कोल्हापुरात फळांची आवक मंदावली, मागणीतही घट

कोल्हापुरात फळांची आवक मंदावली, मागणीतही घट
कोल्हापुरात फळांची आवक मंदावली, मागणीतही घट

कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या सप्ताहात टोमॅटोच्या आवकेत वाढ कायम होती. टोमॅटोत दहा किलोस १० ते ९० रुपये दर मिळाला. ओली मिरचीची दररोज दोनशे ते तीनशे पोती आवक झाली. ओल्या मिरचीस दहा किलोस १०० ते २३० रुपये दर मिळाला. गणेशोत्सवाच्या प्रारंभी असणारी फळांची आवक सप्ताहाच्या शेवटी शेवटी मंदावली. मागणीतही काहीशी घट असल्याने गणेशोत्सवाच्या प्रारंभी असणाऱ्या फळांच्या दरात दहा ते पंधरा टक्‍क्‍यांनी घट आल्याचे फळ बाजारातील सूत्रांनी सांगितले.

वांग्याची दररोज पाचशे ते सहाशे करंड्या आवक झाली. वांग्यास दहा किलोस ३०० ते ५०० रुपये दर मिळाला. ढोबळी मिरचीची दररोज चारशे ते पाचशे पोती आवक होती. ढोबळी मिरचीस दहा किलोस ५० ते १७० रुपये दर मिळाला. कारल्याची शंभर ते सव्वाशे पोती आवक झाली. कारल्यास दहा किलोस ७० ते १५० रुपये दर मिळाला. भेंडीची दररोज शंभर ते सव्वाशे पोती आवक झाली. भेंडीस दहा किलोस ५० ते २०० रुपये दर मिळाला.

गेल्या पंधरा दिवसांत भाजीपाल्याच्या दरात विशेष वाढ झाली नसल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. कोथिंबिरीची दररोज एकोणीस ते वीस हजार पेंढ्या आवक होती. कोथिंबिरीस शेकडा १०० ते ७०० रुपये दर मिळाला. मक्का कणसाची शंभर ते तीनशे नग आवक झाली. मका कणसास शेकडा १०० ते ३५० रुपये दर मिळाला. मेथीस शेकडा २०० ते ६०० रुपये दर होता. मेथीची दहा हजार पेंढ्या आवक झाली. पालक, पोकळा, शेपू आदी भाजीपाल्याची दररोज दोन ते तीन हजार पेंढ्या आवक होती. या भाज्यांना शेकडा ५०० ते ६०० रुपये दर होता. फळांमध्ये डाळिंबाची दररोज वीस ते पन्नास पेट्या आवक झाली. डाळिंबास किलोस ५ ते २० रुपये किलो रुपये दर होता. अननस डझनास १०० ते २०० रुपये दर मिळाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com