agriculture news in marathi Kolhapur onion rate between 120 to 400 per ten Kilo | Agrowon

कोल्हापुरात कांदा १२० ते ४०० रुपये दहा किलो

राजकुमार चौगुले
मंगळवार, 29 सप्टेंबर 2020

कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत गत सप्ताहात कांद्यास १२० ते ४०० रुपये प्रति दहा किलो असा दर मिळाला. बाजार समितीत दररोज सहा ते आठ हजार पोती कांद्याची आवक झाली. 

कोल्हापूर: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गत सप्ताहात कांद्यास १२० ते ४०० रुपये प्रति दहा किलो असा दर मिळाला. बाजार समितीत दररोज सहा ते आठ हजार पोती कांद्याची आवक झाली. पावसामुळे गेल्या सप्ताहापासून बाजार समितीत कांद्याची आवक कमी जास्त होत आहे, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

यंदाच्या हंगामातील गुळ रवे बाजार समितीत येण्यास प्रारंभ झाला आहे. सध्या दररोज दोन ते चार हजार गुळ रवे बाजार समितीत येत आहेत. गुळास ३८०० ते ४५०० रुपये क्विंटलपर्यंत दर मिळत आहे. गत सप्ताहात टोमॅटो आवकेतील वाढ कायम राहिली. टोमॅटोची दररोज अडीच ते तीन हजार कॅरेट आवक होती. टोमॅटोला २०० ते ३५० रुपये प्रतिदहा किलो असा दर होता.

वांग्याची ५५० ते ६०० करंड्या आवक होती. वांग्यास २०० ते ६०० रुपये प्रति दहाकिलो असा दर मिळाला. हिरव्या (ओल्या) मिरचीची ८०० ते १००० पोती आवक झाली. या मिरचीस १५० ते ३५० रुपये दहाकिलो असा दर होता. ढोबळी मिरचीच्या आवकेतील वाढ या सप्ताहात कायम राहिली. ढोबळी मिरचीस १५० ते ४०० रुपये दहा किलो असा दर होता.

गवारीच्या आवकेत गत सप्ताहातही घट होती. गवारीची दररोज १५० ते २०० पोती आवक होती. गवारीस ३०० ते ८०० रुपये प्रति दहाकिलो असा दर मिळाला. गवारीच्या दरात गेल्या सप्ताहाच्या तुलनेत २० टक्‍क्‍यांनी वाढ झाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

कोथिंबिरीच्या आवकेत चांगली वाढ
पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीच्या आवकेत गत सप्ताहात चांगलीच वाढ झाली. कोथिंबिरीची जवळ ३८ ते ४० हजार पेंढ्या इतकी आवक होती.  कोथिंबिरीस शेकडा ४०० ते १६०० रुपये दर दर मिळाला.  मेथीची आवक नियमित होती. मेथीची आठ ते दहा हजार पेंढ्या आवक झाली. मेथीस शेकडा ५०० ते ८०० रुपये दर होता. पालक, पोकळा, शेपू या भाज्यांना शेकडा ७०० ते १४०० रुपये दर मिळाला.


इतर बाजारभाव बातम्या
नाशिकमध्ये वांगी सरासरी ८५०० रुपये...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या...
सांगलीत गूळ सरासरी ३६३३ रुपये...सांगली : येथील बाजार समितीत मंगळवारी (ता. २७)...
उत्पादन घटल्याने झेंडूच्‍या फुलांनी...नाशिक : दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर झेंडू फुलांना...
नाशिकमध्ये वालपापडी, घेवड्याची आवक वाढलीनाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नगरमध्ये गवार, वांग्याच्या दरात तेजीनगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
सोलापुरात घेवडा, वांग्याचे दर पुन्हा...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
सोयाबीनमध्ये तेजीचाच कलअकोला ः या हंगामातील सोयाबीन काढणी जोरात सुरू...
पुण्यात दसऱ्यानिमित्त फुलबाजार फुलला पुणे ः कोरोना संकटामुळे मार्चपासून सलग पाच...
औरंगाबादमध्ये कांदा सरासरी ३५०० रुपये औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
परभणीत रताळी १३५० रूपये प्रतिक्विंटलपरभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
राज्यात केळी ४०० ते ११०० रुपये क्विंटलनाशिकमध्ये ४०० ते १००० रूपये प्रतिक्विंटल...
नाशिकमध्ये दोडका सरासरी ४१६५ रूपये नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नगरमध्ये भाजीपाल्याच्या दरात सुधारणा नगर : येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार...
कोल्हापुरात भाजीपाल्याच्या दरात वाढकोल्हापूर :  येथील बाजार समितीत या सप्ताहात...
सोलापुरात गवार, घेवडा, भेंडीतील तेजी...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नाशिकमध्ये डाळिंबाची आवक सर्वसाधारण; दर...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नागपुरात सोयाबीन दरातील तेजीबाबत...नागपूर : संततधार पावसाचा फटका बसल्याने सोयाबीनची...
पुणे बाजारात कांदा दरात सुधारणापुणे ः राज्यात सर्वदूर झालेल्या पावसाचा फटका...
नवरात्रोत्सवामुळे फूल बाजाराला `रंग`पुणे: कोरोना संकटाचा सर्वाधिक फटका बसलेल्या फूल...
परभणीत आवळ्यांना सरासरी ११०० रुपये दरपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला...