कोल्हापूरचा साखर उतारा यंदाही राज्यात सर्वाधिक 

राज्यात यंदाही साखर उताऱ्याच्या बाबतीत कोल्हापूर विभागाने बाजी मारली आहे. यंदाच्या हंगामाच्या १० एप्रिल अखेरच्या आकडेवारीनुसार कोल्हापूर व सांगली जिल्ह्याच्या कारखान्यांनी ११.९९ टक्के साखर उतारा कायम ठेवत राज्यात साखर उत्पादनात अव्वल स्थान पटकाविले आहे.
Kolhapur has the highest sugar yield in the state
Kolhapur has the highest sugar yield in the state

कोल्हापूर : राज्यात यंदाही साखर उताऱ्याच्या बाबतीत कोल्हापूर विभागाने बाजी मारली आहे. यंदाच्या हंगामाच्या १० एप्रिल अखेरच्या आकडेवारीनुसार कोल्हापूर व सांगली जिल्ह्याच्या कारखान्यांनी ११.९९ टक्के साखर उतारा कायम ठेवत राज्यात साखर उत्पादनात अव्वल स्थान पटकाविले आहे. १०३ लाख टनापैकी २७ लाख टन साखर केवळ कोल्हापूर विभागात तयार झाली आहे. राज्यातील १८६ पैकी ११८ कारखान्यांचा हंगाम संपुष्टात आला आहे. 

राज्यात कोल्हापूर व सांगली जिल्हे साखर उत्पादनाच्या बाबतीत अग्रेसर आहेत. इतर भागाच्या तुलनेत या दोन्ही जिल्ह्यांत असणारे बारमाही पाणी व ऊस शेतीस अनुकुल हवामानामुळे दोन्ही जिल्ह्यातील ऊस उत्पादक पट्यातील उसाचे उत्पादन जादा असते. चांगल्या जमिनीमुळे उताराही १२ ते १२.५० टक्केपर्यंत असतो. यंदाही साखर उताऱ्याच्या बाबतीत सरासरी इतकी आकडेवारी विभागाने गाठली आहे. 

या कालावधीत राज्यात ९८४ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. सरासरी १०.४७ टक्के उताऱ्याने १०३ लाख टन साखर उत्पादित झाली आहे. राज्यात यंदा १८९ साखर कारखान्यांनी हंगाम सुरू केला होता. ९५ सहकारी तर ९४ खासगी कारखान्यांचा समावेश होता. पूर्ण क्षमतेने हंगाम सुरू झाल्यानंतर दररोज ७ लाख टन उसाचे दैनंदिन गाळप राज्यातील साखर कारखान्यांनी केले. पहिल्या दीड ते दोन महिन्यांत गाळपात मागे पडलेल्या कोल्हापूर विभागातील साखर कारखान्यांनी २३० लाख टन ऊस गाळप करीत २७ लाख टन साखरेचे उत्पादन करीत अग्रस्थान मिळवले. या खालोखाल पुणे विभागाने २२४ लाख टन ऊस गाळप करीत २४ लाख टन साखरेची निर्मिती केली. 

यंदाची ऊस हंगामाची स्थिती १० एप्रिल अखेर (लाख टनात)
विभाग ऊस गाळप साखर उत्पादन साखर उतारा
कोल्हापूर २३०.३९ २७ ११.९९ 
पुणे  २२४.०१ २४ १०.९१
सोलापूर  १७५.७० १६ ९.३७
नगर  १५९.०९ १५ ९.७८
औरंगाबाद  ९२.७२ ८.९३
नांदेड  ९२.२५ ९.९७
अमरावती  ५.८२ ०.५ ८.९३
नागपूर  ४.१४ ०.३ ९.०३
एकूण  ९८४.१२ १०३.७२ १०.४७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com