कोल्हापूर, सांगलीत ९६ हजार शेतकऱ्यांनी वीजबिल भरले

कोल्हापूर : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील ९६ हजार ४३२ कृषिपंप ग्राहकांनी १०३ कोटी ७० लक्ष रुपये वीज बिल थकबाकी भरली आहे.
 Kolhapur, Sangli 96 thousand Farmers paid their electricity bills
Kolhapur, Sangli 96 thousand Farmers paid their electricity bills

कोल्हापूर :  कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील ९६ हजार ४३२ कृषिपंप ग्राहकांनी १०३ कोटी ७० लक्ष रुपये वीज बिल थकबाकी भरली आहे. तेवढीच रक्कम माफ झाली आहे. महावितरणकडून ‘कृषी ऊर्जा पर्व’अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या जनजागृती उपक्रमातून ही रक्कम भरण्यात आली आहे.

मुख्य अभियंता  प्रभाकर निर्मळे म्हणाले, ‘‘कोल्हापूर जिल्ह्यात ६४ हजार ६४९  कृषिपंप ग्राहकांनी  ४३ कोटी ७० लाख, तर सांगली जिल्ह्यात ३१ हजार ७८३ कृषिपंप ग्राहकांनी ६० कोटी रुपयांच्या थकबाकीचा भरणा केला आहे.’’ 

‘‘कृषी धोरणानुसार निर्लेखन, व्याज व विलंब आकार माफीनंतर कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात ३ लाख ८५ हजार कृषिपंप ग्राहकांकडे १ हजार ४८६ कोटींची सुधारित थकबाकी आहे. कोल्हापूर जिल्ह्यात १ लक्ष ४५ हजार ९२८ ग्राहकांकडे ४३१ कोटी रुपये, तर सांगलीत २ लक्ष ३९ हजार ३३० ग्राहकांकडे १०५५ कोटी रुपये थकबाकी आहे. कृषिपंपाच्या सुधारित थकबाकीतील ५० टक्के रक्कम भरणा केल्यास दोन्ही जिल्ह्यात मिळून ७४२ कोटी रुपये माफ होणार आहेत,’’ असे निर्मळे म्हणाले.

‘विस्तारीकरणाची कामे होणार’

‘‘कृषी आकस्मिक निधीत कृषी ग्राहकांकडून वसूल रक्कमेच्या प्रत्येकी ३३ टक्के प्रमाणे ग्रामपंचायत व जिल्हास्तरावर कोल्हापूरला ३३ कोटी ५० लाख, तर सांगलीला ५१ कोटी २० लक्ष इतका एकूण निधी उपलब्ध झाला आहे. कृषी धोरणानुसार या निधीतून ग्रामपंचायत व जिल्ह्याच्या क्षेत्रात नवीन उपकेंद्र, वाहिन्यांसह वीज यंत्रणेच्या सक्षमीकरण, विस्तारीकरणाची कामे करण्यात येणार आहेत,’’ असेही निर्मळे यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com