणीत पावसाचा अडसररत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने...
ठाण्यातील १४ हजार हेक्टर पिकांचा काढला...मुंबई : ठाणे जिल्हा कृषी विभागाने यंदा पंतप्रधान...
औरंगाबादमध्ये कांदा ३०० ते २३०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
आरोग्यदायी विड्याचे पानकोणत्याही धार्मिक कार्यात, पूजेच्या ठिकाणी...