कोयना धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला

कोयना धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला
कोयना धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला

सातारा ः कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा कायम आहे. धरणात २४ तासांत ४.३२ टीएमसीने वाढ होऊन धरणातील पाणीसाठा ८२.६० टीएमसीवर गेला आहे. कोयना धरण पाण्याने ७८.४९ टक्के भरले आहे. 

कोयना धरणक्षेत्रातील कोयना १६५, नवजा १४७, महाबळेश्वर २२२ मिलिमीटर पाऊस होऊन धरणात २४ तासांत ४.३२ टीएमसीने वाढ झाली आहे. कोयना धरणाची  पाणीपातळी २१४४.०१ फूट झाली असून ८२.६२० टीएमसी एकूण पाणीसाठा झाला आहे. पाणीसाठा नियंत्रित राहण्यासाठी पायथा वीजगृहातून गुरुवारी सकाळी सुरू केलेला २१०० क्युसेक पाणीसाठा गुरूवारी रात्री कमी करत १०५० क्युसेकवर आणण्यात आला आहे. 

तारळी धरणात क्षेत्रातील पावसाचा जोर कायम राहिल्याने या धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. सध्या या धरणातून ५६२२ क्युसेक पाणी सोडले जात आहे. कण्हेर धरणाची तशीस परिस्थिती असल्याने याही धरणातून विसर्ग सुरू आहे. कण्हेर धरणातून ५९९८ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. उरमोडी धरणातही पाण्याची आवकेत वाढ मोठ्या प्रमाणात होत असल्याने पाण्याचा विसर्ग लवकरच सुरू करण्यात येणार असल्याने उरमोडी नदी काठच्या लोकांना सर्तकतेचा इशारा देण्यात येणार आहे. पाण्याच्या विसर्गामुळे कोयना, वेण्णा, तारळी, कृष्णा नद्याच्या दुधडी भरून वाहत आहे. 

प्रमुख धरणातील उपयुक्त पाणीपातळी टीएमसीमध्ये व कंसात टक्केवारी ः कोयना- ७७.५० (७७.४०), धोम- ७.६५ (६५.४६), धोम-बलकवडी- ३.५३ (८९.०४), कण्हेर- ८.८० (९१.७१), उरमोडी- ६.९२ (७१.७०), तारळी- ५.०९ (८७.१३), नीरा-देवघर- १०.४४ (८९.०३), भाटघर- २०.२० (८५.९६), वीर- ८.९० (९४.६६).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com