‘गोकुळ’च्या अध्यक्ष बदलाच्या हालचाली

गोकुळ डेअरी
गोकुळ डेअरी

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध संघाची (गोकूळ) वार्षिक सभा पाऊण तासाच्या आतच गुंडाळल्यानंतर आता विद्यमान अध्यक्षांसह गोकूळच्या प्रशासनाला सर्वच स्तरातून नाराजीचा सामना करावा लागत आहे. याचा परिणाम संघाचे अध्यक्ष बदलण्यात होतो का याबाबत उत्सुकता लागली आहे.

संघाच्य कोणत्याही पदावर नसताना माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी भाषण करणे व अहवाल मिळाला का असे सांगत विषयांचे वाचन करण्यापूर्वीच ते मंजूर म्हणून सभा गुंडाळणे या प्रकाराबाबत सभासदांमधून प्रचंड नाराजी व्यक्त होत अाहे. त्यात आता संचालकांमध्येही याबाबत मतभेद असल्याचे उघड होत आहे.
विद्यमान अध्यक्ष विश्‍वास पाटील यांच्या विरोधात असलेले संचालक या गोष्टींचे भांडवल करून त्यांना हटविण्याच्या प्रयत्नात आहेत. खरे तर संस्था नियमन माहित असतानाही श्री. महाडिक यांच्याकडे अहवाल वाचन करावयास देणे हेच मुळात चुकीचे होते. पण त्याबाबत कोणताही आक्षेप श्री. पाटील यांनी न घेता संचालक नसलेल्या व्यक्तीनेच सभा गुंडाळली.
कोणतीही चर्चा न होता झालेली सभा ही संचालकांनाही रुचली नाही. विरोधकांनी मांडलेल्या प्रश्‍नांची उत्तरे देणे संचालक मंडळाला क्रमप्राप्त होते. पण त्याची दखलही न घेता गुंडाळलेली सभा रोषाचे कारण ठरली आहे. संस्था नियमानुसार सभा झालेली नसल्यास ती पुन्हा घेता येईल का याबाबतही काही घटक प्रयत्न करीत आहेत. पण नियमाच्या अपरोक्ष कृती करून श्री. पाटील हे रोषाचे कारण ठरले आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com