कोल्हापुरात घेवडा प्रतिदहा किलो ३०० रुपये

कोल्हापुरात घेवडा प्रतिदहा किलो ३०० रुपये
कोल्हापुरात घेवडा प्रतिदहा किलो ३०० रुपये

कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या सप्ताहात घेवडा, गवारीचे दर तेजीत राहिले. घेवड्यास दहा किलोस २५० ते ३०० रुपये दर मिळाला. गवारीस दहा किलोस १२० ते ५०० रुपये दर होता. टोमॅटोची वाढलेली आवक कायमच होती. सप्ताहात टोमॅटोची दररोज दोन ते अडीच हजार कॅरेट आवक झाली. टोमॅटोस दहा किलोस २०० ते ३५० रुपये दर होता. ओल्या मिरचीची दररोज सातशे ते आठशे पोती आवक होती. वांग्याची दररोज आठशे ते नऊशे पोती आवक झाली. वांग्यास दहा किलोस ६० ते ३५० रुपये दर मिळाला.  

ओल्या मिरचीस दहा किलोस २०० ते ३५० रुपये दर मिळाला. ओल्या मिरचीच्या आवकेत मोठी वाढ झाल्याने मिरचीच्या दरात फारशी वाढ झाली नसल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सागितले. टोमॅटो व मिरचीची आवक वाढल्याने दोन्हीच्या दरात या सप्ताहात फारशी वाढ झाली नाही. गेल्या सप्ताहाच्या तुलनेत कारली, भेंडी वरण्याच्या आवकेतही वाढ झाली. कारलीची चारशे ते पाचशे पाट्या आवक होती. कारल्यास दहा किलोस ८० ते ३०० रुपये दर होता. भेंडीची दररोज पाचशे ते सहाशे पोती आवक होती. भेंडीस दहा किलोस ७० ते २६० रुपये दर होता. वरण्याची दीडशे ते दोनशे पोती आवक होती. वरण्यास दहा किलोस १२० ते ३१० रुपये दर होता. पश्‍चिम भागातून वरण्याची आवक होत असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.

पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीची दररोज पंचवीस ते तीस हजार पेंढ्या आवक झाली. कोथिंबिरीस शेकडा २०० ते ५०० रुपये दर होता. मेथीची दररोज सहा ते सात हजार पेंढ्या आवक झाली. मेथीस शेकडा ३०० ते ८०० रुपये दर मिळाला. पालक, पोकळा, शेपूस शेकडा ३०० ते ८०० रुपये दर मिळाला. फळांमध्ये पेरूची दररोज शंभर ते दीडशे डाग आवक झाली. शंभर नगाच्या एका डागास ८० ते १५० रुपये दर मिळाला. डाळिंबाची दररोज सरासरी दीडशे कॅरेटची आवक झाली. डाळिंबास प्रतिकिलो २० ते ७० रुपये दर मिळाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com