agriculture news in marathi Kolhapur district was lashed by rains | Page 2 ||| Agrowon

कोल्हापूर जिल्ह्याला पावसाने झोडपले

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 23 जुलै 2021

कोल्हापूर : जिल्ह्याला बुधवारी (ता.२१) दुपारपासून पावसाने अक्षरशः झोडपून काढले. जिल्ह्यात सर्वदूर पावसाचा तडाखा सुरू आहे. नद्यांचे पाणी वाढल्याने जिल्ह्यात अस्वस्थता वाढली आहे. गगनबावडा तालुक्‍यात सर्वाधिक २२६ मि.मी पावसाची नोंद झाली.

कोल्हापूर : जिल्ह्याला बुधवारी (ता.२१) दुपारपासून पावसाने अक्षरशः झोडपून काढले. जिल्ह्यात सर्वदूर पावसाचा तडाखा सुरू आहे. नद्यांचे पाणी वाढल्याने जिल्ह्यात अस्वस्थता वाढली आहे. गगनबावडा तालुक्‍यात सर्वाधिक २२६ मि.मी पावसाची नोंद झाली. कोल्हापूर शहरातील उपनगरांना ही ओढ्याच्या पुराचा तडाखा बसला. 

जिल्ह्यात बुधवारी दुपारपर्यंत गेल्या ४८ तासांत सलग मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी ३९ फुटांपर्यंत पोचली. जिल्ह्यातील ८१ बंधारे पाण्याखाली आहेत. खोची ते सांगली जाणारी वाहतूक बंद आहे. गगनबावडा मार्गबंद असून शाहूवाडी, राधानगरी भागातील ही अनेक रस्ते वाहतुकीस बंद आहेत. दुपारनंतर कोयना व वारणा धरणातून पाणी सोडण्यात आल्याने नदीकाठच्या ग्रामस्थांना सावधानतेचा इशारा देण्यात आला. 

विविध बंद असलेले मार्ग

कोल्हापूर - रत्नागिरी मार्ग, मलकापूर ते कोल्हापूर - हा मार्ग. मालेवाडी ते सोंडोली. शित्तूर वारूंन शिराळे वारून उखळू खेडे सोंडोली कडे जाणारा रस्ता. मलकापूर ते अनुस्कुरा मार्ग. मलकापूर ते शिरगाव मार्ग. चरण ते डोनोली मार्ग.

 करंजफेन, माळापुडे, पेंढाखळे मार्ग. करुंगळे ते निळे व कडवे ते निळे मार्ग. उचत ते परळे मार्ग. गगनबावडा ते कोल्हापूर मार्ग. 
गडहिंग्लज - पोवाडे, नांगनूर, व निलजे हा मार्ग. कांचनवाडी ते भाटणवाडी. शिरोली दुमाला, सडोली दुमाला, सावर्डे दुमाला, चाफोडी, गर्जन आरळे पर्यंतचा राज्य मार्ग, गडहिंग्लज- गारगोटी मार्ग. गारगोटी-कूर -कोल्हापूर रस्ता बंद असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

‘अलमट्टी’तून ९७ हजार क्युसेकने विसर्ग

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला ज्या धरणाच्या पाणी साठ्यामुळे पुराचा मोठा फटका बसतो. त्या अलमट्टी धरणातून सध्या ९७ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. यावर्षी धरण प्रशासनाने  वेळेत पाण्याचा विसर्ग करत कोल्हापूरसह सांगलीला दिलासा दिला आहे.


इतर ताज्या घडामोडी
शेतकऱ्यांना बियाण्यांबाबत स्वावलंबी...औरंगाबाद : ‘‘शेतकऱ्यांना बियाण्यांच्या बाबतीत...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पंधरा...परभणी  : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील १५...
परभणी जिल्ह्यात अतिवृष्टिग्रस्तांसाठी...परभणी ः जिल्ह्यात जुलै महिन्यात झालेल्या...
लखीमपूर हिंसाचार : आशिष मिश्राला ‘नोटीस...लखीमपूर, उत्तरप्रदेश ः येथील हिंसाचारप्रकरणी...
सत्तेचा दुरुपयोग सगळ्यांनाच दिसतो आहे...सोलापूर : ‘‘निवडणुकी आधी मला ईडीची नोटीस पाठवली,...
बुलडाण्यात खरीप हंगामात ९५० कोटी...बुलडाणा : अतिवृष्टी, पूर परिस्थितीने यंदाच्या...
साडेचार हजार रुपयांचा पहिला हप्ता उसाला...कुडित्रे, जि. कोल्हापूर : यंदा उसाला उत्पादन...
वादळी पावसामुळे ऊस उत्पादकांचे लाखोंचे...आर्णी, जि. यवतमाळ : संततार पाऊस, वादळाचा...
सांगली जिल्ह्यात रब्बीच्या पेरण्या सुरू सांगली : जिल्ह्यात रब्बी हंगामातील पेरण्यांना...
पुणे बाजार समिती सेस प्रवेशद्वारावर ...पुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती सह...
आंबा, काजू विमा परतावा मंडलनिहाय जाहीर सिंधुदुर्गनगरी : फळपीक विमा योजनेचा परतावा...
कंबोडियाची शाही नांगरणीशेती व्यवसायावर भर देणाऱ्या कंबोडियामध्ये...
कोरडवाहूमध्ये चिंचेची वनशेतीऔषधी गुणांमुळे चिंचेला भारतीय खजूर असे म्हणतात....
छापेमारीच्या हेतूबाबत आयकर विभागच सांगू...मुंबई ः राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांशी...
मराठवाड्यातील २३१ मंडलांत पाऊसपरभणी ः मराठवाड्यातील २३१ मंडलांत बुधवारी (ता. ६...
पुणे जिल्हा बँकेतर्फे रब्बी पीककर्ज...पुणे : खरीप हंगामात सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस...
रत्नागिरी : आंबा, काजू विमा परतावा ५३...रत्नागिरी ः वातावरणातील बदलामुळे नुकसान झालेल्या...
शेतकऱ्यांची वीज कापली; लोकप्रतिनिधी...जळगाव ः जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत...
आंबा प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी...रत्नागिरी ः पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया...
सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्षांवर...सोलापूर : नराळे (ता. सांगोला) येथील आरोग्य...