कोल्हापुरात कांदा १२० ते ४०० रुपये दहा किलो

कोल्हापूरकृषी उत्पन्न बाजार समितीत गत सप्ताहात कांद्यास १२० ते ४०० रुपये प्रति दहा किलो असा दर मिळाला. बाजार समितीत दररोज सहा ते आठ हजार पोती कांद्याची आवक झाली.
कोल्हापुरात कांदा १२० ते ४०० रुपये दहा किलो
कोल्हापुरात कांदा १२० ते ४०० रुपये दहा किलो

कोल्हापूर: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गत सप्ताहात कांद्यास १२० ते ४०० रुपये प्रति दहा किलो असा दर मिळाला. बाजार समितीत दररोज सहा ते आठ हजार पोती कांद्याची आवक झाली. पावसामुळे गेल्या सप्ताहापासून बाजार समितीत कांद्याची आवक कमी जास्त होत आहे, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. यंदाच्या हंगामातील गुळ रवे बाजार समितीत येण्यास प्रारंभ झाला आहे. सध्या दररोज दोन ते चार हजार गुळ रवे बाजार समितीत येत आहेत. गुळास ३८०० ते ४५०० रुपये क्विंटलपर्यंत दर मिळत आहे. गत सप्ताहात टोमॅटो आवकेतील वाढ कायम राहिली. टोमॅटोची दररोज अडीच ते तीन हजार कॅरेट आवक होती. टोमॅटोला २०० ते ३५० रुपये प्रतिदहा किलो असा दर होता. वांग्याची ५५० ते ६०० करंड्या आवक होती. वांग्यास २०० ते ६०० रुपये प्रति दहाकिलो असा दर मिळाला. हिरव्या (ओल्या) मिरचीची ८०० ते १००० पोती आवक झाली. या मिरचीस १५० ते ३५० रुपये दहाकिलो असा दर होता. ढोबळी मिरचीच्या आवकेतील वाढ या सप्ताहात कायम राहिली. ढोबळी मिरचीस १५० ते ४०० रुपये दहा किलो असा दर होता. गवारीच्या आवकेत गत सप्ताहातही घट होती. गवारीची दररोज १५० ते २०० पोती आवक होती. गवारीस ३०० ते ८०० रुपये प्रति दहाकिलो असा दर मिळाला. गवारीच्या दरात गेल्या सप्ताहाच्या तुलनेत २० टक्‍क्‍यांनी वाढ झाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. कोथिंबिरीच्या आवकेत चांगली वाढ पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीच्या आवकेत गत सप्ताहात चांगलीच वाढ झाली. कोथिंबिरीची जवळ ३८ ते ४० हजार पेंढ्या इतकी आवक होती.  कोथिंबिरीस शेकडा ४०० ते १६०० रुपये दर दर मिळाला.  मेथीची आवक नियमित होती. मेथीची आठ ते दहा हजार पेंढ्या आवक झाली. मेथीस शेकडा ५०० ते ८०० रुपये दर होता. पालक, पोकळा, शेपू या भाज्यांना शेकडा ७०० ते १४०० रुपये दर मिळाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com