कोल्हापूर जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीची सत्ता

Kolhapur Zilla Parishad Power to Mahavikasaghadi`
Kolhapur Zilla Parishad Power to Mahavikasaghadi`

कोल्हापूर : येथील जिल्हा परिषदेत काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना आणि घटक पक्षांच्या महाविकास आघाडीने भाजप आघाडीला पराभूत करत सत्ता हस्तगत केली. काँग्रेसच्या बजरंग पाटील यांची अध्यक्षपदी, तर सतीश पाटील यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. 

बजरंग पाटील यांनी ४१ मते मिळवून भाजप आघाडीच्या अरुण इंगवले (२४ मते) यांचा, तर सतीश पाटील यांनी ४१ मते मिळवत भाजप आघाडीच्याच राहुल आवाडे (२४ मते) यांचा पराभव केला.

या निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली आहे. तोच पॅटर्न गुरुवारी जिल्हा परिषदेतही यशस्वी ठरला. तीनही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी अथक प्रयत्न करून भाजपला एकाकी पाडले. गुरुवारी दुपारी महाविकास आघाडीचे सर्व सदस्य बेळगावहून थेट जिल्हा परिषदेत पोहोचले. तसेच भाजप आघाडीच्या सदस्यांना कराडहून सकाळी माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या शिरोलीतील निवासस्थानी आणण्यात आले. तेथून ते जिल्हा परिषदेच्या सभागृहात आले.

पीठासन अधिकारी वैभव नावडकर यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. त्यांनी अर्ज छाननीनंतर अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांना माघार घेण्यासाठी १० मिनिटांची मुदत दिली. उमेदवारांनी अर्ज मागे न घेतल्याने मतदान होणार असल्याचे जाहीर केले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com