Agriculture news in Marathi In Kongle, 27 farmers did gram seed production | Page 2 ||| Agrowon

कोंगलेत २७ शेतकऱ्यांनी केले भाताचे ग्रामबिजोत्पादन

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 13 ऑक्टोबर 2020

कोकण कृषी विद्यापीठासह कृषी विभागाच्या सहकार्याने दापोली तालुक्यातील कोंगले गावात प्रथमच २७ शेतकऱ्यांनी एकत्र येऊन कर्जत २ या भाताच्या जातीचे ग्रामबिजोत्पादन यशस्वीपणे केले. त्यांनी केलेल्या या कामाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत यांनी अभिनंदन करून भविष्यात या ठिकाणी अन्य उत्पादने घेण्याची सूचना केली आहे.

रत्नागिरी ः कोकण कृषी विद्यापीठासह कृषी विभागाच्या सहकार्याने दापोली तालुक्यातील कोंगले गावात प्रथमच २७ शेतकऱ्यांनी एकत्र येऊन कर्जत २ या भाताच्या जातीचे ग्रामबिजोत्पादन यशस्वीपणे केले. त्यांनी केलेल्या या कामाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत यांनी अभिनंदन करून भविष्यात या ठिकाणी अन्य उत्पादने घेण्याची सूचना केली आहे.

कोंगले हे गाव दापोली तालुक्यातील अतिदुर्गम भागात वसलेले आहे. अपुरी दळणवळण व्यवस्था, पारंपरिक शेतीतून अर्थार्जन यावरच सर्व अवलंबून आहे. कृषी विद्यापीठाने कोंगले गावात ग्रामबिजोत्पादन कार्यक्रमाअंतर्गत प्रक्षेत्र भेट व चर्चासत्र कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमाकरिता विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत उपस्थित होते. त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.

डॉ. सावंत म्हणाले की, एकत्र येऊन भातशेतीचा हा प्रयोग खूप वाखाणण्याजोगा आहे. यापुढे आपली जबाबदारी वाढली असून वाहून जाणाऱ्या पावसाच्या पाण्याचे योग्य प्रकारे नियोजन करून वर्षभर तिन्ही हंगामात पिकांचे व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून उत्पादन करावे. या कार्यक्रमात विद्यापीठाच्या विविध पिकांच्या जातीचे नमुन्यांचे प्रदर्शन ठेवण्यात आले होते. या कार्यक्रमाला संशोधन संचालक डॉ. पराग हळदणकर, डॉ. प्रमोद सावंत, डॉ. आनंद नरंगलकर, उपविभागीय अधिकारी दीपक कुटे, पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, डॉ. मनीष कस्तुरे, डॉ. अरुण माने, डॉ. वैभव राजेमहाडीक व वरिष्ठ संशोधन सहायक प्रवीण झगडे उपस्थित होते.याप्रसंगी कोंगले गावचे अध्यक्ष महादेव साळवी म्हणाले की, गावातील २७ शेतकरी पुरुष व महिला एकत्र आलो व सदरचा ग्रामबिजोत्पादन कार्यक्रमांतर्गत भाताच्या कर्जत २ या वाणाचे बीजोत्पादन घेतले. विद्यापीठासह कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे आम्ही यशस्वी झालो.

असा राबवला उपक्रम
कृषी सहायक माधव शिंदे यांनी विद्यापीठातील संशोधन संचालनालयाच्या बियाणे विभागातील संशोधन उपसंचालक बियाणे डॉ. अरुण माने यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरू केला. डॉ. माने यांनी चवळी पिकाच्या कोकण सदाबहार या जातीचे ग्रामबिजोत्पादन यशस्वीपणे घेतले. कोंगळे गावातील शेतकऱ्यांनी ग्रामबिजोत्पादन संकल्पना समजावून घेतली. यासाठी २७ शेतकरी एकत्र आले. कर्जत २ जातीच्या भात बियाण्यांच्या ग्रामबिजोत्पादनाचा कार्यक्रम कोंगले गावात आरंभ झाला. डॉ. माने, बियाणे परीक्षण अधिकारी डॉ. प्रवीण वणवे व वरिष्ठ संशोधन सहायक प्रवीण झगडे यांनीही प्रक्षेत्र भेटीतून मार्गदर्शन केले.


इतर अॅग्रो विशेष
टीका, आरोपांचा समाचार; दुसऱ्या दिवशीही...नवी दिल्ली : संयुक्त किसान मोर्चाने आयोजित शेतकरी...
कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची...पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या...
ढगफुटीने हाहाकारपुणे : पश्‍चिम महाराष्ट्रात मॉन्सूनच्या पावसाने...
सांगलीत नदीकाठच्या नागरिकांचे स्थलांतर सांगली ः चांदोली धरणक्षेत्रात अतिवृष्टी सुरू...
पीक विम्यासाठी ७२ तासांच्या आत नुकसान...पुणे ः राज्याच्या काही भागात अतिवृष्टी, पुराने...
कोल्हापुरात पावसाचे थैमान, पुराचा विळखा कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाचा हाहाकार शुक्रवारीही...
तेवीस वर्षीय युवकाची पोल्ट्रीत दमदार...शिवपूर (जि. अकोला) येथील शुभम महल्ले या तरुणाने...
शेतीसह डाळी, बेसन पीठ प्रक्रिया ठरली...करकंब (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथील सुधीर...
शेतकऱ्यांच्या प्रश्नी संसद दणाणली;...नवी दिल्ली ः संसदेत गुरुवारी (ता.२२) शेतकरी...
‘शेतकरी संसदे’त कृषी कायद्यांवर हल्लाबोलनवी दिल्ली  : जंतर-मंतर येथे संयुक्त किसान...
महाबळेश्वरात ४८० मिलिमीटर पाऊस !!!सातारा ः महाबळेश्वरात मुसळधार पाऊस सुरू आहे....
रत्नागिरीत पावसाचे थैमानरत्नागिरी ः जिल्ह्यात अनेक ठिकाणी ढगफुटीसारख्या...
‘मुळशी’च्या पाणलोट क्षेत्रात ३७०...पुणे ः जिल्ह्यात धरणाच्या पाणलोट क्षेत्रात...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पूरस्थिती गंभीरसिंधुदुर्गनगरी ः जिल्हयात मध्यरात्रीपासून...
मराठवाड्यात तब्बल ७७ मंडलात अतिवृष्टी औरंगाबाद : मराठवाड्यात गुरुवारी (ता.२२)...
सोमवारपर्यंत ठिकठिकाणी मुसळधार पावसाचा...पुणे : गेल्या काही दिवसांपासून कोकणासह, मध्य...
राज्यात अतिवृष्टीने दाणादाण पुणे : कोकणातील सर्वंच जिल्ह्यांसह राज्यातील काही...
राज्याची कृषी विधेयके लोकाभिप्रायासाठी...पुणे ः महाविकास आघाडी सरकारने नव्या कृषी...
लॉन’ शेतीत मिळवली चांदे गावाने ओळखपुणे शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या प्रसिद्ध...
‘जंतर-मंतर’वर आजपासून होणार ‘किसान... नवी दिल्ली : केंद्र सरकारने केलेल्या...