शेतकऱ्यांना तत्काळ कर्जासाठी कृषी कर्ज मित्र योजना

राज्यातील शेतकऱ्यांना वेळेत व सुलभरीत्या कर्ज मिळण्यासाठी ग्रामविकास विभागाने कृषी कर्ज मित्र योजना यंदा राबवण्याचा निर्णय घेतला आहे. कृषी कर्ज मित्रांसाठी प्रत्येक प्रकरणाकरिता दीडशे ते अडीचशे रुपयांचे सेवाशुल्क निश्‍चित करण्यात आले आहे.
Krishi Karj Mitra Yojana for immediate loans to farmers
Krishi Karj Mitra Yojana for immediate loans to farmers

नगर : राज्यातील शेतकऱ्यांना वेळेत व सुलभरीत्या कर्ज मिळण्यासाठी ग्रामविकास विभागाने कृषी कर्ज मित्र योजना यंदा राबवण्याचा निर्णय घेतला आहे. कृषी कर्ज मित्रांसाठी प्रत्येक प्रकरणाकरिता दीडशे ते अडीचशे रुपयांचे सेवाशुल्क निश्‍चित करण्यात आले आहे. ग्रामीण रोजगारनिर्मितीला चालना देणाऱ्या उपक्रमासाठी जिल्हा परिषदेला स्वनिधीच्या २०२१-२२ च्या अंदाजपत्रकात दहा लाख रुपयांची तरतूद करावी लागणार आहे. २०२१-२२ या वर्षासाठी ही योजना आहे. 

शेतकऱ्यांना खरीप, रब्बी हंगामासाठी राष्ट्रीयीकृत, सहकारी, खासगी बँका, पतसंस्थांच्या माध्यमातून कर्जपुरवठा केला जातो. शेतकऱ्यांचा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे कल अधिक असतो. सहकारी बँकेकडून विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्यांतर्फे कर्ज दिले जाते. शेतकरी नवीन पीक, मध्यम, दीर्घ मुदतीचे कर्ज घेतात. कर्ज घेण्यासाठी सात-बारा उताऱ्यापासून बँकांचे ना-हरकत प्रमाणपत्र अशी कागदपत्रे जमा करावी लागतात. त्यासाठी बराच कालावधी लागतो. अनेकदा हंगाम संपल्यावर कागदपत्रांअभावी कर्ज मिळत नाही. मग खासगी सावकाराकडून अधिक व्याजाने शेतकऱ्यांना कर्ज घ्यावे लागते. अशा परिस्थितीत सरकारने जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे कृषी कर्ज मित्र योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना कर्जे सहजपणे उपलब्ध होण्याला मदत होणार आहे. 

अल्प मुदत : पहिल्यांदा पीककर्ज घेणारा शेतकरी - प्रति प्रकरण सेवा शुल्क ः दीडशे रुपये मध्यम व दीर्घ मुदत :  नवीन कर्ज प्रकरण - प्रत्येक प्रकरण सेवा शुल्क ः दोनशे पन्नास रुपये  कर्जाचे नूतनीकरण करणे - प्रत्येक प्रकरण सेवा शुल्क ः दोनशे रुपये 

योजनेतील ठळक बाबी

  • कृषी कर्ज मित्राने ज्या शेतकऱ्यांना कर्जाची आवश्यकता आहे. अशा शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन कर्ज प्रकरणाच्या कार्यपद्धतीची माहिती द्यायची आहे. तसेच शेतकऱ्यांकडून मित्रांनी कागदपत्रे जमा करून कर्ज प्रकरण बँकेमध्ये जमा करायचे.
  • कृषी कर्ज मित्राकडून पारदर्शी व प्रामाणिकपणे शेतकऱ्यांना साह्य आणि सल्ला देण्याविषयीचे बंधपत्र घेणे आवश्‍यक राहील. कृषी कर्ज मित्रास शुल्क देण्यासाठी तालुकास्तरावर गटविकास अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती असेल. 
  • बँकेकडे कृषी कर्ज मित्र शेतकऱ्याच्या शिफारशीसह सेवाशुल्क मागणी सादर करतील. बँकेकडून तपासणी करून गटविकास अधिकाऱ्यांकडे सेवाशुल्क देण्यासाठी यादी दिली जाईल. 
  • कृषी कर्ज मित्र म्हणून सेवा देऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीला जिल्हा परिषदेच्या संकेत स्थळावर नोंदणी करावी लागेल.
  • नोंदणी झालेल्या इच्छुक व्यक्तीची यादी करून त्या यादीला जिल्हा परिषद कृषी समितीची मान्यता घ्यावी लागेल. या समितीला निवडीचे अंतिम अधिकार असतील. योजनेचा कालावधी कमी करणे अथवा वाढवण्याचा अधिकार सरकारने जिल्हा परिषदेला दिला आहे.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com