Agriculture news in marathi, Kothambir per hundred Rs 2000 to 3000 in Satara | Agrowon

साताऱ्यात कोथिंबिरीस प्रतिशेकडा २००० ते ३००० रुपये

टीम अॅग्रोवन
बुधवार, 6 नोव्हेंबर 2019

सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता. ५) कोथिंबीर, वांगी, पावटा, फ्लॅावर, दुधी दरात सुधारणा झाली आहे. टोमॅटोच्या आवकेत वाढ झाली आहे. कोथिंबिरीची १२०० जुड्यांची आवक झाली. त्यांना प्रतिशेकड्यास २००० ते ३००० असा दर मिळाला. कोथिंबिरीला शेकड्यामागे एक हजार रुपयांची दरवाढ झाली आहे, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता. ५) कोथिंबीर, वांगी, पावटा, फ्लॅावर, दुधी दरात सुधारणा झाली आहे. टोमॅटोच्या आवकेत वाढ झाली आहे. कोथिंबिरीची १२०० जुड्यांची आवक झाली. त्यांना प्रतिशेकड्यास २००० ते ३००० असा दर मिळाला. कोथिंबिरीला शेकड्यामागे एक हजार रुपयांची दरवाढ झाली आहे, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

येथील बाजार समितीत बहुतांशी भाज्याच्या दरात कमी-अधिक प्रमाणात वाढ झाली आहे. वांग्याची दहा क्विंटल आवक होऊन प्रतिदहा किलोस ६०० ते ६५० असा दर मिळाला आहे. पावट्याची चार क्विंटल आवक झाली. त्यास दहा किलोस ४०० ते ५०० असा दर मिळाला. वांगी व पावट्यास दहा किलो मागे शंभर रुपयांची दरवाढ झाली. फ्लॅावरची ३० क्विंटल आवक झाली. 

त्यास दहा किलोस २०० ते २५० रुपये असा दर मिळाला. दुधीला चार क्विंटलला २५० ते ३०० असा दर मिळाला आहे. फ्लॅावर व दुधीच्या दरात दहा किलोमागे ५० रुपयांची दरवाढ झाली. 

दोडक्याची १३ क्विंटल आवक झाली. त्यास दहा किलोस ३०० ते ३५० असा दर मिळाला. हिरव्या मिरचीची १८ क्विंटल आवक झाली. दहा किलो मिरचीस १५० ते २०० असा दर मिळाला. गवारीची १८ क्विंटल आवक झाली. तिला दहा किलोस ३५० ते ४०० रुपये असा दर मिळाला. वॅाल घेवड्याची दोन क्विंटल आवक झाली. त्यास ४०० ते ४५० असा दर मिळाला. कारल्याची आठ क्विंटल आवक झाली. त्यांना दहा किलोस ३५० ते ४०० असा दर मिळाला आहे. 

ढोबळ्या मिरचीची तीन क्विंटल आवक झाली. तिला प्रतिदहा किलो ३०० ते ३५० रुपये असा दर मिळाला. भेंडीची १५ क्विंटल आवक होऊन प्रतिदहा किलोस १५० ते २०० असा दर मिळाला. काकडीची दहा क्विंटल आवक झाली. तिला दहा किलोस १०० ते १५० रुपये असा दर मिळाला. टोमॅटोच्या आवकेत वाढ झाली आहे.

टोमॅटोची ६४ क्विंटल आवक झाली. त्यांना दहा किलोस १५० ते २०० असा दर मिळाला. पालेभाज्यांत मेथीची एक हजार जुड्याची आवक झाली. मेथीस प्रतिशेकड्यास १५०० ते २००० असा दर मिळाला, अशी माहिती मिळाली. 
 


इतर बाजारभाव बातम्या
पपई १४.५५ रुपये प्रतिकिलो शहादा, जि. नंदुरबार  : पपई उत्पादक शेतकरी व...
कोल्हापुरात गवार, घेवड्याच्या दरात...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...
सोलापुरात द्राक्ष, डाळिंबाला उठाव, दर...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नगर जिल्ह्यात ज्वारीची आवक वाढली, दरात...नगर : नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या...
महाशिवरात्रीनिमित्त पुण्यात रताळी,...पुणे  ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न...
औरंगाबादेत बटाटे ८०० ते १६०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटलला १५०० ते...परभणी ः  येथील पाथरी रस्त्यावरील फळे...
राज्यात वांगी प्रतिक्विंटल ३०० ते ३५००...पुणे  ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न...
जळगावात गवार १८०० ते ३८०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता....
कोल्हापुरात गवार दहा किलोस २०० ते ५००...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...
नगरला ज्वारीच्या आवकेत वाढनगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या...
सोलापुरात गाजर, काकडीला उठावसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
फ्लॉवर, गाजर, भेंडी, कोबी, वांग्याच्या...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
डाळिंबाची आवक घटली, मागणी नसल्याने दरही...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
पुण्यात हिरवी मिरची, मटारच्या दरात वाढपुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादमध्ये हिरवी मिरची १६०० ते २०००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत भेंडी २५०० ते ३००० रुपये...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
कांदा दरांवर खानदेशात दबावजळगाव  ः खानदेशात प्रमुख कृषी उत्पन्न बाजार...
लिंबाला राज्यात प्रतिक्विंटल २०० ते...पुणे  ः  गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न...
पुणे बाजार समितीत कांद्याची आवक... पुणे : ‘‘गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...