Agriculture news in marathi, In Kolhapur, the price of a new jaggery is Rs 3500 to 6000 per quintal | Agrowon

कोल्हापुरात नवीन गुळाला साडेतीन ते सहा हजार रुपयांचा दर
टीम अॅग्रोवन
शनिवार, 7 सप्टेंबर 2019

कोल्हापूर : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शाहू मार्केट यार्डात शेतकऱ्यांकडून यंदाच्या हंगामातील नवीन गुळाची आवक झाली. जिल्हा सहकार उपनिबंधक अमर मोरे यांच्या हस्ते गुरुवारी सौदे झाले. या वेळी ३ हजार ५०० ते ६ हजार ५०० असा प्रतिक्विंटल भाव मिळाला.

कोल्हापूर : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शाहू मार्केट यार्डात शेतकऱ्यांकडून यंदाच्या हंगामातील नवीन गुळाची आवक झाली. जिल्हा सहकार उपनिबंधक अमर मोरे यांच्या हस्ते गुरुवारी सौदे झाले. या वेळी ३ हजार ५०० ते ६ हजार ५०० असा प्रतिक्विंटल भाव मिळाला.

बी. के. अतितकर यांच्या अडत दुकानात तानाजी जाधव आणि सागर जाधव (व्हन्नाळी, ता. कागल) या शेतकऱ्यांकडून, तर भैरवनाथ अडत दुकानात दत्तात्रय सावंत कुंजीरवाडी (ता. हवेली, जि. पुणे) यांच्याकडून या गुळाची आवक झाली. अडसाली उसाची लागवड होऊन ऊस तोडणी झाली. कर्नाटकात यंदाच्या नवीन गुळाची निर्मिती सुरू झाली. नवा गूळ सध्या शाहू मार्केट यार्डातील गूळ बाजारपेठेत आला. त्याचे मुहूर्ताचे सौदे यार्डात झाले.

गूळ व्यापारी अतुल शहा यांनी पहिल्या दहा किलोच्या ५१ गूळ रव्यांचे कलम ३ हजार ५०० ते ६ हजार ५०० या भावात खरेदी केले. 
गुळाचा हंगाम आणखी दीड-दोन महिन्यांत सुरू होईल.

जिल्ह्यातील बहुतांशी भागात महापूर होता. ऊस शेती तसेच गुऱ्हाळघरेही पाण्यात गेली. त्यामुळे गूळनिर्मिती सुरू होण्यास विलंब लागेल, असा अंदाज आहे. असे असले तरी सद्या गुळाला मिळालेला भाव शेतकऱ्यांना दिलासा देणारा असल्याचे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले. 

यावेळी बाजार समितीचे सभापती बाबासो लाड, उपसभापती पाटील, संचालक कृष्णात पाटील, अमित कांबळे, सर्जेराव पाटील, दशरथ माने, उदयसिंह पाटील, आशालता पाटील, शेखर येडगे, संजय जाधव, शशिकांत आडनाईक, नंदकुमार वळंजू , सदानंद कोरगावकर आदी उपस्थित होते.

इतर ताज्या घडामोडी
हमीभाव खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांची पाठसोलापूर  : मूग, उडीद, सोयाबीनची हमीभावाने...
भोर तालुक्यात रात्रभर मुसळधार पाऊसपुणे : जिल्ह्यात सोमवारी (ता. २१) दिवसभराच्या...
सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे टॅंकरच्या...सोलापूर  : गेल्या वर्षीच्या दुष्काळानंतर...
सातारा जिल्ह्यात सोयाबीन काढणीत पावसाचा...सातारा ः जिल्ह्यात अतिवृष्टी आणि सध्या सुरू...
मराठवाडी धरणावर पुन्हा यंत्रणा सज्जढेबेवाडी, जि. सातारा ः पावसाळ्यात थांबविलेले...
परभणीत अतिवृष्टीमुळे बाधित पिकांची...परभणी ः जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या...
स्वाभिमानीच्या विदर्भ अध्यक्षांवरील...अमरावती ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ...
सततच्या पावसाने नगर जिल्ह्यात पिकांचे...नगर ः जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पडत...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस; भात...सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच...
खाद्यउद्योगासाठी जंगली बुरशींचे...क्विण्वनयुक्त पदार्थांच्या चवीमध्ये त्यामध्ये...
पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील...नाशिक   : जिल्ह्यात द्राक्ष हंगामाला...
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा...अकोला  ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी...
फलटण तालुक्यात द्राक्षांचे घट फुटले;...सातारा  : फलटण तालुक्यातील निरगुडी, गिरवी,...
रसायनांच्या परिणामकारकतेसाठी नोझल,...तणनाशकाचे गुणधर्म असलेला एखादा क्रियाशील घटक...
जळगावात आले २८०० ते ५२०० रुपये...जळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
वऱ्हाडात सरासरी ६१.५९ टक्के मतदानअकोला ः गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या...
सोलापूर जिल्ह्यात मतदान शांततेतसोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात रात्रभर पडत असलेल्या...
एकात्मिक कीड नियंत्रणासाठी स्वयंचलित...किडीच्या एकात्मिक नियंत्रणासाठी विविध प्रकारच्या...
दिंडोरी, नाशिक भागांत डाऊनीचा...नाशिक   : जिल्ह्यात दिंडोरी, नाशिक...
इंदापुरात १२०० एकर द्राक्ष बागा उद्‌...भवानीनगर, जि. पुणे  : इंदापूर तालुक्‍यातील...