कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधारेचा इशारा; पावसाचा जोर कमी होणार

आज (गुरुवारी) कोकणातील ठाणे, पालघर, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधारेचा इशारा; पावसाचा जोर कमी होणार
कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधारेचा इशारा; पावसाचा जोर कमी होणार

पुणे  : बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी तीव्रतेचे वादळाची तीव्रता कमी झाली आहे. महाराष्ट्राच्या दक्षिण भाग व उत्तर कर्नाटककडून अरबी समुद्राकडे सरकले आहे. दरम्यान अरबी समुद्राच्या पश्चिममध्य भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. आज (गुरुवारी) कोकणातील ठाणे, पालघर, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. बंगालच्या उपसागरातील कमी तीव्रतेचे चक्रीवादळ आंध्रप्रदेशाच्या किनाऱ्यावरून जमिनीवरून उत्तर कर्नाटक व दक्षिण महाराष्ट्राच्या भागावरून अरबी समुद्राकडे गेले आहे. त्यामुळे राज्यातही काही प्रमाणात वेगाने वादळी वारे वाहत होते. उत्तर कर्नाटकातील गुलबर्गा परिसरातील पश्चिम उत्तर भागात ताशी १३० किलोमीटर वेगाने तर तेलंगणातील हैदराबाद पश्चिम भागात ताशी ५० किलोमीटर वेगाने वारे होते. आज गुजरातच्या दक्षिण भागात व उत्तर कोकणात व अरबी समुद्रात असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी होणार आहे. त्यामुळे कोकण व मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी मुसळधार व अतिवृष्टी होईल. या दिवशी येथे पडणार पाऊस   गुरुवार ः ठाणे, रायगड, पालघर, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नगर,  कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, उस्मानाबाद, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा,  यवतमाळ.   शुक्रवार ः ठाणे, पालघर, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नगर, पुणे, सातारा, औरंगाबाद, जालना,  बीड, उस्मानाबाद, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, वाशीम, वर्धा, यवतमाळ, नागपूर, गोंदिया.  शनिवार ः पालघर, अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशीम, यवतमाळ.  रविवार ः अकोला, अमरावती,  बुलडाणा.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com