Agriculture news in Marathi Krishi Sanjeevani Week started by Agriculture university | Agrowon

कृषी विद्यापीठाद्वारे कृषी संजीवनी सप्ताहाला सुरुवात

टीम अॅग्रोवन
शनिवार, 4 जुलै 2020

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातर्फे कृषी दिन व कृषी संजीवनी सप्ताहाला सुरुवात करण्यात आली. शेतकऱ्यांच्या बांधावर जात त्यांच्याशी संवाद साधत अत्याधुनिक तंत्रज्ञानाची देवाणघेवाण करण्यास सुरुवात करण्यात आली.

अकोला ः राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधत बुधवारी (ता. एक) डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातर्फे कृषी दिन व कृषी संजीवनी सप्ताहाला सुरुवात करण्यात आली. शेतकऱ्यांच्या बांधावर जात त्यांच्याशी संवाद साधत अत्याधुनिक तंत्रज्ञानाची देवाणघेवाण करण्यास सुरुवात करण्यात आली.

कुलगुरू डॉ. विलास भाले यांच्या मार्गदर्शनात विद्यापीठातील सर्व संचालक, अधिष्ठाता, सहयोगी अधिष्ठाता, वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ, विभाग प्रमुख, कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक,  विषयतज्ज्ञ, कृषी संशोधन केंद्राचे अधिकारी, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य, विद्यापीठ परिवारातील अधिकारी -कर्मचाऱ्यांनी विद्यापीठ अखत्यारित असलेल्या प्रत्येक जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या बांधावर भेटी देत विषयनिहाय मार्गदर्शन, चर्चा व प्रक्षेत्र भेटी दिल्या. या उपक्रमाची सुरुवात कुलगुरू डॉ. भाले यांनी अकोला तालुक्यातील दत्तक ग्राम सिसा मासा येथून केली.

या प्रसंगी त्यांनी विविध शेतकऱ्यांच्या शेतावर भेटी देत त्यांच्या सोबत चर्चा  करीत समस्या जाणून घेतल्या. त्यावर उपाय योजनासुद्धा निर्धारित केल्या. या वेळी कृषी अधिष्ठाता डॉ. प्रदीप इंगोले व इतर उपस्थित होते. गाव पातळीवर तंत्रज्ञान प्रचार प्रसार करण्यात येणार असून, या उपक्रमाची सुरुवात विद्यापीठाचे शिक्षण विस्तार संचालक डॉ. दिलीप मानकर यांनी बार्शीटाकळी तालुक्यातील ग्राम रेडवा येथून केली.

कृषी दिन साजरा
दरवर्षी कृषिदिनी विदर्भातील प्रगतिशील शेतकऱ्यांचा सत्कार व मार्गदर्शन अकोला येथे होत असते. यंदा कोरोनामुळे ऑनलाइन पद्धतीने कृषी दिन कार्यक्रम झाला. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या कार्यक्रमप्रसंगी अकोला येथील शासकीय शिक्षण महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. वसुधा देव यांनी वसंतराव नाईक यांच्या जीवन कार्यावर व विशेषत्वाने शेती आणि ग्रामीण समाजाविषयी कामगिरीवर प्रकाश टाकला. याप्रसंगी विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य श्री गणेश कंडारकर, विद्यापीठाचे संचालक विस्तार शिक्षण डॉ. दिलीप मानकर, संचालक संशोधन डॉ. विलास खर्चे, संचालक शिक्षण डॉ. प्रदीप इंगोले, अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी डॉ. महेंद्र नागदेवे, अधिष्ठाता उद्यान विद्या डॉ. प्रकाश नागरे यांच्यासह सर्व सहयोगी अधिष्ठाता, शास्त्रज्ञ, विभाग प्रमुख, अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


इतर ताज्या घडामोडी
खानदेशात तिसऱ्या दिवशीही रिमझिम सुरूचजळगाव : खानदेशात मागील तीन दिवस सतत रिमझिम सुरू...
सोलापूर जिल्ह्यात भिज पाऊस, जोर नाहीचसोलापूर  ः गेल्या अनेक दिवसांपासूनच्या...
नांदेडमध्ये हळद ४९०० ते ५७०० रूपये...नांदेड : नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे जिल्ह्याच्या धरणक्षेत्रात पावसाची...पुणे ः पुणे जिल्ह्यातील बहुतांशी भागात पावसाचा...
वऱ्हाडात पावसाची संततधार सुरूअकोला ः मागील दोन दिवसांपासून वऱ्हाडात पाऊस...
नागपूर जिल्ह्यात मोठा आणि तान्हा पोळा...नागपूर : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे...
औरंगाबाद जिल्ह्यात शेतकऱ्यांना ८५००...औरंगाबाद :  जिल्ह्यातील ९६३ शेतकऱ्यांकडून...
मराठवाड्यात सुमारे ४७ लाख हेक्टरवर खरीपऔरंगाबाद : मराठवाड्यातील खरिपाचे सर्वसाधारण...
खानदेशात तीन दिवसांपासून भिज पाऊसजळगाव  ः खानदेशात मागील तीन दिवसांपासून भिज...
अमळनेरमध्ये रासायनिक खतांचा वापर वाढलावावडे, जि. जळगाव  : अमळनेर तालुक्यात जवळपास...
खडकवासलातून ११ हजार ७३५ क्युसेक विसर्गपुणे : खडकवासला धरणातून बुधवार (ता. १२) पासून...
सातपुड्यात मूगाच्या नुकसानीची शक्यताजळगाव  ः खानदेशात सातपुडा पर्वत भागात पाऊस...
गडचिरोलीत युरियाची कृत्रिम टंचाईगडचिरोली : जिल्ह्यात दोन महिन्यानंतर बरसलेल्या...
परभणीत बँकांचे उंबरठे झिजवून...परभणी : यंदा खरीप हंगामात जिल्ह्यातील बॅंका...
मुंगळा परिसरात रानडुकरांचा धुडगूसमुंगळा जि. वाशीम ः चांगल्या पावसामुळे यंदा या...
‘रासाका’ सुरू करा, अन्यथा उपोषण’नाशिक : यंदाचा ऊस गाळप हंगाम ऑक्टोबर महिन्यापासून...
एफआरपी थकविणाऱ्या कारखान्यांवर कारवाई...नांदेड ः प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालया...
वणी उपविभागातील शेतकऱ्यांना विमा...यवतमाळ : पीक विमा काढल्यानंतरही ही गेल्या तीन...
वाढीव वीज बिले कमी न केल्यास आंदोलन...सोलापूर  ः लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यातील...
बुलडाणा जिल्ह्यात शेततळ्यांचे अनुदान...बुलडाणा ः या वर्षात शेततळे खोदलेल्या शेतकऱ्यांना...