Agriculture News in Marathi In the Koyna dam area The rain continued | Agrowon

कोयना धरण क्षेत्रात  पावसाचा जोर कायम 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 15 सप्टेंबर 2021

कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने पाण्याचा विसर्ग सुरू ठेवणात आला आहे. त्यामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली असून, नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 
 

सातारा : कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने पाण्याचा विसर्ग सुरू ठेवणात आला आहे. त्यामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली असून, नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 

कोयना धरणाच्या पावसाचा जोर वाढल्याने धरणात पाण्याची आवक वाढत गेली. त्यामुळे धरण व्यवस्थापनाकडून रविवारपासून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. पाण्याची आवक वाढत राहिल्याने विसर्गातही टप्प्याटप्प्याने वाढ करत नेण्यात आली आहे. मंगळवारी सकाळी आठ वाजता कोयना धरणाचे दरवाजे व पायथा वीजगृहातून ४९ हजार ९२७ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

धरणात १०४.९२ टीएमसी पाणीसाठा झाला आहे, म्हणजेच धरण ९९.६९ टक्के भरले आहे. धरण क्षेत्रात २४ तासांत कोयना १०७, नवजा १३९ व महाबळेश्‍वर १३९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सध्या धरणातून सरासरी ४९ हजार ९२७ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. जेवढी पाण्याची आवक होत आहे, तेवढेचे पाणी सोडले जात असल्याने कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. 

पुणे जिल्ह्यातील सतरा 
धरणांतून पाण्याचा विसर्ग 

पुणे : पुणे जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे धरणातील पाणी पातळीत झपाट्याने वाढत आहे. परिणामी जिल्ह्यातील सतरा धरणांतून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे नद्या व कालवे दुथडी भरून वाहत असल्याने नदीकाठच्या गावांतील विहिरीच्या पाणीपातळीत वाढ होऊ लागली आहे. 

चालू महिन्यांत पावसाचा जोर काहीसा वाढला आहे. पूर्व भागात पावसाचा प्रभाव कमी असला तरी पश्‍चिम पट्यात पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. त्यामुळे भात खाचरे भरून वाहत असल्याने भात पिकांनाही चांगलाच दिलासा मिळत आहे. मंगळवारी (ता.१४) सकाळी आठ वाजेपर्यंत नीरा देवघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ६६ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. तर टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही ५५ मिलिमीटर, वडीवळे ५३, पवना ५२, पानशेत ४०, वरसगाव ३९, डिंभे ३७, पिंपळगाव जोगे ३६, भाटघर ३१, गुंजवणी ३३, माणिकडोह ३०, कळमोडी २८ मिलिमीटर पाऊस पडला.

तर नाझरे, येडगाव, वडज, घोड, आंध्रा, चासकमान, कासारसाई, खडकवासला या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात हलका पाऊस पडला. त्यामुळे जवळपास १७ धरणे शंभर टक्के भरली आहे. उर्वरित धरणेही भरण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे आगामी काळातील पिण्याच्या पाण्याचा व शेतीचा काही प्रमाणात प्रश्‍न सुटणार आहे. 

सध्या मुठा खोऱ्यातील टेमघर धरणातून ७००, वरसगाव ५०४२, पानशेत ४१८०, खडकवासला १३ हजार १४५ क्सुसेकने सांडव्यात व मुठा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला होता. नीरा खोऱ्यातील पवना धरणातून ३५९८, कासारसाईतून ४५० क्सुसेकने पवना नदीत, कळमोडीतून १२२६ क्सुसेकने आरळा नदीत, चासकमानमधून ६३६० क्सुसेकने भामा नदीत, आंध्रा धरणातून ७२२ क्सुसेकने इंद्रायणी नदीत, गुंजवणी धरणातून ९६८ क्युसेक, भाटघर धरणातून ५८२४ क्युसेक, नीरा देवघर धरणातून ५११० क्युसेक तर वीर धरणातून ३४ हजार ८८ क्सुसेकने कानंदी आणि नीरा नदीत पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. कुकडी खोऱ्यातील वडज धरणातून २८०९ क्सुसेकने मीना नदीत, डिभे धरणातून ८२८० क्सुसेकने, चिल्हेवाडीतून ८०० क्सुसेकने घोड नदीत पाणी सोडण्यात आले आहे. 

 
 


इतर बातम्या
बंगालच्या उपसागरात घोंघावतेय चक्रीवादळपुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
बांगलादेशला रेल्वेद्वारे होणार संत्रा...नागपूर : किसान रेल्वेच्या माध्यमातून संत्रा...
‘गोकुळ’तर्फे दुभत्या जनावरांना लाखाचा...कोल्हापूर : दुभत्या जनावरांचा कोणत्याही आजाराने...
पितृपक्षामुळे सुकामेव्याला मागणी वाढलीपुणे : पितृपक्षाला प्रारंभ झाल्यानंतर काही...
साखर दरवाढीची गोडी कायमकोल्हापूर : गेल्या महिन्यापासून साखर दरात आलेल्या...
राज्यात विजा, मेघगर्जनेसह पावसाचा इशारापुणे : राज्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी...
सार्वजनिक पाणीपुरवठा, पथदिव्यांची  ५६...कोल्हापूर : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील...
पुणे जिल्ह्यात  पावसाची उघडीप पुणे : पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने अनेक...
यंदा भाताचे उत्पादन वाढण्याची शक्यताकोल्हापूर : गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा देशात...
शेतीला सोलर कुंपण घाला यवतमाळ : वन्य प्राण्यांमुळे ज्या भागात नियमितपणे...
सततच्या पावसामुळे  रिसोडमध्ये सोयाबीन...रिसोड, जि. वाशीम : तालुक्यात २० सप्टेंबरपासून सतत...
प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ मिळाले,...औरंगाबाद : गतवर्षीच्या रब्बी हंगामात आयोजित...
  सांगली जिल्हा बँकेच्या  चौकशीला...सागंली : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सहकार कायदा...
खरीप हंगाम काढणीवर  पावसाचे गडद सावट नांदुरा, जि. वाशीम : खरीप हंगामातील पिके...
४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे आज...औरंगाबाद : ४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे...
खानदेशात प्रशासनाकडून रब्बीतील पीककर्ज...जळगाव  : खानदेशात रब्बी पीककर्ज वितरणाची...
मराठवाड्यात पावसाचा जोर औरंगाबाद : मराठवाड्यात गुरुवारी (ता. २३)...
जळगाव जिल्ह्यास पावसाने झोडपलेजळगाव  : जिल्ह्यात गुरुवारी (ता.२३) अनेक...
तडवळेत जोरदार पावसामुळे सोयाबीन...कसबे तडवळे, जि. उस्मानाबाद : परिसरात गेल्या चार...
परभणी, हिंगोलीत पावसाने सोयाबीनला फुटले...परभणी ः परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचा कहर सुरु...