कोयना धरण क्षेत्रात  पावसाचा जोर कायम 

कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने पाण्याचा विसर्ग सुरू ठेवणात आला आहे. त्यामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली असून, नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
कोयना धरण क्षेत्रात  पावसाचा जोर कायम  In the Koyna dam area The rain continued
कोयना धरण क्षेत्रात  पावसाचा जोर कायम  In the Koyna dam area The rain continued

सातारा : कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने पाण्याचा विसर्ग सुरू ठेवणात आला आहे. त्यामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली असून, नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.  कोयना धरणाच्या पावसाचा जोर वाढल्याने धरणात पाण्याची आवक वाढत गेली. त्यामुळे धरण व्यवस्थापनाकडून रविवारपासून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. पाण्याची आवक वाढत राहिल्याने विसर्गातही टप्प्याटप्प्याने वाढ करत नेण्यात आली आहे. मंगळवारी सकाळी आठ वाजता कोयना धरणाचे दरवाजे व पायथा वीजगृहातून ४९ हजार ९२७ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणात १०४.९२ टीएमसी पाणीसाठा झाला आहे, म्हणजेच धरण ९९.६९ टक्के भरले आहे. धरण क्षेत्रात २४ तासांत कोयना १०७, नवजा १३९ व महाबळेश्‍वर १३९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सध्या धरणातून सरासरी ४९ हजार ९२७ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. जेवढी पाण्याची आवक होत आहे, तेवढेचे पाणी सोडले जात असल्याने कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. 

पुणे जिल्ह्यातील सतरा  धरणांतून पाण्याचा विसर्ग 

पुणे : पुणे जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे धरणातील पाणी पातळीत झपाट्याने वाढत आहे. परिणामी जिल्ह्यातील सतरा धरणांतून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे नद्या व कालवे दुथडी भरून वाहत असल्याने नदीकाठच्या गावांतील विहिरीच्या पाणीपातळीत वाढ होऊ लागली आहे.  चालू महिन्यांत पावसाचा जोर काहीसा वाढला आहे. पूर्व भागात पावसाचा प्रभाव कमी असला तरी पश्‍चिम पट्यात पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. त्यामुळे भात खाचरे भरून वाहत असल्याने भात पिकांनाही चांगलाच दिलासा मिळत आहे. मंगळवारी (ता.१४) सकाळी आठ वाजेपर्यंत नीरा देवघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ६६ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. तर टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही ५५ मिलिमीटर, वडीवळे ५३, पवना ५२, पानशेत ४०, वरसगाव ३९, डिंभे ३७, पिंपळगाव जोगे ३६, भाटघर ३१, गुंजवणी ३३, माणिकडोह ३०, कळमोडी २८ मिलिमीटर पाऊस पडला. तर नाझरे, येडगाव, वडज, घोड, आंध्रा, चासकमान, कासारसाई, खडकवासला या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात हलका पाऊस पडला. त्यामुळे जवळपास १७ धरणे शंभर टक्के भरली आहे. उर्वरित धरणेही भरण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे आगामी काळातील पिण्याच्या पाण्याचा व शेतीचा काही प्रमाणात प्रश्‍न सुटणार आहे.  सध्या मुठा खोऱ्यातील टेमघर धरणातून ७००, वरसगाव ५०४२, पानशेत ४१८०, खडकवासला १३ हजार १४५ क्सुसेकने सांडव्यात व मुठा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला होता. नीरा खोऱ्यातील पवना धरणातून ३५९८, कासारसाईतून ४५० क्सुसेकने पवना नदीत, कळमोडीतून १२२६ क्सुसेकने आरळा नदीत, चासकमानमधून ६३६० क्सुसेकने भामा नदीत, आंध्रा धरणातून ७२२ क्सुसेकने इंद्रायणी नदीत, गुंजवणी धरणातून ९६८ क्युसेक, भाटघर धरणातून ५८२४ क्युसेक, नीरा देवघर धरणातून ५११० क्युसेक तर वीर धरणातून ३४ हजार ८८ क्सुसेकने कानंदी आणि नीरा नदीत पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. कुकडी खोऱ्यातील वडज धरणातून २८०९ क्सुसेकने मीना नदीत, डिभे धरणातून ८२८० क्सुसेकने, चिल्हेवाडीतून ८०० क्सुसेकने घोड नदीत पाणी सोडण्यात आले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com