In Kongle, 27 farmers did gram seed production
In Kongle, 27 farmers did gram seed production

कोंगलेत २७ शेतकऱ्यांनी केले भाताचे ग्रामबिजोत्पादन

कोकण कृषी विद्यापीठासह कृषी विभागाच्या सहकार्याने दापोली तालुक्यातील कोंगले गावात प्रथमच २७ शेतकऱ्यांनी एकत्र येऊन कर्जत २ या भाताच्या जातीचे ग्रामबिजोत्पादन यशस्वीपणे केले. त्यांनी केलेल्या या कामाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत यांनी अभिनंदन करून भविष्यात या ठिकाणी अन्य उत्पादने घेण्याची सूचना केली आहे.

रत्नागिरी ः कोकण कृषी विद्यापीठासह कृषी विभागाच्या सहकार्याने दापोली तालुक्यातील कोंगले गावात प्रथमच २७ शेतकऱ्यांनी एकत्र येऊन कर्जत २ या भाताच्या जातीचे ग्रामबिजोत्पादन यशस्वीपणे केले. त्यांनी केलेल्या या कामाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत यांनी अभिनंदन करून भविष्यात या ठिकाणी अन्य उत्पादने घेण्याची सूचना केली आहे.

कोंगले हे गाव दापोली तालुक्यातील अतिदुर्गम भागात वसलेले आहे. अपुरी दळणवळण व्यवस्था, पारंपरिक शेतीतून अर्थार्जन यावरच सर्व अवलंबून आहे. कृषी विद्यापीठाने कोंगले गावात ग्रामबिजोत्पादन कार्यक्रमाअंतर्गत प्रक्षेत्र भेट व चर्चासत्र कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमाकरिता विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत उपस्थित होते. त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.

डॉ. सावंत म्हणाले की, एकत्र येऊन भातशेतीचा हा प्रयोग खूप वाखाणण्याजोगा आहे. यापुढे आपली जबाबदारी वाढली असून वाहून जाणाऱ्या पावसाच्या पाण्याचे योग्य प्रकारे नियोजन करून वर्षभर तिन्ही हंगामात पिकांचे व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून उत्पादन करावे. या कार्यक्रमात विद्यापीठाच्या विविध पिकांच्या जातीचे नमुन्यांचे प्रदर्शन ठेवण्यात आले होते. या कार्यक्रमाला संशोधन संचालक डॉ. पराग हळदणकर, डॉ. प्रमोद सावंत, डॉ. आनंद नरंगलकर, उपविभागीय अधिकारी दीपक कुटे, पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, डॉ. मनीष कस्तुरे, डॉ. अरुण माने, डॉ. वैभव राजेमहाडीक व वरिष्ठ संशोधन सहायक प्रवीण झगडे उपस्थित होते.याप्रसंगी कोंगले गावचे अध्यक्ष महादेव साळवी म्हणाले की, गावातील २७ शेतकरी पुरुष व महिला एकत्र आलो व सदरचा ग्रामबिजोत्पादन कार्यक्रमांतर्गत भाताच्या कर्जत २ या वाणाचे बीजोत्पादन घेतले. विद्यापीठासह कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे आम्ही यशस्वी झालो.

असा राबवला उपक्रम कृषी सहायक माधव शिंदे यांनी विद्यापीठातील संशोधन संचालनालयाच्या बियाणे विभागातील संशोधन उपसंचालक बियाणे डॉ. अरुण माने यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरू केला. डॉ. माने यांनी चवळी पिकाच्या कोकण सदाबहार या जातीचे ग्रामबिजोत्पादन यशस्वीपणे घेतले. कोंगळे गावातील शेतकऱ्यांनी ग्रामबिजोत्पादन संकल्पना समजावून घेतली. यासाठी २७ शेतकरी एकत्र आले. कर्जत २ जातीच्या भात बियाण्यांच्या ग्रामबिजोत्पादनाचा कार्यक्रम कोंगले गावात आरंभ झाला. डॉ. माने, बियाणे परीक्षण अधिकारी डॉ. प्रवीण वणवे व वरिष्ठ संशोधन सहायक प्रवीण झगडे यांनीही प्रक्षेत्र भेटीतून मार्गदर्शन केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com