Agriculture news in Marathi In Kolhapur, farmers closed onion deals | Agrowon

कोल्हापुरात कांद्याचे सौदे शेतकऱ्यांनी बंद पाडले

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 24 सप्टेंबर 2020

कांद्याच्या दरात घसरण झाल्याने कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. २३) शेतकऱ्यांनी सौदे बंद पाडले. कांद्याच्या दरात १००० ते १५०० रुपये प्रतिक्विंटल घसरण झाल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या कार्यालयाजवळ एकत्र येत संताप व्यक्त केला.

कोल्हापूर : कांद्याच्या दरात घसरण झाल्याने कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. २३) शेतकऱ्यांनी सौदे बंद पाडले. कांद्याच्या दरात १००० ते १५०० रुपये प्रतिक्विंटल घसरण झाल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या कार्यालयाजवळ एकत्र येत संताप व्यक्त केला. अखेर बाजार समितीचे सचिव मोहन सालपे, उपसचिव जयवंत पाटील यांच्या मध्यस्थीनंतर सौदे पूर्ववत सुरू झाले.

गेल्या दोन दिवसांत कांद्याच्या दरात चांगली वाढ झाल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण होते. परंतु बुधवारी (ता. २३) बाजार सुरू होताच कांद्याच्या दरात मागील दराच्या तुलनेत प्रतिकिलो १० ते १५ रुपयांची घसरण झाल्याने शेतकरी संतप्त झालेत. शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या कार्यालयाकडे आपला मोर्चा वळवला. सचिव श्री. पाटील यांनी राज्यातील इतर बाजारपेठांचा आढावा घेऊन दराची माहिती घेतली. व्यापाऱ्याशी ही चर्चा करून दर कमी न करण्याच्या सूचना दिल्या. यानंतर सौदे पूर्ववत सुरू झाले.

दरम्यान, कांदा व्यापाऱ्यांच्या मते राज्यातील बहुतांशी बाजार समितीमध्ये कांद्याची आवक वाढल्याने दर कमी झाले. अचानक आवकेचे प्रमाण वाढल्याने दर घसरल्याचे कारण व्यापाऱ्यांनी दिले असले तरी सरासरीच्या प्रमाणातच बाजार समितीत कांद्याची आवक असल्याचे दिसून आले. कोल्हापूर बाजार समितीत दररोज ५० ते ५५ गाडी कांद्याची आवक असते, तीच आवक आजही आहे. तर मंगळवारी कांद्याचे दर ४२०० ते ४५०० रुपये प्रतिक्विंटल होते, तेच बुधवारी ३२०० ते ३५०० रुपयांपर्यंत खाली आल्याने शेतकरी आक्रमक झाले.

 


इतर ताज्या घडामोडी
नगर जिल्ह्यात दीड लाख हेक्टर पिकांची...नगर ः नगर जिल्ह्यात आॅक्टोबर महिन्याच्या...
पुणे विभागात सव्वापाच लाख हेक्टरचे...पुणे ः चालू वर्षी पावसाळ्याच्या जून ते ऑक्टोबर या...
वाशीममध्ये ‘पोकरा’च्या कामांना गती...वाशीम : जागतिक बँक अर्थसहाय्यीत नानाजी देशमुख...
कृषी कायद्यांवरून द्वेषपूर्ण राजकारण ः...अकोला ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक...
लाखांदूर तालुक्यात धान्य साठ्यासाठी सहा...भंडारा : जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील जिरोबा...
माथाडी कामगारांच्या वादात कोल्हापुरात...कोल्हापूर : येथील शाहू मार्केट यार्डातील गूळ...
जालना जिल्ह्यात १९० शेतकऱ्यांची बांबुला...जालना  : कृषी विज्ञान केंद्राच्या पुढाकाराने...
कापसाच्या पीक कापणीतून दोन गुंठ्यांत २...लोहगाव, जि. औरंगाबाद : लोहगाव महसूल मंडळाच्या...
रत्नागिरीत बारा हजार हेक्टरवरील भात,...रत्नागिरी ः जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे १०...
नांदेड जिल्ह्यात आर्द्रतेच्या नावाखाली...नांदेड : राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्‍...
मदत लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यांवर ः डॉ...परभणी : ‘‘नैसर्गिक संकटात राज्य सरकार...
देवळा तालुक्यात उन्हाळ कांद्याच्या...देवळा, जि. नाशिक : एका बाजूला कांदा खरेदी बंद...
पाच एकरातील सोयाबीनला लावली आगयवतमाळ : केवळ अतिवृष्टीग्रस्त (६५ मिलिमीटरवर)...
उद्या सर्व मंत्र्यांचे काळी फीत बांधून...मुंबई ः सीमाभागात दरवर्षी १ नोव्हेंबर हा कर्नाटक...
भोसे, मरवडे मंडलांतील १९६ द्राक्ष...मंगळवेढा, जि. सोलापूर ः गतवर्षीच्या...
सोलापूर जिल्ह्यात रोपवाटिका योजनेच्या...सोलापूर : जिल्ह्यातील भाजीपाला उत्पादनाला...
पंढरपूर बाजार समितीत वजनावर केळीची...सोलापूर : पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
विदर्भ, मराठवाड्यात गुरुवारपासून आंदोलन...अकोला ः आॅक्टोबरमधील परतीच्या पावसाने संपूर्ण...
‘स्वाभिमानी’ची ऊस परिषद सोमवारी ऑनलाइनकोल्हापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या...
रब्बी हंगामातील पिकांचे व्यवस्थापनरब्बी पिकांच्या लागवडीसाठी योग्य जमिनीची निवड,...