यवतमाळमधील कोठोडा ठरले उत्कृष्ट आदर्शगाव

मंत्रालय इमारत
मंत्रालय इमारत

पुणे ः आदर्शगाव संकल्प व प्रकल्प योजनेअंतर्गत २०१७-१८ या आर्थिक वर्षामध्ये सहभाग घेत असलेल्या गावांचे पुरस्कार जाहीर केले आहे. या पुरस्कारांमध्ये यवतमाळमधील कोठोडा गावाला पहिल्या क्रमांकाचे उत्कृष्ट आदर्शगाव भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.  या पुरस्काराचे वितरण जलसंधारणमंत्री तानाजी सावंत, राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या हस्ते बुधवारी (ता. ११) सायंकाळी चार वाजता होणार आहे. या वेळी सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त सुहास दिवसे, आदर्शगाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार आदी उपस्थित राहणार आहेत. आदर्शगाव संकल्प व प्रकल्प योजनेअंतर्गत उत्कृष्ट आदर्शगाव, उत्कृष्ट प्रकल्प कार्यान्वयक अभिकरण संस्था, उत्कृष्ट ग्राम कार्यकर्ता, ग्रामस्तरीय शासकीय कर्मचारी अशा स्वरूपाचे पुरस्कार देण्यात येतात. त्यामध्ये रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. यामध्ये उत्कृष्ट आदर्शगावासाठी पाच लाख, द्वितीयसाठी तीन लाख, तृतीय क्रमांकासाठी दोन लाख रुपये अशी पुरस्काराची रक्कम आहे. तर उत्कृष्ट प्रकल्प कार्यान्वयन अभिकरण संस्थेसाठी प्रथम क्रमांकासाठी एक लाख, द्वितीय ५० हजार, तृतीय क्रमांकासाठी २० हजार रुपये, तर उत्कृष्ट ग्राम कार्यकर्तासाठी प्रथम क्रमांकासाठी २५ हजार, द्वितीय १५ हजार, तृतीयसाठी १० तर ग्रामस्तरीय शासकीय कर्मचारी यांना स्मृतिचिन्ह व सम्नानपत्र देऊन गौरवविण्यात येणार आहे. ‘‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदर्श गाव योजनेला चांगले पाठबळ मिळाले. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, मंत्री राम शिंदे व जलसंधारण मंत्री तानाजीराव सावंत यांच्याकडून सतत प्रेरणा व प्रोत्साहन मिळाल्यामुळे आदर्श गाव योजनेची राज्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करता आली. राज्य स्तरीय पुरस्कारामुळे गावकऱ्यांचा निश्‍चित उत्साह वाढणार आहे,’’ अशी माहिती आदर्श गाव संकल्प व प्रकल्प  समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी दिली. जाहीर झालेले पुरस्कार  

वर्ग   पुरस्कार विजेते
उत्कृष्ट आदर्शगाव पुरस्कार  कोठोडा, ता. पांढरकवडा, जि. यवतमाळ (प्रथम)
  शेळगाव गौरी, ता. नायगाव, जि. नांदेड (द्वितीय)
  भागडी, ता. आंबेगाव. जि. पुणे (द्वितीय)
  गोंधनी, ता. उमरेड, जि. नागपूर (तृतीय)
  विरसई, ता. दापोली, जि. रत्नागिरी (तृतीय)  
उत्कृष्ट प्रकल्प कार्यान्वयन अभिकरण संस्था     ज्ञानशक्ती विकास वाहिनी, डीएसके बिल्डिंग, मंचर, ता. आंबेगाव, जि. पुणे (प्रथम)
  प्रादेशिक बहुउद्देशीय शिक्षण व आरोग्य सेवा संस्था, गोंधणी, ता. उमरेड, जि. नागपूर (द्वितीय)
  विकास सामाजिक संस्था, वरोरा, ता. वरोरा, जि. चंद्रपूर (तृतीय)
उत्कृष्ट ग्राम कार्यकर्ता   सुनील दत्तात्रय पावडे, कोठोडा, ता. पांढरकवडा, जि. यवतमाळ (प्रथम)
      काशिनाथ यादवराव शिंपाळे, शेळगाव गौरी, ता. नायगाव, जि. नांदेड (द्वितीय)
  परम तुकाराम काळे, गोंधनी, ता. उमरेड, जि. नागपूर (तृतीय)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com