Agriculture news in Marathi, Konkan, Central Maharashtra will receive heavy rainfall | Agrowon

कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 19 सप्टेंबर 2019

पुणे : बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्रात तयार होत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रांमुळे राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. आजपासून (ता. १९) कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबई, रायगड जिल्ह्यासह पुणे, सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर मराठवाडा, पूर्व विदर्भातही काही ठिकाणी जोरदार सरींचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

पुणे : बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्रात तयार होत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रांमुळे राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. आजपासून (ता. १९) कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबई, रायगड जिल्ह्यासह पुणे, सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर मराठवाडा, पूर्व विदर्भातही काही ठिकाणी जोरदार सरींचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा निवळला आहे. राजस्थानच्या अनेक भागांत पावसाने उघडीपही दिली आहे. मात्र मॉन्सूनचा परतीचा प्रवास लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. यातच बंगालच्या उपसागरात आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत असलेल्या चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीमुळे या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. दुसरीकडे उत्तर कोकण आणि गुजरातच्या किनाऱ्यालगत उद्या (ता. २०) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे आणि त्याची तीव्रता वाढण्याचे संकेत आहेत. ही स्थिती पोषक ठरल्याने शनिवारपर्यंत (ता. २१) कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार, तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. 

बुधवारी (ता. १८) सकाळपासूनच कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात ढगांची दाटी झाली होती. दुपारनंतर मुंबई उपनगर, पुणे, औरंगाबाद, जालना जिल्ह्यांच्या अनेक भागांत, तर अकोला जिल्ह्यातील अकोट, तेल्हारा या तालुक्यांमध्ये, तसेच बुलडाणा जिल्ह्यात काही ठिकाणी अर्धा ते पाऊण तास दमदार पाऊस झाला. सातपुड्याच्या पायथ्याशी असणाऱ्या गावांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडत होता. मंगळवारीही सायंकाळी वाशीम जिल्ह्यात मालेगाव परिसरात दमदार पाऊस झाला होता. सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्याच्या पूर्व भागात सर्वत्र मुसळधार पाऊस झाला. पावसाचा जोर अधिक असल्याने रस्त्यावरून पाणी वाहू लागले. माणमध्ये पावसाचे जोरदार आगमन झाल्यानंतर पाऊस दहीवडीकडे सरकला. 

बुधवारी (ता. १८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत - हवामान विभाग) :
कोकण : डहाणू ४६, वाडा ४७, कर्जत ५९, खालापूर १६०, माथेरान ८१, पनवेल ११६, सुधागडपाली ७२, भिवंडी ६०, कल्याण ५५, ठाणे ६०, उल्हासनगर ५१,
मध्य महाराष्ट्र : नगर ३८, जामखेड ३२, नेवासा ३०, बोधवड ३१, आक्रणी ४२, जत ३५. 
मराठवाडा : औरंगाबाद २९, कन्नड ३२, आष्टी ५१, आंबड ३६, घनसांगवी ४०, अहमदपूर ४३, लातूर ४२, निलंगा ५९, धर्माबाद २५, किनवट ५६, लोहा २५, माहूर २८. 
विदर्भ : बल्लारपूर ७१, वरोरा ३०, अहेरी ५१, हिंगणा ४८, कळमेश्वर ६३, कामठी ३४, कुही ४५, सावनेर ७९, सेलू ४०, वणी ३५.


इतर ताज्या घडामोडी
कोल्हापूर बाजार समिती नोकर भरतीविरोधात...कोल्हापूर: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...
नगर : मक्‍याला हमीभावापेक्षा कमी दर...नगर ः रब्बी हंगामामध्ये शासनाच्या किमान आधारभूत...
सातारा जिल्ह्यात खरिपाच्या ८२.८५ टक्के...सातारा  ः पावसाचा काहीसा जोर वाढल्याने...
पुणे बाजार समितीसह उपबाजार ...पुणे  ः ‘कोरोना’च्या फैलावामुळे शहरातील...
नगर जिल्ह्यात एक लाख १७ हजार हेक्टरवर...नगर  ः जिल्ह्यात यंदा जुलैच्या पहिल्याच...
अमरावतीत बियाणे कंपनीकडून ९०१ बॅग, २२...अमरावती : जिल्ह्यात सोयाबीन बियाणे उगवणीबाबत १...
कोविड-१९ रुग्णांच्या वास, चव संवेदनांवर...कोविड १९ च्या आजारातून बरे झाल्यानंतरही सुमारे ९०...
खानदेशात दुबार पेरणीसाठी ताग, बाजरी,...जळगाव  ः खानदेशात दुबार पेरणी आटोपली आहे....
जळगावमधील सिंचन प्रकल्पांची कामे...जळगाव  ः जिल्ह्यात तापी व गिरणा नदीवर...
निकृष्ट बियाणेप्रकरणी सर्व कंपन्यांवर...नगर: जिल्ह्यात गेल्या एक महिन्याच्या कालावधीत...
बॅंकांनी पीककर्ज प्रकरणे तत्काळ मार्गी...वर्धा  ः जिल्ह्यात पात्र शेतकऱ्यांपैकी एकही...
गोंदिया जिल्ह्यात युरियाची टंचाईगोंदिया  ः पावसामुळे धान रोवणीला वेग आल्याने...
औरंगाबाद जिल्ह्यात खतांचा पुरवठा सुरळीत...औरंगाबाद : जिल्ह्यात ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर...
अकोल्यात तूर सरासरी ५८०० रुपये क्विंटलअकोला  ः  येथील कृषी उत्पन्न बाजार...
सांगली जिल्ह्यातील तीन केंद्रांवर २०२३...सांगली  ः जिल्ह्यात हमीभावाने मका खरेदीसाठी...
रत्नागिरी जिल्ह्यात भात, नाचणी पिकासाठी...रत्नागिरी  : रत्नागिरी जिल्ह्यात भात, नाचणी...
आरोग्यदायी दालचिनीमसाल्यांच्या पदार्थांत, घरात मसाला करताना...
कोकण, कोल्हापूर पट्ट्यात मुसळधार...कोकण व कोल्हापूर भागावर १००२ तर महाराष्ट्रावर...
कोल्हापुरात दिड हजार, खते, बियाणे...कोल्हापूर  : बियाण्यांच्या उगवणीप्रश्नी...
सांगली जिल्ह्यात दोन लाख १९ हजार हेक्‍...सांगली : जिल्ह्यात पावसांचा खंड असला तरी  ...