agriculture news in marathi, Konkan had heavy rainfall | Agrowon

कोकणात जोर‘धार’ !

टीम अॅग्रोवन
सोमवार, 11 जून 2018

पुणे : माॅन्सून सक्रिय झाल्याने कोकण किनारपट्टीवर पावसाची जोर‘धार’ सुरूच आहे. दोन दिवसांपासून मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यांना पावसाने अक्षरश: झोडपून काढले असून, सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. रविवारी (ता.१०) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथे सर्वाधिक २८० मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, रत्नागिरी, राजापूर, मुरूड येथे २०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. रविवारी दिवसभर पावसाचा जोर टिकून होता. 

पुणे : माॅन्सून सक्रिय झाल्याने कोकण किनारपट्टीवर पावसाची जोर‘धार’ सुरूच आहे. दोन दिवसांपासून मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यांना पावसाने अक्षरश: झोडपून काढले असून, सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. रविवारी (ता.१०) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथे सर्वाधिक २८० मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, रत्नागिरी, राजापूर, मुरूड येथे २०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. रविवारी दिवसभर पावसाचा जोर टिकून होता. 

माॅन्सूनने शुक्रवारी कोकणात हजेरी लावल्यानंतर दमदार पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे ओढे-नाल्यांना पूर आला असून, शेतांना तळ्याचे स्वरुप आले आहे. सखल भागातही मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने जनजीवन विस्कळित झाले आहे. मुंबईसह कोकणातील वीसहून अधिक ठिकाणी १०० मिलिमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली असून, यातील नऊ ठिकाणी दीडशे मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. 

विदर्भातही पूर्वमोसमी पावसाने जोर धरल्याने रविवारी सकाळपर्यंत अनेक ठिकाणी ५० मिलिमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूरमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस पडला असला तरी उर्वरीत जिल्ह्यात मॉन्सूनने अद्याप जोर धरलेला नाही. कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्‍चिम भागातील गगनबावडा, पन्हाळा तालुक्‍यात पावसाची संततधार सुरू होती. मॉन्सूनने हजेरी लावल्यानंतर मराठवाड्यातील रेनापूर येथे १२० मिलिमीटर, तर कळमनुरी येथे ६० मिलिमीटर पाऊस पडला. नांदेड, हिंगोली जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असला तरी परभणीसह इतर जिल्ह्यात जोर कमी होता. 

रविवारी (ता. १०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये - स्त्रोत हवामान विभाग) : 

  • कोकण : देवगड २८०, रत्नागिरी २७०, मुरूड २६०, राजापूर २१०, लांजा १९०, उरण १८०, अलिबाग, कणकवली प्रत्येकी १७०, कुलाबा १६०, गुहागर १४०, कुडाळ, वेंगुर्ला, वैभववाडी प्रत्येकी १३०, दोडामार्ग १२०, चिपळूण, सावंतवाडी, म्हसळा प्रत्येकी ११०, सांताक्रझ, श्रीवर्धन १००, मालवण, ठाणे, तळा, संगमेश्‍वर प्रत्येकी ९०, दापोली ८०, भिवंडी, वाडा प्रत्येकी ७०, मंडणगड, खेड प्रत्येकी ६०, माणगाव ५०, महाड, पनवेल, जव्हार प्रत्येकी ३०. 
  • मध्य महाराष्ट्र : चंदगड ८०, शाहुवाडी, गगणबावडा प्रत्येकी ७०, गारगोटी, राधानगरी प्रत्येकी ६०, आजरा ४०, महाबळेश्‍वर ४०, करवीर ३०, कागल, गडहिंग्लज प्रत्येकी २०.
  •  मराठवाडा : रेणापूर १२०, कळमनुरी ६०, लातूर, शिरुर अनंतपाळ प्रत्येकी ५०, अर्धापूर ,० किनवट, नायगाव खैरगाव, जालना, चाकूर प्रत्येकी ३०. भोकर, बिलोली, बीड, सेलू, निलंगा, मुदखेड, हिंगोली प्रत्येकी २०. 
  • विदर्भ : कुही, सेलू, रामटेक, भंडारा, नागपूर प्रत्येकी ७०, यवतमाळ ६०, पारशिवणी, वर्धा, कोपर्णा, घाटंजी, मालेगाव, झरीझामणी, दारव्हा प्रत्येकी ५०, कामटी, लाखनी, नेर, हिंगणघाट, भिवापूर, पांढरीकवडा, कोर्ची, नरखेडा, मोहाडी, वरोरा, आर्वी, रिसोड, चिमुर प्रत्येकी ४०, मौदा, वणी, सोलकेसा, तुमसर, दऊळगाव राजा प्रत्यकी ३०, अकोला, बार्शीटाकळी, सिरोंचा, देवळी, लाखंदूर, गोंडपिप्री, धामणगाव रेल्वे, साकोली, वाशीम, आमगाव, मोर्सी, तिवसा, मंगरूळपीर, नागभिर, उमरेर, आष्टी, समुद्रपूर, धानोरा, परतवाडा, चंद्रपूर, चामोर्शी, हिंगणा, पुरसद, बल्लारपूर प्रत्येकी २०. 

दक्षिण कोकणात मुसळधारेची शक्यता
कोकणात पावसाने जोर धरला असून, दक्षिण कोकणात बुधवारपर्यंत (ता.१३) तुरळक ठिकाणी मुसळधारेचा इशारा देण्यात आला आहे. आज (ता.११) उत्तर कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच गुरुवारपर्यंत (ता.१४) कोकणात अनेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर विदर्भ, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.   

मॉन्सून जैसे थे
नैॡत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) शनिवारी मुंबईसह, ठाणे, नगर, यवतमाळ, ब्रह्मपुरीपर्यंत मजल मारून निम्मा महाराष्ट्र व्यापला आहे. मात्र रविवारी (ता.१०) माॅन्सूनची स्थिती जैसे थे असून, कोणतीही प्रगती झाली नसल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. दरम्यान बंगालच्या उपसागरातमध्ये ठळक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होतो. या प्रणालीची तीव्रता वाढत असून, ओडिशा पश्‍चिम बंगालसह ईशान्य भारतात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मंगळवारपर्यंत (ता.१२) विदर्भ, छत्तीसगड, पश्‍चिम बंगाल आणि सिक्कीमसह ईशान्य भारतातील राज्यात मॉन्सूनची प्रगती शक्य आहे. 


इतर अॅग्रो विशेष
राज्यात ३० टक्के दूध वापराविनापुणे: कोरोना विषाणुमुळे पसरलेल्या साथीनंतर सुरू...
औरंगाबाद : शेतकरी गटामार्फत ग्राहकांना...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
नगर जिल्ह्यात पाचशे टन भाजीपाला...नगरः कोरोना संसर्गाच्या पाश्वभूमीवर लॉकडाऊनमुळे...
जगभरात कोरोनामुळे ३० हजार मृत्यूः...जिनिव्हा: जगभरात कोरोना विषाणूचे थैमान सुरुच...
विदर्भात विजांसह पावसाची शक्यतापुणे : राज्यात सुरू असलेला पूर्वमोसमी पाऊस काहीशी...
थेट विक्रीने सोडविला दराचा प्रश्‍नऔरंगाबाद: कोरोनामुळे शेतमाल विक्रीचा प्रश्न...
पुणे, मुंबईतील सोसायटीधारकांनी...पुणे ः शहरी भागातील हाउसिंग सोसायटी भागातील...
खताचे आठ रेल्वे रेक ‘अनलोड’ पुणे : कोरोना लॉकडाऊननंतर राज्याच्या विविध भागात...
राज्यातील २२० बाजार समित्यांचे कामकाज...पुणे: कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी...
लॉकडाऊन वाढवण्याचा विचार नाही : कॅबिनेट...नवी दिल्ली: कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी १४...
उन्हाच्या चटक्यात महाराष्ट्र होरपळणारपुणे : यंदाच्या उन्हळ्यात महाराष्ट्र उन्हाच्या...
यंदाची चैत्री वारी रद्द, पंढरपुरात येऊ...सोलापूर ः पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेची...
पुणे बाजार समितीत १७ हजार क्विंटल फळे...पुणे: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
जळगाव बाजारसमितीत सोशल डिस्टन्सिंगकडे...जळगाव  ः येथील बाजार समितीत भाजीपाल्याची आवक...
देशात कोरोनाबाधीत १०७१ रुग्ण  नवी दिल्ली: देशात कोरोनाबाधीत रुग्णांची...
कोकण रेल्वेकडून अत्यावश्यक वस्तूंची जलद...रत्नागिरीः देशभरातील जनतेला आवश्यक वस्तूंचा...
सोनाई प्रकल्पात दहा लाख लिटर दूध नासले...पुणे: कोरोनामुळे राज्यात दुधाचा महापूर सुरू झाला...
बार्शी तालुक्यातील द्राक्षपट्टा...सोलापूर  ः कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर...
पुणे विभागात ३२९ क्विंटल भाजीपाल्याची...पुणे  ः ‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
शाळांमध्ये शिल्लक धान्यांचे ...पुणे : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर राज्यातील शाळांना...