Agriculture news in marathi, Konkan water will provide comfort to Marathwada : Guardian Minister Kadam | Agrowon

कोकणातील पाण्यामुळे मराठवाड्याला दिलासा मिळेल : पालकमंत्री कदम

टीम अॅग्रोवन
शनिवार, 17 ऑगस्ट 2019

नांदेड :  ‘‘राज्य शासनाने कोकणातून मराठवाड्याला पाणी देण्याचा घेतलेला निर्णय दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील शेतकरी, जनतेला दिलासादायक ठरणार आहे,’’ असे प्रतिपादन राज्याचे पर्यावरणमंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांनी केले.

नांदेड :  ‘‘राज्य शासनाने कोकणातून मराठवाड्याला पाणी देण्याचा घेतलेला निर्णय दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील शेतकरी, जनतेला दिलासादायक ठरणार आहे,’’ असे प्रतिपादन राज्याचे पर्यावरणमंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आयोजित स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य शासकीय समारंभामध्ये गुरुवारी (ता. १५) कदम बोलत होते. जिल्हा परिषद अध्यक्षा शांताबाई पवार, महापौर दीक्षा धबाले, खासदार प्रताप पाटील चिखलीकर, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, विशेष पोलिस महानिरीक्षक प्रकाश मुत्याल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, महापालिकेचे आयुक्त लहुराज माळी, पोलिस अधीक्षक संजय जाधव, अप्पर पोलिस अधीक्षक दत्तराम राठोड, समाज कल्याण सभापती शीला निखाते, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण उपस्थित होते.

कदम म्हणाले, ‘‘यंदाच्या पावसाळ्यात सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली. परंतु मराठवाडा मात्र मोठ्या पावसाअभावी तहानला आहे. मराठवाड्यावर निसर्गाची अवकृपा आहे. शेतकरी पावसाची वाट पहात आहेत. दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्याला कोकणामधून मराठवाड्याला पाणी देण्याचा निर्णय निश्चित दिलासा देईल.’’

‘‘जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पावसाचे पाणी जमिनीत साठवण्याचा जलपुनर्भरणाचा उपक्रम जिल्हा प्रशासनाने हाती घेतला आहे. हा उपक्रम शहरी, ग्रामीण भागातही राबविला पाहिजे. सर्वांनी प्रयत्न केल्यास दुष्काळाशी सहज सामना करू शकतो. टंचाईसह विविध विकासकामांसाठी राज्य शासन मराठवाड्याच्या सदैव पाठीशी राहील,’’ असे कदम यांनी सांगितले.

कदम यांच्या हस्ते दीनदयाल उपाध्याय अंत्योदय अभियानांतर्गत पात्र लाभार्थ्यांना गॅस वितरण करण्यात आले. गुणवंत विद्यार्थी, उत्कृष्ट कामगिरी करणारे कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दत्ता देशमुख, विजय देशमुख, विक्रांत देशमुख, बालाजी नरंगले, पत्रकारांकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठीचा धनादेश कदम यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला. रेन वॉटर हार्वेस्टिंगचे कदम यांच्या हस्ते उद्‍घाटन झाले. 


इतर बातम्या
खानदेशात कांदा लागवड १४ हजार हेक्‍टरवरजळगाव  ः खानदेशात रब्बी हंगामातील कांदा...
‘कर्जमुक्ती योजनेसाठी येणाऱ्या...अकोला  ः  महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी...
द्राक्षपट्ट्यासह आदिवासी भागात खुलली...नाशिक  : स्ट्रॉबेरी लागवडीसाठी महाबळेश्वरची...
आगामी हंगामासाठी सोयाबीनचे बियाणे राखून...अकोला  : सोयाबीन पिकाखालील पेरणी...
सांगलीत हळदीच्या उत्पादनात घटसांगली : जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात आलेला महापूर...
चांद्यात फ्लॉवरच्या निकृष्ट...नगर : तेलंगण राज्यातील एका बियाणे कंपनीचे...
'थेट जनतेतून सरपंच निवडीचा निर्णय कायम...सोलापूर  ः राज्य सरकारने थेट जनतेतून सरपंच...
औरंगाबाद जिल्ह्यातील टंचाई...औरंगाबाद : जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईचे...
लातूर विभागातील दोन हजार हेक्टरवर फळबाग...नांदेड : कृषीच्या लातूर विभागांतर्गतच्या परभणी,...
अकोला बाजार समितीचे गरजूंना पाठबळअकोला ः कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पुढाकाराने...
उशिराच्या गव्हाला वाढत्या तापमानाचा...जळगाव  ः खानदेशात गहू पिकाची स्थिती...
पपई दरांचा नंदुरबारात पुन्हा तिढाशहादा, जि. नंदुरबार  : सध्या मंदी असल्याने...
पीकविमा भरपाई न मिळाल्यास तीव्र आंदोलन...अमरावती  ः जिल्ह्यात खरीप व रब्बी हंगामात...
गडचिरोली : 'आयसीएआर'ची काजू पीक...गडचिरोली  ः भात उत्पादक पूर्व विदर्भात...
ऐन फेब्रुवारीतच उन्हाळ्याच्या झळा पुणे : राज्यात कमाल तापमानात मोठी वाढ झाल्याने...
वनबंधू योजना सुरू करण्यासाठी केंद्राकडे...नाशिक : आदिवासी विभागाच्या वनबंधू योजनेअंतर्गत १४...
कलाग्रामच्या माध्यमातून बचत गटांसाठी...नाशिक : दिल्ली हाटच्या धर्तीवर नाशिकमध्ये...
मराठवाड्यातील रेशीम प्रकल्पाला ग्रीन...औरंगाबाद : झपाट्याने विस्तारत असलेल्या रेशीम...
ऊस उत्पादकता २५० टनांपर्यंत न्यावीच...पुणे : देशातील ऊस उत्पादकता एकरी शंभर टन...
कर्जमाफीसाठी आकस्मिकता निधीतून दहा हजार...मुंबई : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्य सरकारने...