agriculture news in marathi, In Kolhapur, tomatoes should be 50 to 160 rupees per 10 kg | Agrowon

कोल्हापुरात टोमॅटोला प्रति दहा किलोस ५० ते १६० रुपये
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 9 मे 2019

कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता. ७) टोमॅटोच्या आवकेत वाढ झाली. टोमॅटोची १३६० कॅरेट आवक होऊन त्यास प्रति दहा किलोस ५० ते १६० रुपये इतका दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीतील सूत्रांनी दिली.

कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता. ७) टोमॅटोच्या आवकेत वाढ झाली. टोमॅटोची १३६० कॅरेट आवक होऊन त्यास प्रति दहा किलोस ५० ते १६० रुपये इतका दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीतील सूत्रांनी दिली.

गेल्या पंधरा दिवसापासून उन्हाळा वाढत आहे. कोल्हापूर बाजार समितीत स्थानिक भागाबरोबरच सांगली जिल्ह्यातील विटा, कवठेमहांकाळ या तालुक्यातून काही प्रमाणात टोमॅटोची आवक होत आहे. सध्या या भागात उन्हाळा जास्त असल्याने उन्हामुळे टोमॅटो पिकू लागले आहेत. जास्त पिकून नुकसान होऊ नये, यासाठी अनेक शेतकरी टोमॅटोचा तोडा जास्त प्रमाणात करत असल्याने टोमॅटोच्या आवकेत काहीशी वाढ असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. 

गवार, ओला वाटाणा कारल्याची आवक कमी झाली आहे. पाणीटंचाईमुळे या पिकांची वाढ आवश्यकत त्या प्रमाणात होत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. गवारीची २० पोती आवक झाली. तिला दहा किलोस २०० ते ३१० रुपये दर मिळाला. ओला वाटाण्याची ७० पोती आवक झाली. कारल्याची ६७ पोती आवक झाली. भेंडीची १२६ करड्या आवक झाली. तिला प्रतिदहा किलोस १०० ते ३०० रुपये दर मिळाला. 

हिरव्या मिरचीची ४४५ पोती आवक झाली. या मिरचीस दहा किलोस १८० ते ४१० रुपये दर मिळाला. कोथिंबिरीची २६००० पेंढ्या आवक झाली. कोथिंबिरीस शेकडा ४०० ते १२०० रुपये इतका दर मिळाला. लग्नसराईमुळे कोथिंबिरीच्या दरात सुधारणा झाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

इतर बाजारभाव बातम्या
परभणीत वांगी ८०० ते १५०० रुपये...परभणी : पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला...
राज्यात गवार प्रतिक्विंटल १२०० ते ६०००...जळगावात प्रतिक्विंटल ५६०० रुपये जळगाव ः कृषी...
सांगलीत हळद प्रतिक्विंटल ६००० ते ८९००...सांगली ः येथील बाजार समितीत हळदीची आवक कमी झाली...
जळगावात लाल कांद्याचे दर आणि आवक टिकूनजळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख बाजार, उपबाजारांमध्ये...
नाशिकमध्ये हिरवी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक ः नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
कळमणा बाजारात सोयाबीनची आवक आणि दर स्थिरनागपूर ः स्थानिक कळमणा बाजार समितीत शेतीमालाची...
गुलटेकडीत टोमॅटो, शेवगा, फ्लॉवरच्या...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादेत बटाटे ८०० ते १००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
परभणीत रताळी प्रतिक्विंटल १८०० ते २२००...परभणी ः पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात कोथिंबीर प्रतिशेकडा ८०० ते ३५००...औरंगाबादेत प्रतिशेकडा ८०० ते ११०० रुपये औरंगाबाद...
अकोल्यात तूर प्रतिक्विंटल ५००० ते ५९००...अकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जळगाव बाजारात केळी दरात सुधारणाजळगाव ः नवती केळीच्या दरात मागील आठवडाभरात...
नाशिकमध्ये कोथिंबीर प्रतिक्विंटल ९,६००...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
गुलटेकडीत शेवगा, मटार, कैरीच्या दरात...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
करंजाड उपबाजारात टोमॅटो लिलावास सुरवातनाशिक : बागलाण तालुक्यातील करंजाड येथील उपबाजार...
औरंगाबादेत कोबी १००० ते १८०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
नारायणगाव उपबाजारात टोमॅटोची उच्चांकी...नारायणगाव, जि. पुणे   : जुन्नर कृषी...
राज्यात टोमॅटो प्रतिक्विंटल ८०० ते ३५००...नाशिकमध्ये प्रतिक्विंटल १००० ते २२५० रुपये नाशिक...
अकोल्यात मूग सरासरी ४४५० रुपये...अकोला ः गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे...
नाशिकमध्ये भुईमूग शेंगा प्रतिक्विंटल...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...