नागपूर ः जगाच्या तुलनेत भारताची आणि त्यातही महाराष्ट्राची प्रति हेक्टरी कापूस उत्पादकता
बाजारभाव बातम्या
कोल्हापुरात टोमॅटोला दहा किलोस १५० रुपये
कोल्हापूर : येथील बाजार समितीत या सप्ताहात टोमॅटोची आवक वाढली. टोमॅटोस दहा किलोस सरासरी १५० रुपये इतका दर मिळाला.
कोल्हापूर : येथील बाजार समितीत या सप्ताहात टोमॅटोची आवक वाढली. टोमॅटोस दहा किलोस सरासरी १५० रुपये इतका दर मिळाला.
ओल्या मिरचीची आवक चारशे ते पाचशे पोती इतकी होती. मिरचीस दहा किलोस २०० ते ३०० रुपये इतका दर होता. ओल्या मिरचीस सरासरी दर २५० रुपये इतका दर होता. ढोबळी मिरचीची आवक वाढली. त्यास दहा किलोस सरासरी दीडशे रुपये इतका दर मिळाला.
गवारीची दररोज १५० ते २०० पोती आवक झाली. गवारीस दहा किलोस सरासरी २७५ रुपये इतका दर होता. ओला वाटाण्याची तीनशे ते दोनशे पोती आवक झाली. त्यास दहा किलोस सरासरी ४२५ रुपये इतका दर होता.कारल्याची तीनशे ते चारशे पाट्या आवक झाली. दहा किलोस सरासरी १५० रुपये इतका दर मिळाला.
भेंडीची आवक स्थिर होती. तिला दहा किलोस सरासरी दोनशे रुपये दर होता. कोथिंबिरीची आवक या सप्ताहात ही वाढली होती. दररोज चाळीस हजार पेंढ्या इतकी आवक झाली. तिला सरासरी पाचशे रुपये दर होता. मका कणसाची तीन ते चार हजार नग इतकी आवक होती. त्यास शेकडा २५० रुपये दर होता.
मेथीची आवक गेल्या पंधरवड्यापासून मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दररोज सत्तर ते ऐंशी हजार पेंढ्या आवक झाली. मेथीस सरासरी ४०० रुपये शेकडा इतका दर मिळाला. पालक पोकळा शेपू आदी भाज्यांना शेकडा सरासरी ४०० रुपये दर होता.
- 1 of 65
- ››