agriculture news in marathi 'Krishi Sanjeevani Mohim' for kharif success in Nanded district | Page 3 ||| Agrowon

नांदेड जिल्ह्यात ‘खरीप यशस्वितेसाठी ‘कृषी संजीवनी मोहीम’’

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 22 जून 2021

नांदेड : ‘‘ २१ जून ते एक जुलै या कालावधीत प्रत्येक दिवशी महत्त्वाच्या मोहिमांवर विशेष भर देऊन ‘कृषी संजीवनी मोहीम’ साजरी करण्यात येईल,’’ अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी दिली.

नांदेड : ‘‘खरीप हंगाम २०२१ यशस्वी करून आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी, कृषी विभाग- जिल्हा परिषद, कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ, कृषिमित्र शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करीत आहेत. २१ जून ते एक जुलै या कालावधीत प्रत्येक दिवशी महत्त्वाच्या मोहिमांवर विशेष भर देऊन ‘कृषी संजीवनी मोहीम’ साजरी करण्यात येईल,’’ अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी दिली.  

जिल्ह्यात कृषी संजिवनी मोहिमेचा प्रारंभ चलवदे, उपविभागीय कृषी अधिकारी रविकुमार सुखदेव, अर्धापूर तालुका कृषी अधिकारी संजय चातरमल यांच्या उपस्थितीत अर्धापूर शिवारात सोमवारी (ता. २१) झाला. या वेळी शेतकरी सोनाजी सरोदे यांच्यासह इतर शेतकरी उपस्थित होते. अधिक माहितीसाठी कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.

अशी असेल मोहीम...

सोमवारी (ता. २१) बीबीएफ लागवड तंत्रज्ञान (रुंद वरंबा सरी तंत्रज्ञान) विषयी माहिती, मंगळवारी (ता. २२) बीजप्रक्रिया, बुधवारी (ता. २३) जमीन आरोग्य पत्रिकेनुसार खतांचा संतुलित वापर, गुरुवारी (ता. २४) कापूस एक गाव एक वाण, ऊस लागवड तंत्रज्ञान, कडधान्य व तेलबिया क्षेत्रात आंतरपीक तंत्रज्ञान, शुक्रवारी (ता. २५) ‘विकेल ते पिकेल’, सोमवारी (ता. २८) `मनरेगा`अंतर्गत फळबाग लागवड व तंत्रज्ञान प्रसार, मंगळवार (ता. २९) तालुक्यातील दोन पिकात उत्पादकता वाढीसाठी रिसोर्स बँकेतील शेतकऱ्यांचा सहभाग, बुधवार (ता. ३०) जिल्ह्यातील महत्त्वाच्या पिकांची कीड व रोग नियंत्रणाच्या उपाययोजना आणि एक जुलै रोजी कृषी दिन आणि मोहिमेचा समारोप कार्यक्रम होईल.


इतर बातम्या
उपलोकायुक्त, सचिव, आयुक्तांनी सांगूनही...पुणे ः जलयुक्त शिवार अभियानावर खर्च दाखवलेल्या...
‘एफआरपी’ वाटपात राज्याची आघाडी : शेखर...पुणे ः साखर उद्योगाचा गाळप हंगाम यंदा आव्हानात्मक...
विमा लाभापासून शेतकऱ्यांना वंचित...नगर : नैसर्गिक आपत्ती, अन्य कारणाने नुकसान होऊनही...
साताऱ्यात पावसाचा जोर कमी झालासातारा : जिल्ह्यातील प्रमुख धरणांच्या पाणलोट...
केळी उत्पादकांना वादळ नुकसानभरपाईची...अकोला : जिल्ह्यात अकोट तालुक्यात १५ मे २०२० रोजी...
अतिवृष्टिग्रस्तांना अन्नधान्य,...नाशिक : आपत्तीग्रस्त आणि पूरग्रस्तांना मदत म्हणून...
तुळशी धरणक्षेत्रात उच्चांकी ८९५...कोल्हापूर : जिल्ह्यातील तुळशी (ता.राधानगरी)...
टीका, आरोपांचा समाचार; दुसऱ्या दिवशीही...नवी दिल्ली : संयुक्त किसान मोर्चाने आयोजित शेतकरी...
कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची...पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या...
मराठवाड्यात पावसाचा जोर ओसरलाऔरंगाबाद : मराठवाड्यात गुरूवारच्या (ता.२२) तुलनेत...
औरंगाबाद जिल्ह्यात हमीभावातील ज्वारी,...औरंगाबाद : जिल्ह्यात आधारभूत दराने खरेदी केंद्र...
नांदेड जिल्ह्यात खरीप पिके पाण्याखालीनांदेड : जिल्ह्यात बुधवारनंतर गुरुवारी झालेल्या...
खानदेशात कांद्याच्या रोपवाटिका...जळगाव : खानदेशात कांदा रोपवाटिकांमध्ये रोपे...
अतिवृष्टीचा हिंगोलीतील ७१ गावांत दणकाहिंगोली ः जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात जुलै...
चिपळूणमधील दीड हजार जणांना पुरातून...रत्नागिरी : अतिवृष्टीचा तडाखा चिपळूण, खेड,...
‘हतनूर’चे ३६ दरवाजे उघडलेजळगाव : तापीनदीवरील भुसावळनजीकच्या हतनूर धरणाच्या...
`रावळगाव`च्या जप्त साखर विक्रीतून ‘...नाशिक : ‘‘मालेगाव तालुक्यातील एस.जे. शुगर रावळगाव...
पेठ, त्र्यंबकेश्वरला मुसळधारनाशिक : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात पेठ,...
बुलडाण्यातील खरीप पीकविमा प्रश्नावर...बुलडाणा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या खरीप...
पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने कामबंद...वाशीम : जिल्ह्यात पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने...