Agriculture news in Marathi In Kolhapur, the panchnama of loss is fast | Agrowon

कोल्हापुरात नुकसानीचे पंचनामे वेगात

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 20 ऑक्टोबर 2020

जिल्ह्यात आठवडाभर झालेल्या पावसाने जिल्ह्यातील भात, भुईमूग, सोयाबीन व उसाचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे वेगात करण्याचे काम कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुरू केले आहे.

कोल्हापूर : जिल्ह्यात आठवडाभर झालेल्या पावसाने जिल्ह्यातील भात, भुईमूग, सोयाबीन व उसाचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे वेगात करण्याचे काम कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुरू केले आहे.

प्राथमिक माहितीनुसार १० ते १६ ऑक्‍टोबर दरम्यान, तब्बल ३ हजार ३३६ हेक्‍टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील २४ हजार ९५१ शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे. गेल्या आठवड्यापासून परतीसह वादळी पावसानेही झोडपून काढले. जिल्ह्यात ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. अशा सर्व शेतीचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, तहसीलदार, सर्कल, तलाठी व ग्रामविकास अधिकारी, कृषी अधिकाऱ्यांकडून पंचनामे केले जात आहेत.

जिल्ह्यात चंदगड तालुक्‍यात सर्वाधिक १२०० हेक्‍टर क्षेत्राचे आणि १३ हजार शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. याशिवाय, करवीर, राधानगरी, पन्हाळा, हातकणंगले, शिरोळ, गडहिंग्लज तालुक्‍यातही भात, सोयाबीन व ऊस जमीनदोस्त झाला आहे.आठवड्यापासून झालेल्या अतिवृष्टी तर काही ठिकाणच्या मुसळधार पावसाने पिकांना पाण्याखाली घेतले. कापणी व मळणीसाठी परिपक्व भात आणि सोयाबीनचा चिखल झाला. शासनाकडून याचे पंचनामे केले जात आहे. चंदगड, राधानगरी, करवीर तालुक्‍यात अनेक ठिकाणी भात पीक साचलेल्या पाण्यामध्येच गळून पडले आहे. हीच परिस्थिती सोयाबीन आणि भुईमुगाचीही आहे. अजूनही पंचनामे सुरू असून नुकसानीची आकडा वाढणार आहे.

जिल्ह्यात नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. युद्धपातळीवर आम्ही प्रत्येक गावामध्ये पंचनामे करीत आहोत. आत्तापर्यंत झालेल्या पंचनाम्यात सर्व पिकांचे ३३३६ हेक्‍टरवरील नुकसान दिसून येत आहे. अजूनही पंचनामे केले जात आहे. त्यामुळे, आकडा वाढण्याची शक्‍यता आहे.

- ज्ञानदेव वाकुरे, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी


इतर ताज्या घडामोडी
खानदेशात यात्रांअभावी अनेकांवर...सोनगीर, जि. धुळे  : खानदेशात पावसाळा वगळता...
नाशिक जिल्ह्यात रब्बीच्या पेरणीसाठी...गिरणारे, जि. नाशिक : खरीप हंगामातील भात, भुईमूग,...
खांबाळे, पडवणे येथील आंबा, काजूची ६००...सिंधुदुर्ग ः जिल्ह्यातील खांबाळे (ता....
बोडखा येथे ‘स्वाभिमानी’चे झाडावर...बुलडाणा : केंद्र सरकारने पारित केलेले शेतकरी...
औरंगाबादमध्ये केंद्राच्या कृषी...औरंगाबाद : केंद्र सरकारने पारित केलेले तीन कृषी...
खानदेशात सव्वा लाख हेक्टरवर पेरणीजळगाव : खानदेशात मक्याची लागवड सुरूच आहे. रब्बी...
परभणी जिल्ह्यात कापूस विक्रीच्या...परभणी : ‘‘राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन...
नाशिक विभागात रोज एक लाख टन उसाचे गाळपनगर  ः नाशिक विभागातील ३२ पैकी २५ साखऱ...
औरंगाबाद, नगर जिल्ह्यात कापसाची ३४ हजार...औरंगाबाद : राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाच्या...
कृषी कायद्यांविरोधात साताऱ्यात धरणेसातारा : शेतकरी विरोधी कायदे मागे घेण्यासाठी...
जालना जिल्ह्यात दहा हजार क्‍विंटलवर...जालना : ‘‘जिल्ह्यात मक्याची किमान आधारभूत...
महिनाभर जमीन आरोग्य सुधार अभियानऔरंगाबाद : जमिनीच्या सुपीकतेवर भर देण्याची गरज...
गहू, ज्वारी पिकांवरील खोडमाशीचे...बहुतांश ठिकाणी गहू व ज्वारी पिकाची पेरणी झाली आहे...
पिकाच्या संवेदनशील अवस्थेनुसार पाणी...रब्बी हंगामामध्ये घेतल्या जाणाऱ्या पिकांसाठी...
राज्यात लसूण ५००० ते १३००० रुपयेनाशिकमध्ये ६२०० ते ११५०० रुपये  नाशिक :...
उत्तम भाजीपाला उत्पादनासाठी पोषक हवामानवाटाणा वाटाणा हे थंड हवामानातील पीक असून या...
बहिरम यात्रा अखेर रद्दअमरावती : लाखो भाविकांचे कुलदैवत आणि विदर्भात...
महाद्वार काल्याने कार्तिकी यात्रेची...सोलापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात...
विधान परिषदेच्या सहा जागांचा आज निकालमुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या तीन पदवीधर,...
सरसकट पीकविम्यासाठी महाजनआंदोलन उभारणारनांदेड : खरिपातील पिकांचा सरसकट विमा...