‘कोयने'ची वीज बंद पडण्याची शक्‍यता

‘कोयने'ची वीज बंद पडण्याची शक्‍यता
‘कोयने'ची वीज बंद पडण्याची शक्‍यता

चिपळूण, जि. रत्नागिरी : कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयात अत्यंत कमी पाणीसाठा आहे. त्यामुळे कोयना प्रकल्पाच्या वीजनिर्मितीवर मर्यादा आली आहे. पाऊस लांबल्यास वीजनिर्मिती बंद होऊन राज्यात भारनियमन सुरू होण्याची शक्‍यता आहे. महानिर्मितीच्या अधिकाऱ्यांनीही त्याला दुजोरा दिला.  महानिर्मिती कंपनीने १ जूनपासून दोन हजार मेगावॉट क्षमतेच्या वीज प्रकल्पासाठी कमी पाणी वापरण्याचा निर्णय घेतला आहे. वीजनिर्मितीसाठी तीन टीएमसी पाणीसाठा आरक्षित करण्याचे निश्‍चित करण्यात आले आहे. कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयात १०५.२५ टीएमसी पाणीसाठा केला जातो. गेल्या वर्षी ऑक्‍टोबर महिन्यात धरण भरले. त्यामुळे धरणातून आतापर्यंत पूर्वेकडील सिंचन व पश्‍चिमेकडील वीजनिर्मितीसाठी १०१.८८ टीएमसी पाणी सोडण्यात आले. पण कोयना धरणातील पाणीसाठ्याने सध्या तळ गाठला आहे. धरणात केवल १२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. जून महिन्यात धरम पाच टीएमसी पाणी ठेवण्याचे नियोजन प्रकल्पाने केले आहे. मॉन्सून सक्रिय होण्यास विलंब होणार आहे. सिंचन व वीजनिर्मितीसाठी कोयनेतून अखंड पाणीसाठा दिल्यास हे नियोजनच पूर्णतः कोलमडणार आहे. धरणात सध्या १७.१० टीएमसी पाणीसाठा असला तरी, १२.०४ टीएमसी पाणीसाठा उपयुक्त आहे. तर पश्‍चिमेकडील वीजनिर्मितीसाठी वापराअभावी शिल्लक असलेल ४.६ टीएमसी पाणीसाठा पाणीवाटप करार संपण्याआधीच वापर केला, तर जून महिन्यात धरणात पाणी नसल्यास कोयनेची वीजनिर्मिती आपोआप बंद पडणार आहे. त्यामुळे वीज कंपनीने पाणीकपात धोरण स्वीकारावे, असा प्रस्ताव कोयना प्रकल्पाने दिला आहे. त्याला महानिर्मितीकडून मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे जून महिन्यात कोयना धरणात केवळ तीन टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहणार आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com