Agriculture news in marathi Kolhapuri dam in Ambad taluka is just like the name | Agrowon

अंबड तालुक्यातील कोल्हापुरी बंधारे नावापुरतेच

टीम अॅग्रोवन
शनिवार, 12 सप्टेंबर 2020

अंबड, जि. जालना : बांधण्यात आलेले बंधारे दरवाज्याविना काही कामाचे नसल्याचे चित्र आबे. पावसाचे पाणी अडविले जात नसल्याने हे बंधारे नावापुरतेच उरले आहेत.

अंबड, जि. जालना : एकीकडे शासन सिंचन वाढविण्यासाठी, तसेच पिण्याच्या पाण्यासह जनावरांची तहान भागविण्यासाठी नदी, नाल्यांवर कोल्हापुरी बंधारे बांधत आहे. त्याद्वारे ‘पाणी आडवा पाणी जिरवा’ मोहिमेवर लाखो रुपये खर्च करण्यात येत आहेत. मात्र, बांधण्यात आलेले बंधारे दरवाज्याविना काही कामाचे नसल्याचे चित्र आबे. पावसाचे पाणी अडविले जात नसल्याने हे बंधारे नावापुरतेच उरले आहेत. 

अंबड तालुक्यातील आलमगाव, हनुमाननगर, कर्जत परिसरातील नदी, करंजी नाल्यावर पुर्वी पावसाचे पाणी आडविण्यासाठी कोल्हापुरी बंधारे बांधण्यात आले. त्यावेळी यावर लाखो रुपये खर्च करण्यात आले. यातून दुष्काळ, पाणी टंचाई दुर व्हावी, हाच हेतु होता. शेतकऱ्यांचे सिंचन क्षेत्र वाढीस लागावे, यासाठी पावसाचा प्रत्येक थेंब आडविणे व जमीनित जिरविण्यासाठी बंधारे बांधले. पण, त्यांना दरवाजेच बसविण्यात आलेले नाहीत. यामुळे नाल्यावरील बंधारे अनेक वर्षांपासून उघडेच आहेत.

करंजी नाल्यात आलेले पाणी खाली वाहून जात आहे. यामुळे ‘असून अडचण, नसून खोळंबा’ म्हणण्याची वेळ ग्रामस्थ, शेतकरी, पशुपालकांवर आली आहे.

करंजी नाल्यावरील बंधाऱ्याला पाणी आडविण्यासाठी दरवाजेच नाहीत. यामुळे पावसाचे आडविता येत नाही. येणारे पाणी तसेच खाली वाहून जात आहे. बंधारे केवळ बुजगावणे म्हणून उभे आहेत. 
- विष्णु खाडे, शेतकरी.
 

टॅग्स

इतर बातम्या
वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा पुणे : अरबी समुद्रात घोंघावत असलेल्या ‘तौत्के’...
पावसासाठी पोषक वातावरण पुणे : चक्रीवादळामुळे पश्‍चिम महाराष्ट्रात वेगाने...
पश्‍चिम महाराष्ट्रातही पाऊस पुणे ः ‘तौत्के’ चक्रीवादळाचा फटका पुणे, कोल्हापूर...
विदर्भ, मराठवाड्यात पाऊसअमरावती/औरंगाबाद : ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे विदर्भ...
कापूस बियाणे विक्री २० मेपासून करा : ‘...नागपूर : विदर्भ, खानदेश विभागांत शेजारच्या...
कृषी निविष्ठा विक्रेत्यांचे ...येवला, जि. नाशिक : कृषी बियाणे रासायनिक खते,...
कोकण किनारपट्टीला चक्रीवादळाचा दणका रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी ः ‘तौत्के’ चक्रीवादळाचा...
तूर, मूग, उडदाची आयात खुली नागपूर : केंद्र सरकारने हंगामापूर्वी तूर, उडीद...
धूळवाफ पेरणीत लॉकडाउनचा खोडा सांगली ः शिराळा तालुक्यात वारंवार झालेल्या...
आपत्ती व्यवस्थापनाचे नियोजन करा ः...नागपूर : गेल्या वर्षीचा महापूर लक्षात घेऊन...
कुकडीच्या पाण्यासाठी  पारनेरकर एकवटले निघोज, ता. पारनेर : कुकडीच्या पाण्याबाबत पुणे...
पेट्रोल, खतांच्या दरवाढीविरोधात ...मुंबई : पेट्रोल शंभरी पार केल्यानंतर केंद्राने...
गडहिंग्लजमध्ये शेतकऱ्यांकडे नऊ टन...गडहिंग्लज, जि. कोल्हापूर : यंदाच्या खरीप हंगामात...
कीटकनाशके विक्रीबाबत तरतुदींचे पालन करा अकोला ः या खरीप हंगामात बियाणे, खते, कीटकनाशके...
परभणीत पीककर्जाच्या उद्दिष्टात ४८६...परभणी ः जिल्ह्यात चालू आर्थिक वर्षात (२०२१-२२)...
कोरोना रुग्णालयांचा वीज,  ऑक्सिजन...मुंबई : अरबी समुद्रातील तौक्ते चक्रीवादळामुळे...
मॉन्सूनपूर्व कामांना प्राधान्य द्यावे ः...भंडारा : मॉन्सून कालावधीत अचानक उद्‌भवणाऱ्या...
कोरोनाचे नियम पाळून  बाजार समित्या सुरू...नाशिक : जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादूर्भाव...
नगर जिल्ह्यात खरीपपूर्व मशागतीच्या...नगर : एकीकडे कोरोनाचे सावट असताना ग्रामीण भागातील...
लोहा, माहूर तालुक्यांना विम्याची रक्कम...नांदेड : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत खरीप...