Agriculture news in marathi Koyne's water is red due to excessive deforestation | Agrowon

सातारा :बेसुमार वृक्षतोडीमुळे कोयनेचे पाणी लाल

टीम अॅग्रोवन
बुधवार, 4 ऑगस्ट 2021

कोयना धरण परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृतपणे वृक्षतोड होत असल्याने पावसाळ्यात धरणातून सोडलेल्या पाण्याच्या प्रवाहाचा रंग लाल व तांबडा दिसत आहे. हा प्रकार अतिशय गंभीर आहे.

सातारा : कोयना धरण परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृतपणे वृक्षतोड होत असल्याने पावसाळ्यात धरणातून सोडलेल्या पाण्याच्या प्रवाहाचा रंग लाल व तांबडा दिसत आहे. हा प्रकार अतिशय गंभीर आहे. झाडांची कत्तल करणाऱ्यांना सरकारचे अभय आहे. येत्या महिनाभरात या परिसरातील अनधिकृतपणे वृक्षतोड करणाऱ्यांवर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करणार असल्याचा इशारा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी सोमवारी (ता. २) पत्रकार परिषदेत दिला. 

गेल्या पंधरा दिवसांपूर्वी मुसळधार पावसाने हाहाकार माजविला होता. या काळात कोयना धरणातून पाणी सोडल्यानंतर लालसर रंगाचे पाणी दिसून आले. हा प्रकार कोयना, चांदोली व राधानगरी या धरणाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड सुरू असल्याने होत आहे. या परिसरातून ट्रक भरून झाडांचे लाकडे बाहेर जात आहेत. झाडांच्या कत्तलीला राजकीय नेते व प्रशासकीय अधिकाऱ्यांचे अभय आहे. हा प्रकार तत्काळ न थांबविल्यास आंदोलन करण्याचा इशारा पाटील यांनी दिला आहे. अनधिकृतपणे झाडांच्या कत्तली करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी वन विभागाला निवेदन देण्यात आल्याचेही पाटील यांनी सांगितले. 

दरम्यान, सरकारी कर्मचाऱ्यांना वाढीव भत्ते दिले जात असताना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पैसे नसल्याचे सांगत सरकार फसवणूक करत आहे. भाजपने गेल्या पंचवार्षिकमध्ये व सध्या महाविकास आघाडीने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. पुढील काही दिवसांत शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या कर्जमाफीचे पैसे द्यावे अन्यथा जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला टाळे ठोकणार असल्याचा इशारा पाटील यांनी दिला आहे. या वेळी जिल्हाध्यक्ष विकास जाधव, शिवाजी नांदखिले, राजेंद्र बर्गे आदी उपस्थित होते.

 धरणातून होणारा विसर्ग घटला
कोयना धरण क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्यामुळे साडेदहा फुटांवर उघडण्यात आलेले धरणाचे दरवाजे दीड फुटांवर आणण्यात आले आहेत. धरणातून नदीपात्रात नऊ हजार ९२५ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. काही दिवसांपासून पाण्याखाली गेलेला मूळगाव येथील पूल पाण्याबाहेर आला आहे. सध्या धरणात येणाऱ्या पाण्याची सरासरी आवक नऊ हजार ९२५ क्युसेक झाली आहे. धरणात ८५.०६ टीएमसी पाणीसाठा आहे.


इतर बातम्या
‘अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांना  हेक्टरी...परभणी : अतिवृष्टीमुळे जमिनी खरडून गेल्या आहेत....
राज्यात पावसाचा जोर वाढणारपुणे : काहीशा विश्रांतीनंतर राज्यात पावसाला...
ज्वारी पेरली तर खरी,  पण वाचवायची कशी? अकोला : गेल्या काही वर्षांत सातत्याने ज्वारीचे...
‘कृषी’ शिक्षक म्हणून कृषी, संलग्न ...कोल्हापूर : शालेय शिक्षणात कृषी विषयाचा समावेश...
द्राक्ष बागायतदार संघाचे आजपासून ६१ वे...नाशिक : महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे...
पुरंदरमध्ये लवकरच प्रॉपर्टी कार्ड : ...गराडे, जि. पुणे : स्वामित्व योजना...
आमच्या गावाला ग्रामपंचायत द्या...गडचिरोली : आरमोरी तालुक्यातील रवी व मुल्लुरचक या...
मूग, सोयाबीन पिकाला कोंब फुटण्याची...पुणे : राज्यात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर...
साखरनिर्यातीचे १८०० कोटींचे अनुदान मंजूरकोल्हापूर : केंद्राने २०२०-२१ या हंगामात निर्यात...
पुणे जिल्ह्यात तुरळक  ठिकाणी हलक्या...पुणे : दोन दिवसांपासून पावसासाठी पोषक वातावरण...
एकरकमी एफआरपीसाठी  भारतीय किसान संघाचे...पुणे : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना रास्त व किफायतशीर...
नगरला कांदा दरात  चढ-उतार सुरूच नगर : नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
सुरळीत वीजपुरवठ्यासाठी  कुरुंदवाडमध्ये...कोल्हापूर : महापूर ओसरून दीड महिना झाला असून,...
शिसोदे समितीची आज तातडीची बैठकपुणे ः जलयुक्त शिवार कामांमध्ये झालेल्या कोट्यवधी...
सामाजिक, मानसिक स्वास्थ्यासाठी...पुणे ः ‘‘बदलत्या परिस्थितीत सामाजिक आणि मानसिक...
दोन आठवडे अगोदरच खरीप कांदा बाजारातनाशिक : जिल्ह्यातील चांदवड,देवळा, मालेगाव, येवला...
‘व्हीएसआय’च्या जालना केंद्रासाठी ३० कोटीपुणे ः विदर्भ, मराठवाड्याला मार्गदर्शक ठरणाऱ्या...
अखेर ‘चोसाका’ला मिळाली नवसंजीवनीचोपडा, जि. जळगाव  : ‘‘चोपडा शेतकरी सहकारी...
पूर्व विदर्भात पावसामुळे हाहाकार नागपूर : पूर्व विदर्भातील भंडारा आणि नागपूर...
पोषक आहाराबद्दल जागरूकता महत्त्वाची :...सोलापूर ः ‘‘आपल्या सर्वांसाठी पोषक आहार आवश्यक...